कुष्ठरोग तंत्रज्ञांचे
त्वचाविलेपन उजळणी प्रशिक्षण
अमरावती, दि. 11 : कोठारा लेप्रसी मिशन
हॉस्पिटल आणि सहाय्यक संचालक आरोग्य सेवा कुष्ठरोग यांच्या वतीने सोमवार, दि. ८ डिसेंबर रोजी
जिल्ह्यामध्ये कार्यरत कुष्ठरोग तंत्रज्ञांचे त्वचाविलेपन उजळणी प्रशिक्षण पार
पडले. कोठारा लेप्रसी हॉस्पिटल येथे हे प्रशिक्षण घेण्यात आले.
कुष्ठरोग आजाराचे निदान
करण्यासाठी आवश्यक असलेली ही तपासणी आहे. सर्वसामान्यपणे वैद्यकीय
व्यावसायिकांद्वारे लक्षणांवरून कुष्ठरोग आजाराचे निदान वैद्यकीय तपासणीद्वारे निश्चित केले जाते. निदानास कठीण असलेल्या
रुग्णांकरिता किंवा गुंतागुंतीच्या रुग्णांकरिता त्वचा विलेपन पद्धतीद्वारे निदान
केले जाते. ही तपासणी कोठारा लेप्रसी हॉस्पिटल आणि डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय
महाविद्यालयात उपलब्ध आहे.
ग्रामीण आणि दुर्गम
भागातील रुग्णांच्या सोईकरिता ही तपासणी कुष्ठरोग तंत्रज्ञांना सुलभतेने करता यावी, याकरिता एक दिवसीय उजळणी
प्रशिक्षण घेण्यात आले. वैद्यकीय अधीक्षक डॉ. मिलिंद चव्हाण, सहाय्यक वैद्यकीय अधीक्षक
डॉ. सौरभ देशमुख, प्रयोगशाळा
तंत्रज्ञ यांनी गुंतागुंतीच्या रुग्णांमध्ये कुष्ठरोगाचे निदान करण्यासाठी त्वचा
विलेपनाची प्रक्रिया आणि प्रयोगशाळेतील तपासणी याविषयी मार्गदर्शन केले.
प्रशिक्षणार्थींकडून प्रात्यक्षिकेही करण्यात आली.
समारोपाप्रसंगी सहाय्यक
संचालक आरोग्य सेवा कुष्ठरोग डॉ. पूनम मोहोकार यांनी 2027 पर्यंत कुष्ठरोगाचा
शून्य प्रसार ध्येय साध्य करण्यासाठी प्रशिक्षण महत्वाचे असल्याचे सांगितले.
वैद्यकीय अधिकारी डॉ. विनंती नवरे, अवैद्यकीय पर्यवेक्षक दीपक गडलिंग, सल्लागार सुरेश धोंडगे
यांनी मार्गदर्शन केले.
00000
मोर्शी खुले कारागृहात
मानवी हक्काबाबत मार्गदर्शन
अमरावती, दि. 11 : मोर्शी येथील खुले
कारागृहात बंद्यांसाठी मानवी हक्क आणि संरक्षण या विषयावर कायदेविषयक जागृती
कार्यक्रम बुधवार, दि. 10 डिसेंबर रोजी पार पडला.
राज्य विधी सेवा
प्राधिकरण आणि राज्य मानवी हक्क आयोग, कारागृह विभागाच्या वतीने आंतरराष्ट्रीय मानवी हक्क
दिवसानिमित्त मानवी हक्क आणि संरक्षण या विषयावर कायदेविषयक जागृती कार्यक्रम
घेण्यात आला. यावेळी व्ही. बी. वानखडे, एस. व्ही. खांडेकर, डी. एस. वमने, कारागृह अधीक्षक एस. एस. हिरेकर उपस्थित होते.
न्यायरक्षक कार्यालयाचे
अॅड. अमित सहारकर यांनी बंद्यांचे कारागृहातील हक्क व कर्तव्ये याविषयी माहिती
दिली. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डी. एस. वमने यांनी कारागृहातील बंद्यांना
जगण्याचा अधिकार, पिण्याचे पाणी व
जेवणाचा अधिकार, जीविताची सुरक्षा, कायदेविषयक मदत, मनोरंजन, शिक्षण, आरोग्याचा अधिकार
असल्याचे सांगितले.
