Friday, December 5, 2025

DIO NEWS AMRAVATI 05-12-2025

                                                 वाहनांनी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन

 नंबर प्लेट लावण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर

             अमरावती, दि. 05 (जिमाका): केंद्रीय मोटार वाहन नियमान्वये महाराष्ट्र शासनाने सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट (एचएसआरपी) बसविण्याची तरतुद करण्यात आलेली आहे. वाहनांना नंबर प्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी करून होणारे गुन्हे कमी करणे, रस्त्यांवर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटविणे व राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट (एचएसआरपी) बसविणे आवश्यक असून सर्वोच्च न्यायालयाने तसे निर्देश दिले आहे.          

जिल्ह्यातील सर्व वाहनधारकांना, शासकीय, निमशासकीय कार्यालये, बँका यांनी त्यांच्या दि. 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसविणे आवश्यक असून दि. 31 डिसेंबर 2025 पूर्वी बसवून घेण्यात यावी. एचएसआरपी नंबरप्लेट नसलेली वाहने किंवा बनावट एचएसआरपी असलेली वाहनांवर भविष्यात दंडात्मक कारवाई तसेच वाहनांबाबत परिवहन कार्यालयातील कामकाज थांबविण्यात येईल, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांनी केले आहे.

00000

व्हॉट्सॲपवरील मतदार यादीबाबत

उपविभागीय अधिकाऱ्यांकडून खुलासा

            अमरावती, दि. 05 (जिमाका): अमरावती तहसील कार्यालयात सन 2002 ची मतदार यादी उपलब्ध असल्याचा एक व्हॉट्सॲप संदेश सध्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात फिरत आहे. परंतु, हा संदेश पूर्णपणे चुकीचा आणि दिशाभूल करणारा असल्याचे उपविभागीय अधिकारी यांनी स्पष्ट केले आहे.

माहितीनुसार, 4 डिसेंबर 2025 रोजी व्हॉट्सॲपवर एक संदेश प्रसारित झाला होता, ज्यात अमरावतीतील ज्या महिला परराज्यात स्थलांतरित आहेत, विशेषतः जिथे 'एसआयआर' प्रक्रिया सुरू आहे, त्यांच्या आई-वडिलांचे नाव सन 2002 च्या मतदार यादीत शोधण्यासाठी अमरावती तहसील कार्यालयात ती यादी उपलब्ध असल्याचा दावा करण्यात आला होता.

तहसील कार्यालयाच्या निवडणूक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कार्यालयात सन 2002 ची मतदार यादी उपलब्ध नाही. या कार्यालयात नागरिकांसाठी सन 2004 ची मतदार यादी उपलब्ध आहे.

उपविभागीय अधिकारी यांनी अमरावती अंतर्गतच्या सर्व मतदारांना कळविले आहे की, त्यांनी व्हॉट्सॲपवरील या चुकीच्या संदेशावर विश्वास ठेवू नये. ज्यांना 2004 ची मतदार यादी हवी आहे, त्यांनी थेट तहसील कार्यालय, अमरावती येथील निवडणूक विभागात संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

0000000

No comments:

Post a Comment

जिल्हातील घरांसाठी 5 हजार अतिक्रमण नियमानुकूल * शहरीसह ग्रामीण भागातील नागरिकांना लाभ

  जिल्हातील घरांसाठी 5 हजार अतिक्रमण नियमानुकूल * शहरीसह ग्रामीण भागातील नागरिकांना लाभ अमरावती, 13 : सर्वांसाठी घरे उपलब्ध होण्यासाठी श...