Saturday, July 31, 2021

पोलीस कर्मचाऱ्याला सन्मानपूर्वक निरोप महिला व बालविकास मंत्र्यांकडून सॅल्यूट

 




पोलीस कर्मचाऱ्याला सन्मानपूर्वक निरोप

महिला व बालविकास मंत्र्यांकडून सॅल्यूट

 

 ३१ जुलै : पोलीस दलातील कर्मचारी वरिष्ठ अधिकाऱ्यांना अथवा लोकप्रतिनिधींना सॅल्यूट मारताना आपण नेहमी पाहत  असतो. मात्र राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री एडवोकेट यशोमती ठाकूर यांनी आज  आपल्या ताफ्यातील वाहन चालक मारुती किंन्हाके यांना सॅल्युट करत त्यांच्या अविरत प्रामाणिक सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

मारुतीराव किन्हाके 1989 साली पोलीस दलात रुजू झाले गेल्या दोन वर्षांपासून ते महिला आणि बालकविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या ताफ्यात कार्यरत आहेत. यशोमती यांना राज्यभरात त्यांच्या वाहनाचा चालक या निमित्तानं ते सारथ्य करीत असतात. मारुतीराव  यांची आज सेवानिवृत्ती आहे. कारकिर्दीच्या शेवटच्या दिवशी त्यांचं औक्षण करून तसेच त्यांना शाल, श्रीफळ देऊन त्यांचा गौरव श्रीमती ठाकूर यांनी केला तसेच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या मारुतीराव यांनी गेल्या दोन वर्षात केलेल्या सहकार्याबद्दल गौरवोद्गार काढत त्यांना ठाकूर यांनी सॅल्यूट केला तसेच त्यांना भावी आयुष्याबद्दल शुभेच्छा दिल्या.

पालकमंत्र्यांकडून तिवसा नगरपंचायतीच्या कामकाजाचा आढावा

 





पालकमंत्र्यांकडून तिवसा नगरपंचायतीच्या कामकाजाचा आढावा

कामे सुरळीत नसल्याने  पालकमंत्र्यांकडून तीव्र नाराजीबेजबाबदारपणाबद्दल खडसावले

नागरिकांच्या जीवाशी खेळू नका

-  पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

            अमरावतीदि. ३१ : तिवसा शहरात सफाईकामांत नियमितता नाही. डेंग्यूचे रूग्ण वाढत असल्याच्या सतत तक्रारी येत आहेत.  स्वच्छता व आरोग्याच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून नागरिकांच्या जीवाशी खेळू नका. बेजबाबदारपणे वागल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज नगरपंचायत प्रशासनाला दिला.

        तिवसा शहरात डेंग्यूचे रुग्ण वाढत असल्याच्या तक्रारीची दखल घेत पालकमंत्र्यांनी तिथे भेट देऊन पाहणी केली व नगरपंचायतीच्या कामांचा स्वतंत्र बैठकीद्वारे आढावा घेतला. उपविभागीय अधिकारी नरेंद्र फुलझेलेतहसीलदार वैभव फरतारेमुख्याधिकारी पल्लवी सोटेमाजी नगराध्यक्ष वैभव वानखडेनरेंद्र विघ्ने आदी यावेळी उपस्थित होते.

            पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या कीपावसाळ्याच्या काळात डेंग्यूमलेरिया आदी साथरोग प्रतिबंधासाठी नालेसफाईऔषध फवारणीसर्व ठिकाणी नियमित स्वच्छता आवश्यक आहे. मात्रशहरात अस्वच्छतेमुळे डेंग्यूचे रुग्ण वाढत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर येत आहेत. अशा तक्रारींची दखल घेऊन वेळीच सुधारणा होणे आवश्यक आहे. सार्वजनिक स्वच्छतानागरिकांच्या आरोग्याची जपणूक हे शासनाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. त्यासाठी ज्या ज्या सुविधा पाहिजेतत्यासाठी निधीची कधीही कमतरता पडू दिलेली नाही. याबाबत वेळोवेळी सूचनानिर्देश देऊनही सुधारणा झाल्याचे दिसत नाही. ही अत्यंत गंभीर बाब आहे. अशा बेजबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई केली जाईल.