ॲड. अंकुश इंगळे यांनी
प्रास्ताविक केले. कारागृहाचे कृषी पर्यवेक्षक एन. व्ही.पकडे यांनी सूत्रसंचालन
केले. कारागृह अधीक्षक एस. एस. हिरेकर यांनी आभार मानले.
00000
-पालक सचिव आय. ए. कुंदन
अमरावती, दि. 11 : जिल्ह्यातील महापालिका, जिल्हा परिषद आणि जिल्हा
प्रशासनाशी चर्चा करण्यात आली आहे. जिल्ह्याच्या दृष्टीकोनातून महत्वाचे विषय
मार्गी लावण्यासाठी मंत्रालयस्तरावर पाठपुरावा करण्यात येईल. यात जिल्ह्याच्या
विकासासाठी सहकार्य करणार असल्याची माहिती पालक सचिव आय. ए. कुंदनन यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात
श्रीमती कुंदन यांनी बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी आशिष येरेकर, कामगार आयुक्त डॉ. एच. पी.
तुम्मोड आदी उपस्थित होते.
सुरवातीला जिल्हाधिकारी
श्री. येरेकर यांनी जिल्ह्यातील पीएम मित्रा पार्क, चिखलदरा येथील स्कायवॉक, मेळघाटातील 25 गावाचा विजेचा प्रश्न, ईको टुरीझम आणि
मेळाघाटातील आरोग्य, दळणवळण, विजेच्या प्रश्नाबाबत
माहिती दिली. प्रामुख्याने मेळघाटातील पायाभूत सुविधांसाठी राज्य वन्यजीव मंडळाची
बैठक घेऊन जिल्ह्यातील विकासकामांना आवश्यक असलेल्या परवागीसाठी केंद्रीय वन्यजीव
मंडळाकडे पाठविण्याची विनंती केली. तसेच ईको टुरीझमसाठी आवश्यक असणारा 50 कोटी रूपयांचा निधी
देण्यात यावा. जिल्ह्यात उद्योगाचे वातावरण होण्यासाठी मोठा उद्योग येण्यासाठी
प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा
व्यक्त केली.
जिल्हा परिषदेत
प्रामुख्याने वैद्यकीय पदांची भरती शासनस्तरावरून करण्यात यावी. यामुळे वैद्यकीय
सुविधा सुधारण्यास मदत मिळेल. महापालिकेतील प्रारूप विकास आराखड्याला मंजुरी
मिळावी. दुकाने व गाळ्यांची लिजची मुदत 2018मध्ये संपली असल्याने याबाबत शासनाची तातडीने परवागनी
मिळावी, यासाठी सहकार्य
आवश्यक असल्याचे सांगितले. यावेळी औद्योगिक सुरक्षा मंडळाचा आढावा घेण्यात आला.
00000
अमरावती आयटीआयमध्ये
सोमवारी शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा
अमरावती, दि. 11 : येथील शासकीय औद्योगिक
प्रशिक्षण संस्थेत सोमवार,
दि. १५ डिसेंबर
रोजी सकाळी १० वाजता प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ भरती मेळावा घेण्यात येणार आहे.
या भरती मेळाव्यामध्ये भरतीसाठी चाकण, पुणे येथील महिंद्रा आणि महिंद्रा कंपनी सहभागी होणार आहे.
मेळाव्यासाठी आयटीआयमध्ये
इलेक्ट्रीशियन, इलेक्ट्रॉनिक्स -
मेकॅनिक, इंस्ट्रुमेन्ट
मेकॅनिक, मेकॅनिक मशिन टुल
मेंटनन्स, मशिनिस्ट, मशिनिस्ट (ग्राइंडर), मेकॅनिक (मोटर व्हेइकल), मेकॅनिक डिझेल, मेकॅनिक रेफ्रिजरेशन आणि
एअर कंडिशन, मेकॅनिक ट्रॅक्टर, फिटर, टर्नर, पेन्टर (जनरल), प्लास्टिक प्रोसेसिंग
ऑपरेटर, पंप ऑपरेटर कम
मेकॅनिक, डिझेल-मेकॅनिक, शिट मेटल वर्कर, टूल अॅन्ड डाइमेकर (प्रेस
टूल, जिग्स अॅन्ड
फिक्सचर) वायरमन, वेल्डर (गॅस
अॅन्ड इलेक्ट्रीक) इत्यादी व्यवसाय उत्तीर्ण १८- २८ वयोगटातील प्रशिक्षणार्थी
उमेदवांरानी सहभागी व्हावे. प्रशिक्षणार्थ्यांनी बायोडाटा आणि मुळ कागदापत्रासह
झेरॉक्स प्रती सोबत आणणे आवश्यक आहे.
