आज डाक अदालतीचे
आयोजन
अमरावती, दि.
08 (जिमाका) : भारतीय डाक विभागामार्फत मंगळवार, दि. 9 डिसेंबर 2025 रोजी प्रवर
अधीक्षक, डाक घर, अमरावती विभाग
यांच्या कार्यालयामध्ये डाक अदालतीचे आयोजन सकाळी 11 वाजता
करण्यात आले आहे.
पोस्टाच्या
कामासंबंधी विशेषत: स्पीड पोस्ट, काउंटर सेवा,
डाक वस्तू रजिस्टर पार्सल, बचत बँक व मनी
ऑर्डर याबाबत तक्रारींचे निराकरण सहा आठवड्याच्या आत झाले नसणे आणि समाधानकारक
उत्तर मिळालेली नसणे अशा तक्रारी विचारात घेऊन डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले
आहे.
सर्व संबंधितांनी
अर्ज प्रवर अधीक्षक, डाक घर, अमरावती
विभाग, अमरावती 444 602 यांच्याकडे
सादर करावेत. त्यामध्ये तक्रारीचा सर्व तपशील, तक्रार
केल्याची तारीख, ज्या अधिकाऱ्यास मुळ तक्रार पाठविली असेल
त्याचे नाव व हुद्दा इत्यादीसह उल्लेख करावा, असे प्रवर
अधीक्षक डाकघर यांनी कळविले आहे.
00000
कौशल्य विकास
विभागाची नि:शुल्क अभ्यासिका सुरू
अमरावती, दि.
8 : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र
तथा मॉडेल करियर सेंटरच्या वतीने पंडित दीनदयाल उपाध्याय अभ्यासिका आणि ग्रंथालय
विकसित करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना ही अभ्यासिका पूर्णपणे नि:शुल्क उपलब्ध
आहे.
सदर अभ्यासिका
पूर्णपणे वातानुकूलीत असून विद्यार्थ्याना अभ्यासासाठी शांत व सुसज्ज वातावरण
उपलब्ध करून देण्यात आले आहे. ग्रंथालयामध्ये उमेदवारांसाठी विविध स्पर्धा
परिक्षांची पुस्तके, मासिके आणि नामांकित वर्तमानपत्रे
विनामुल्य वाचनासाठी उपलब्ध आहेत. यूपीएससी, एमपीएससी,
एसएससी, रेल्वे, पोलीस
भरती, बॅंकींग, तसेच महाविद्यालयीन
अभ्यास करणाऱ्या गरजू व होतकरू विद्यार्थ्यांसाठी ही अभ्यासिका अत्यंत लाभदायी
ठरणार आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी मध्यवर्ती बसस्थानकापासून अवघ्या 100
मीटर अंतरावर ही अभ्यासिका सुरू करण्यात आली आहे.
अभ्यासिका
ही जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन
केद्र तथा मॉडेल करियर सेंटर, शासकीय तांत्रिक विद्यालय
परिसर, उस्मानिया मशिदीजवळ, बस स्टॅन्ड
रोड, अमरावती 444 601 याठिकाणी कार्यरत
आहे. विद्यार्थ्यानी मोफत सुविधेचा लाभ घ्यावा, तसेच अधिक
माहितीसाठी भ्रमणध्वनी क्रमांक 8308956236, 7620560125 या
क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास,
रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त प्रांजली
बारस्कर यांनी केले आहे.
000000
आदिवासी विकास
महामंडळाकडून 888 क्विंटल मका खरेदी
अमरावती, दि.
8 : आदिवासी विकास महामंडळाच्या धारणी कार्यालयामार्फत खरीप
पणन हंगाम 2025-26 मध्ये शासनाच्या किंमत समर्थन योजनेंतर्गत
धारणी आणि चिखलदरा तालुक्यातील शेतकऱ्यांकडून एफएक्यू दर्जाचे ज्वारी, बाजरी, मका, रागी भरडधान्य
खरेदी करण्यात येत आहे. यात आतापर्यंत 888 क्विंटल मका खरेदी
करण्यात आली आहे.
हमी भावाने धान्य
खरेदीसाठी नोंदणी कालावधी हा दि. 15 डिसेंबरपर्यंत
राहणार असून खरीदी दि. 28 फेब्रुवारी 2026 पर्यंत सुरू राहणार आहे. महामंडळाकडे आतापर्यंत एक हजार शेतकऱ्यांनी
नोंदणी केलेली असून त्यापैकी 248 शेतकऱ्यांकडून 888.40
क्विंटल मका खरेदी करण्यात आली आहे.
जिल्ह्यात धारणी
उप प्रादेशिक कार्यालयांतर्गत बैरागड, सावलिखेड़ा,
साद्राबाडी, चाकर्दा, हरीसाल,
धारणी आणि चिखलदरा अंतर्गत चुरणी, गोलखेडा
बाजार येथे खरेदी केंद्र सुरू आहे.
खरेदी केंद्रावर
धान्य आणण्यापूर्वी व्यवस्थितरीत्या वाळवून, स्वच्छ करून
आणावे, तसेच शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे घेऊन राज्य
शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेचा लाभ घ्यावा, असे
आवाहन प्रादेशिक व्यवस्थापक संतोष आमटे यांनी केले आहे.
