Wednesday, August 21, 2024

निंभोरा शासकीय वस्तीगृहात व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना आवाहन

 

निंभोरा शासकीय वस्तीगृहात व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना आवाहन

 

          अमरावती, दि. 21 (जिमाका) : सामाजिक न्याय विभागाव्दारे संचलित येथील विभागीय स्तर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह, निंभोरा येथे व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रीयेला सुरूवात झाली आहे. वस्तीगृहात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांनी दि. 30 ऑगस्टपर्यंत अर्ज भरून आपला प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन समाजकल्याण वसतीगृहाच्या शाखेकडून करण्यात आलेले आहे.

 

          प्रवेश अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरण्यासाठी https://hmas.mahait.org या लिंकचा वापर करावा. ऑनलाईन भरलेला अर्ज व आवश्यक कागदपत्रांसह विभागीय स्तर शासकीय वस्तीगृह निंभोरा अमरावती येथे जमा करणे अनिवार्य आहे. तरी इच्छुक लाभार्थ्यांनी ऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्याचे आवाहन सामाजिक न्याय विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आलेले आहे.

0000

No comments:

Post a Comment

जिल्हातील घरांसाठी 5 हजार अतिक्रमण नियमानुकूल * शहरीसह ग्रामीण भागातील नागरिकांना लाभ

  जिल्हातील घरांसाठी 5 हजार अतिक्रमण नियमानुकूल * शहरीसह ग्रामीण भागातील नागरिकांना लाभ अमरावती, 13 : सर्वांसाठी घरे उपलब्ध होण्यासाठी श...