तसेच आयटीआयमध्ये
प्रशिक्षण घेत असलेल्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर घेण्यात येणार
आहे. याचा लाभ घ्यावा, असे आवाहन
सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लगार एस. के. बोरकर यांनी केले आहे.
00000
कॉक्लियर इम्प्लांटनंतर
‘स्विच ऑन’ अडीच वर्षाच्या बालिकेने पहिल्यांदाच ऐकला आवाज.
स्थानिक विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय (सुपर
स्पेशालिटी हॉस्पिटल,) अमरावती येथे
दुसऱ्यांदा जन्मजात मूकबधिर असलेल्या अडीच वर्षाच्या बालिकेवर कॉक्लियर इम्प्लांट
शस्त्रक्रिया 11 नोव्हेंबर 2025 रोजी यशस्वीपणे पार पडली
व त्यानंतरच्या ‘स्विच ऑन’ (Sound Processor Activation) प्रक्रियेद्वारे
बालिकेने पहिल्यांदाच आवाज ऐकला, हा क्षण उपस्थित सर्वांसाठी अत्यंत आनंददायक ठरला. सदर
बालिका ही रा.आमला विश्वेश्वर ता. चांदुर रेल्वे, जि.अमरावती येथील आहे.
या शस्त्रक्रियेची 'स्विच ऑन' प्रक्रिया साउंड प्रोसेसर
ऍक्टिव्हेशन करण्यात आले . यावेळी बालीकेने दिलेला सकारात्मक प्रतिसाद हृदयस्पर्शी
होता.या प्रक्रियेनंतर पुढील दोन वर्षे रुग्णाने नियमितपणे ऑडिओलॉजिस्टच्या
संपर्कात राहिल्यास बोलणे शिकणे सुलभ होईल, अशी माहिती तज्ञांनी दिली. सदर रुग्ण ही दोन वर्षावरील
असल्यामुळे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेमार्फत उपचार मिळू शकत नव्हता
म्हणून ही शस्त्रक्रिया जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून सार्वजनिक आरोग्य
विभागाच्या माध्यमातून दुसऱ्यांदा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अमरावती येथे करण्यात आली
आहे.
रुग्णालयाचे वैद्यकीय
अधीक्षक डॉ. अमोल नरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. जीवन वेदी (नाक,कान, घसा तज्ञ,विभाग प्रमुख, इंदिरा गांधी मेडिकल
कॉलेज, नागपूर), रुग्णालयाचे विशेष कार्य
अधिकारी तसेच नाक, कान, घसा तज्ञ डॉ.मंगेश मेंढे,ऑडिओलॉजिस्ट व स्पीच
थेरपीस्ट लक्ष्मण मोरे, औषध निर्माण
अधिकारी योगेश वाडेकर यांचे
शस्त्रक्रियेसाठी विशेष योगदान राहिले.या यशस्वी आणि दुर्मीळ शस्त्रक्रियेमुळे एका
बालकाच्या आयुष्यात अमूल्य बदल घडून आला आहे. या कार्यक्रमाला डॉ. माधव ढोपरे, डॉ. विक्रांत कुळमेथे, डॉ. उज्वला मोहोड, डॉ. जयश्री पुसदेकर, समाजसेवा अधीक्षक
(वैद्यकीय)शितल बोंडे, ऋषिकेश धस, कार्यालयीन अधीक्षक
श्रीकांत इखे, गुल्हाने आदी
अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.गरीब व गरजू रुग्णांसाठी सुपर स्पेशालिटी
हॉस्पिटलमार्फत आधुनिक व महागड्या उपचार सुविधा विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येत
आहेत, ही अत्यंत
समाधानकारक बाब आहे.
