Tuesday, December 9, 2025

DIO NEWS AMRAVATI 09-12-2025

 



लाडकी बहिण योजनेतील लाभार्थ्यांची जिल्हास्तरीय सहकारी पतसंस्था स्थापन

*राज्यातील पहिल्या पतसंस्थेला नोंदणी प्रमाणपत्र प्रदान

 

अमरावती, दि. 9 : राज्य शासनाच्या लाडकी बहिण योजनेतील लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या 1500 रूपये आर्थिक सहाय्याचा योग्य विनियोग लाभार्थ्यांची जिल्हास्तरीय सहकारी पतसंस्था स्थापन करण्यात आली  आहे. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या हस्ते पतसंस्थेच्या सभासदांना नोंदणीचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले आहे. जिल्हास्तरावर पतसंस्थेची नोंदणी करण्याचा हा राज्यातील पहिली घटना आहे.

राज्य शासनाची लाडकी बहिण योजना कार्यान्वित आहे. यात देण्यात येणाऱ्या 1500 रूपयांच्या आर्थिक सहाय्यानंतरचे महिलांनी पुढचे पाऊल टाकले आहे. महिलांनी एकत्र येत लाडकी बहिण योजनेतील लाभार्थी सभासदांची सहकारी पतसंस्था नोंदणी केली आहे. यात सुरवातीलाच 7 हजार 500 सभासद सदस्य झाले आहेत. यात 21 लाख रूपयांचा निधी जमा झाला आहे. यातील सभासद संख्येत वाढ होणार आहे. सदर संस्था ही राज्यातील पहिली जिल्हास्तरीय संस्था म्हणून नोंदणीकृत झाली आहे.

जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या हस्ते पतसंस्थेच्या प्रवर्तकांना संस्था नोंदणीचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी डॉ. रंजन वानखडे, उपनिबंधक कार्यालयाचे सहायक संचालक अनिरूद्ध राऊत उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी, महिलांची पतसंस्था नोंदणी होणे ही ऐतिहासिक बाब आहे. लाडकी बहिण योजनेतून मिळणारे सहाय्य या बँकेच्या माध्यमातून गोळा होणार आहे. कर्ज स्वरूपात देण्यात येणाऱ्या निधीचा सुयोग्य वापर होणे गरजेचे आहे. महिलांचे आर्थिक नियोजन चोख असते. यामुळे पतसंस्थेची आर्थिक शिस्त वाढीस लागेल. त्यासोबतच गरजूंना पतसंस्थेचा लाभ होईल.

महिलांमधील उद्योजकता वाढीस लागावी म्हणून जिल्हा नियोजनमधून 600 बचतगटांना प्रत्येकी एक लाख याप्रमाणे 6 कोटी रूपयांचा निधी देण्यात येणार आहे. त्यासोबतच जिल्ह्यात पहिली प्राथमिक सहकारी सेवा संस्था उभारण्यात येणार आहे. यासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा. यातूनही महिलांमधील उद्योजकता वाढीस लागेल. तसेच आवश्यकता भासल्यास मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमामधूनही कर्ज उपलब्ध होणार आहे. बचतगटांची ही चळवळ जिल्ह्यात खऱ्या अर्थाने महिलांचे सक्षमीकरण करणारी ठरणार आहे.

यावेळी लाडकी बहिण पतसंस्थेच्या अध्यक्ष रजनी भोंडे, उपाध्यक्ष रेशमा सरदार, कोषाध्यक्ष  विद्या धिकार, सचिव ज्योत्स्ना चांगोले,वैशाली चौधरी, सुनिता थोटे, मिना कडव, अनिता वैद्य, पद्मा सरदार, ज्योती बोरकर, भारती वानखडे, संमिता विरूळकर, विद्या काळे, रेखा कासदेकर, शाहिन बांनो फिरोज खान, कौसल्या इखे, शीतल डेहनकर आदी उपस्थित होते.

00000

 





 निम्न पेढी प्रकल्पातील स्थलांतराला वेग द्यावा

-        जिल्हाधिकारी आशिष येरेकर

 

अमरावतीदि. 9 : निम्न पेढी प्रकल्प प्राधान्यक्रमात आहे. त्यामुळे हा प्रकल्प गतीने पुर्ण करण्यात येणार आहे. यासाठी निम्न पेढी प्रकल्पातील बाधित पाच गावांचे भुसंपादन करण्यात आले आहे. आता बाधित गावातील नागरिकांच्या स्थलांतरणाला वेग द्यावाअसे निर्देश जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिले.

निम्न पेढी प्रकल्पाच्या कामाचा आढावा आज जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आला. यावेळी उपजिल्हाधिकारी श्रद्धा उदावंतप्रसेनजित चव्हाण यांच्यासह बाधित पाच गावांचे सरपंच आणि सिंचन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

निम्नपेढी प्रकल्पात हातुर्णागोपगव्हाणकुंड खुर्दअळणगावकुंड सर्जापूर या गावातील जमिनीचे भूसंपादन करण्यात आले आहे. त्यामुळे या गावांत राहणाऱ्या नागरिकांना पुनर्वसित गावात स्थलांतरीत करण्यात येणार आहे. पुनर्वसित गावात प्लॉटचे वाटप करण्यात आले आहे. यासाठी पुनर्वसित गावात नागरी सुविधा पुर्ण करण्यात याव्यात. स्थलांतरणासाठी दोन लाख रूपयांची प्रती कुटुंबाला मदत करण्यात येणार आहे. यासाठी नागरिकांना सरपंचांच्या सहायाने माहिती देण्यात यावे. गावात राहत नसलेल्या कुटुंबाचा शोध घेण्यात यावा. त्यांची सहमती घेऊन स्थलांतरासाठी देण्यात येणारा भत्ता देण्यात यावा.

बाधित गावातील कुटुंबाची मागणी असल्यास त्यांना घरकुल मंजुर करण्यात येणार आहे. यासाठी शासनाच्या नियमाप्रमाणे हप्ते देण्यात येणार आहे. गावातील पाणीवीजनाल्या आणि इतर सुविधांसाठी 57 कोटी रूपयांचा निधी देण्यात आला आहे. याचा योग्य विनियोग होण्यासाठी   गावकऱ्यांची मदत घेतली जाणार आहे. पुनर्वसित गावात पाण्याची समस्या येवू नयेयासाठी प्रयत्न करण्यात यावेत. पाणीपुरवठा आणि अंगणवाडी या सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले.

00000


No comments:

Post a Comment

जिल्हातील घरांसाठी 5 हजार अतिक्रमण नियमानुकूल * शहरीसह ग्रामीण भागातील नागरिकांना लाभ

  जिल्हातील घरांसाठी 5 हजार अतिक्रमण नियमानुकूल * शहरीसह ग्रामीण भागातील नागरिकांना लाभ अमरावती, 13 : सर्वांसाठी घरे उपलब्ध होण्यासाठी श...