  पाणीपुरवठ्याबाबतही मोठ्या प्रमाणावर तक्रारी आहेत. पाणी गढूळ असल्याच्या तक्रारी आहेत. पुरवठ्याच्या कामात तत्काळ सुधारणा करावी. शहरातील सफाईकामे तत्काळ सुरळीत करावी. सर्व ठिकाणी स्प्रेईंगफॉगिंगमध्ये सातत्य ठेवावे. कुठल्याही कामात हयगय चालणार नाही. या परिस्थितीत तत्काळ सुधारणा दिसली पाहिजे. आपण स्वत: पुन्हा येऊन याबाबत आढावा घेऊअसे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

 

गोरगरीब व गरजू रुग्णांसाठी ग्रामीण आरोग्य यंत्रणेचे बळकटीकरण पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर

 













पावणेसात कोटी रुपये निधीतून आरोग्य उपकेंद्रे, रस्ते, विश्रामगृह विस्तारीकरण

भिवापूर, बोर्डा, वणी ममदापुर येथील आरोग्य उपकेंद्राचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमीपूजन

गोरगरीब  गरजू रुग्णांसाठी ग्रामीण आरोग्य यंत्रणेचे बळकटीकरण

पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर

 

अमरावती, दि.  :जिल्ह्यात ठिकठिकाणी आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, रुग्णालयांचे श्रेणीवर्धन अशी अनेक कामे आकारास येत आहेत. त्यामुळे ग्रामीण आरोग्य यंत्रणेचे बळकटीकरण होऊन  गोरगरीब  गरजू रुग्णांना उत्तम दर्जाची उपचार सुविधा निर्माण होईल, असे प्रतिपादन राज्याच्या महिला  बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी विविध आरोग्य उपकेंद्रांच्या शुभारंभप्रसंगी केले.भिवापूर, बोर्डा, वणी ममदापुर या तीन ठिकाणी आरोग्य उपकेंद्राचे, तसेच आखतवाडा येथील काँक्रीट रस्त्याचे भूमीपूजन, तसेच मोझरी  तिवसा येथील शासकीय विश्रामगृहाच्या विस्तारीकरणाचा शुभारंभ आज पालकमंत्र्यांच्या हस्ते झाला. भिवापूर  बोर्डा उपकेंद्रासाठी प्रत्येकी ७५ लाख, वणी ममदापुर उपकेंद्र  इतर विकासकामांसाठी  कोटी, आखतवाड्यात रस्त्यासाठी १० लक्ष, तिवसा  मोझरी शासकीय विश्रामगृहाच्या विस्तारीकरणासाठी प्रत्येकी  कोटी अशी सुमारे पावणेसात कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.  जि. . सभापती पूजाताई आमले, पं.. सभापती शिल्पाताई हांडे, पं.. सदस्य अब्दुल सत्तार, भिवापूरचे सरपंच भारत जाधव, बोर्डा येथील सरपंच, वणी ममदापुरचे सरपंच मुकुंदराव पुनसे, वासुदेव महाराज, प्रल्हादराव चव्हाण आदी यावेळी उपस्थित होते.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, कोरोना महामारीच्या काळात मोठे नुकसान झाले. अनेक अडचणी आल्या. आता तिसरी लाट येऊ नये अशी प्रार्थना करूया. ही संभाव्य लाट रोखण्यासाठी सर्वंकष प्रयत्न होत आहेत. याच काळात आरोग्य सेवेचा दर्जा उंचावण्यासाठी विविध ठिकाणी आरोग्य केंद्रांची निर्मिती, श्रेणीवर्धन, अनेक सोयीसुविधांची उभारणी होत आहे. त्याचप्रमाणे, गावांमध्ये आवश्यकतेनुसार स्मशानभूमी, शेड आदी कामेही पूर्ण करण्यात येतील. उपकेंद्राचे काम गुणवत्तापूर्ण  विहित वेळेत पूर्ण करावे, असे निर्देशही त्यांनी दिले. 

 

पुढील काळातही अनेक कामांचे नियोजन

 

अनेक कामे पूर्ण झाली, अनेक सुरू आहेत. पुढेही अनेक कामे करावयाची आहेत. त्यामुळे थांबून चालणार नाही.अभी तो नापी है जमी मुठ्ठीभर, अभी तो आसमां बाकी है अशा शब्दांत पालकमंत्र्यांनी विविध कामांतून विकासाला गती देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला.

आरोग्य उपकेंद्रासाठी पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्या प्रयत्नाने वाढीव निधी मिळाला. त्याशिवाय, स्वतःच्या स्थानिक विकास निधीतूनही निधी मिळवून दिला. त्यामुळे सुसज्ज व्यवस्थेसह  उपकेंद्रे साकारणार आहेत, असे भिवापूरचे सरपंच श्री. जाधव यांनी सांगितले.

पालकमंत्र्यांकडून ग्रामीण आरोग्य यंत्रणेची पाहणी

मार्डी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचीही पाहणी पालकमंत्र्यांनी आज केली. रुग्णालयात पुरेसा औषध साठा असावा. नागरिकांना वेळीच औषधे उपलब्ध करून द्यावीत. सेवेबाबत तक्रारी येता कामा नये, असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले. यावेळी त्यांनी रुग्णांशीही संवाद साधून त्यांची विचारपूस केली.

 

                              ०००

 

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...