00000
आजपासून क्रीडा
सप्ताहाचे आयोजन
अमरावती, दि. 11 : क्रीडा व युवक सेवा
संचालनालयाच्या क्रीडा धोरणानुसार दरवर्षी क्रीडा सप्ताह साजरा केला जातो. यावर्षी
देखील दि. १२ ते १८ डिसेंबर दरम्यान विविध क्रीडा स्पर्धा व कार्यक्रमांचे आयोजन
करण्यात आले आहे. शुक्रवार,
दि. 12 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता या सप्ताहाचे
उद्घाटन करण्यात येणार आहे.
दि. १२ डिसेंबर रोजी
विभागीय थांगता मार्शल आर्ट क्रीडा स्पर्धा, जिल्हास्तर टेनिस बॉल क्रिकेट क्रीडा स्पर्धा या विभागीय
क्रीडा संकुलात सकाळी ११ घेण्यात येणार आहे. दि. १३ डिसेंबर रोजी व्हॉलीबॉल, खो-खो स्पर्धा घेण्यात
येतील. दि. १४ डिसेंबर रोजी स्व्कॅश, टेबल टेनिस क्रीडा स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुलात घेण्यात
येतील. दि. १५ डिसेंबर रोजी स्पीडबॉल, कॉर्फबॉल श्री. गणेशदास राठी विद्यालय, अमरावती येथे घेण्यात
येतील.
टेनिस क्रिकेट स्पर्धा विमलाबाई देशमुख
महाविद्यालय, अमरावती घेण्यात
येतील. दि. १६ डिसेंबर रोजी रस्सीखेच स्पर्धा गोल्डन किड्स इंग्लिश हायस्कूल, अमरावती येथे, तर डॉजबॉल स्पर्धा श्री.
गणेशदास राठी विद्यालय, जिल्हास्तर
सिलंबम क्रीडा स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुलात घेण्यात येतील. दि. १७ डिसेंबर रोजी
मॉन्टेक्स बॉल क्रिकेट स्पर्धा नरसम्मा कॉलेज, अमरावती येथे, टेनिस व्हॉलीबॉल स्पर्धा गो. सी. टोम्पे महाविद्यालय, चांदुर बाजार, नेटबॉल स्पर्धा विभागीय
क्रीडा संकुल, धनुर्विद्या
क्रीडा स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल येथे घेण्यात येतील. दि. १८ डिसेंबर रोजी
स्केटींग, कुडो, मल्लखाम स्पर्धा विभागीय
क्रीडा संकुलात घेण्यात येतील.
यावेळी सन २०२४-२५ या
वर्षात एकविध खेळ संघटनेमार्फत आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्पर्धेत प्राविण्य
प्राप्त केलेल्या खेळाडूंचा सत्कार दि. १८ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता
जिल्हा क्रीडा संकुलात करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील सर्व
शाळा-महाविद्यालयातील खेळाडूंनी स्पर्धेसाठी आणि राष्ट्रीय खेळाडूंनी सत्कारासाठी
नाव नोंदणी दि. १५ डिसेंबरपर्यंत क्रीडा अधिकारी त्रिवेणी बांते, जिल्हा क्रीडा अधिकारी
कार्यालय, अमरावती
यांच्याकडे नोंदवावी, असे आवाहन जिल्हा
क्रीडा अधिकारी अनिल इंगळे यांनी केले आहे.
00000
शहरात कलम 37 (1) व (3) लागू
अमरावती,दि.11 : शहरात शांतता व
सुव्यवस्था अबाधित राहावी,
यासाठी पोलीस
आयुक्त (अमरावती शहर) यांनी महाराष्ट्र
पोलिस कायद्याचे कलम 37
(1) व (3) अन्वये
प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.
सदर प्रतिबंधात्मक आदेश शहरातील
कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, याकरिता पोलिस आयुक्तालयाच्या परिक्षेत्रात लागू करण्यात
आला असून दि. 13 डिसेंबर 2025 ते 27 डिसेंबर 2025 च्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहील. या कलमाचा
भंग करणाऱ्या व्यक्तीविरूध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे अरविंद चावरिया पोलीस आयुक्त अमरावती यांनी कळविले आहे.
00000


.jpeg)
.jpeg)
.jpeg)

No comments:
Post a Comment