00000
केंद्रीय
कुष्ठरोग विभागाकडून
कुष्ठरोग
निर्मूलन कार्यक्रमाची पाहणी
अमरावती, दि.
8 : राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत केंद्र
शासनाच्या केंद्रीय कुष्ठरोग विभागाने जिल्ह्यातील राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन
कार्यक्रमाची पाहणी केली. तमिळनाडू येथील डॉ. समांथ्वा सेलवन चेंगलपट्टू यांनी दोन
ही पाहणी केली.
सदर अभ्यास दौरामध्ये
राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाची सर्वंकष पाहणी करण्यात आली. डॉ.
समांथ्वा सेलवन चेंगलपट्टू यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, जिल्हा
आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले यांची भेट घेऊन त्यांनी जिल्ह्यातील राष्ट्रीय
कुष्ठरोग नियोजन कार्यक्रमाच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी त्यांनी
नवीन कुष्ठरुग्णांचा शोध घेऊन औषधोपचार सुरू केल्यास येत्या काही वर्षांमध्ये
कुष्ठरोग संसर्गाची साखळी खंडित करण्यात यश मिळणार असल्याचे सांगितले. सदर दौऱ्यात
त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र माहुली जहागीर, अमरावती
महानगरपालिका अंतर्गत दस्तूरनगर शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र, तपोवन येथे भेट देऊन कामकाजाची पाहणी केली.
यावेळी सहायक
संचालक आरोग्य सेवा कुष्ठरोग डॉ. पूनम मोहोकार, अतिरिक्त
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पारिसे, वैद्यकीय अधिकारी
पर्यवेक्षकीय नागरी कुष्ठरोग पथक अमरावती डॉ. विनंती नवरे, अवैद्यकीय
पर्यवेक्षक दीपक गडलिंग, श्री. पन्हाळे, अवैद्यकीय सहाय्यक रमेश सोनार, कुष्ठरोग तंत्रज्ञ
रितेश ठाकरे आदी उपस्थित होते.
00000
संत संताजी जगनाडे महाराज जयंती साजरी
अमरावती, दि.
8: जिल्हाधिकारी कार्यालयात आज संत संताजी जगनाडे महाराज
यांची जयंती साजरी करण्यात आली.
जिल्हाधिकारी
आशिष येरेकर यांनी संत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण
करून अभिवादन केले. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी गोविंद दानेज, निवासी
उपजिल्हाधिकारी संतोष काकडे, उपजिल्हाधिकारी विवेक जाधव,
निवडणूक उपजिल्हाधिकारी शिवाजी शिंदे, नगरपालिका
प्रशासन सहायक आयुक्त विकास खंडारे, जिल्हा नियोजन अधिकारी
वर्षा भाकरे, जिल्हा खनिकर्म अधिकारी प्रणिता चापले, जिल्हा पुरवठा अधिकारी निनाद लांडे, अधीक्षक निलेश
खटके, विधी अधिकारी नरेंद्र बोहरा, जिल्हा
आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुरेंद्र रामेकर आदी उपस्थित होते. उपस्थितांनी संत
संताजी जगनाडे महाराजांच्या प्रतिमेस पुष्पार्पण करून अभिवादन केले.
000000
अमृतच्या जिल्हा कार्यालयाचे बुधवारी उद्घाटन
अमरावती, दि.
8 : खुल्या गटातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत
‘अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन बुधवार,
दि. 10 डिसेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता होणार आहे.
सदर कार्यालय
अमृत कार्यालय, आशीर्वाद बिल्डिंग, मालटकेडी समोर, बस स्टँड रोड, टोपे
नगर, अमरावती येथे स्थित आहे. संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक
विजय जोशी यांच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे. विशेष कार्यकारी तथा
प्रबंधक संचालक सिद्धेश्वर वरणगावकर, राज्य व्यवस्थापक दीपक
जोशी, नाशिक विभागीय व्यवस्थापक मंगेश खाडीलकर, अमरावती विभाग व्यवस्थापक प्रवीण कोळेश्वर, जिल्हा
माहिती अधिकारी गजानन कोटूरवार उपस्थित उपस्थित राहतील.
जिल्हा
कार्यालयामुळे संस्थेच्या विविध उपक्रमांचा लाभ नागरिकांना अधिक सुलभपणे मिळणार
असून रोजगार निर्मितीला नवी दिशा मिळणार आहे. महाराष्ट्र संशोधन, उन्नती
व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) ही संस्था राज्यात कौशल्य विकास, प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि रोजगारसंधी निर्माण
करण्यासाठी कार्यरत आहे. युवकांनी औद्योगिकदृष्ट्या शैक्षणिक आणि
व्यवसायिकदृष्ट्या सक्षम व्हावे, यासाठी अमृत उपक्रम राबवित
आहे.
जिल्हा कार्यालय
सुरू झाल्यानंतर स्थानिक पातळीवर अधिक कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. विविध
उपक्रमांची अंमलबजावणी जलद गतीने होईल. या कार्यालयामुळे प्रशिक्षण, प्रमाणपत्र
अभ्यासक्रम, कौशल्य विकास, स्वयंरोजगार,
उद्योग उभारणी यासारख्या अनेक संधी उपलब्ध होतील.
00000


No comments:
Post a Comment