Tuesday, August 13, 2024

विभागीय आयुक्त यांची मतदार यादी निरिक्षक म्हणुन नियुक्ती; 14 ऑगस्टला प्रथम भेट

 

विभागीय आयुक्त यांची मतदार यादी निरिक्षक म्हणुन नियुक्ती;

 14 ऑगस्टला प्रथम भेट

 

         अमरावती, दि. 13 (जिमाका): भारत निवडणूक आयोगाने दि. 1 जुलै, 2024 या अर्हता दिनांकावर मतदार यादीचा दुसरा संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. कार्यक्रमाअंतर्गत मतदार यादीच्या कार्यक्रमावर नियंत्रण ठेवण्याकरीता मतदार यादी निरीक्षक म्हणुन विभागीय आयुक्त डॉ. निधि पाण्डेय यांची नेमणुक राज्य मुख्य निवडणुक आयोगाने केली आहे. पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत विभागातील सर्व जिल्ह्यांना संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत तीन भेटी करावयाचे असून अमरावती जिल्ह्याची प्रथम भेट कार्यक्रम बुधवार दि. 14 ऑगस्ट, 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती येथे निश्चित करण्यात आली आहे.

                                                                 000000

No comments:

Post a Comment

जिल्हातील घरांसाठी 5 हजार अतिक्रमण नियमानुकूल * शहरीसह ग्रामीण भागातील नागरिकांना लाभ

  जिल्हातील घरांसाठी 5 हजार अतिक्रमण नियमानुकूल * शहरीसह ग्रामीण भागातील नागरिकांना लाभ अमरावती, 13 : सर्वांसाठी घरे उपलब्ध होण्यासाठी श...