निवडणूक खर्चाचा ताळमेळ अचूकपणे नोंदवा - निवडणूक निरीक्षक रामकृष्ण बंडी






अमरावतीदि. 19 : विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीतील उमेदवारांची खर्चाची तपासणी व ताळमेळ प्रक्रिया सुरु आहे. हा प्रक्रियेचा शेवटचा टप्पा असून उमेदवारांनी सादर केलेला खर्च व खर्च तपासणी चमू या दोघांच्याही खर्चाच्या आकडेवारीत तफावत आढळल्यास त्याविषयी सुस्पष्ट माहिती घेऊन नेमका अचूक खर्च नोंदवावाअसे निर्देश निवडणूक निरीक्षक रामकृष्ण बंडी यांनी आज दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित निवडणूक खर्च ताळमेळासंदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होतीत्यावेळी ते बोलत होते. निवडणूक निरीक्षक जॉर्ज जोसेफनवनीतकुमारजिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी शैलेश नवालउपजिल्हा निवडणूक अधिकारी शरद पाटीलखर्च तपासणी पथकाचे नोडल ऑफीसर तथा डेप्युटी कॅफो दत्तात्रय फिस्के तसेच उमेदवारांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
श्री. बंडी म्हणाले कीनिवडणूक लढविलेल्या उमेदवारांना आज तारखेपर्यंत निवडणूक खर्च शॅडो रजिस्टरमध्ये नोंदवून सादर करणे बंधनकारक आहे. रजिस्टरनुसार उमेदवारांनी दाखविलेल्या खर्च आणि खर्च तपासणी पथक यांचा खर्च या दोघांमध्ये तफावत आढळून आल्यास सबंधित सहायक खर्च निरीक्षकांनी दिवसनिहाय खर्चाची तपासणी करुन ताळमेळ करावा. ताळमेळ करताना जो खर्च अधिक असेल तो ग्राह्य धरुन निवडणूक आयोगाला सादर करावा. तसेच ज्या उमेदवारांकडून खर्चाचे शॅडो रजिस्टर सादर केले जाणार नाही त्यांच्यावर निवडणूक आयोगाच्या कलमान्वये कायदेशीर कारवाई करण्यात येईलअसे त्यांनी सांगितले.
मुख्यत: वस्तुंचे दर व त्याचे प्रमाण या बाबीमध्ये फरक आढळून येत असल्यास आयोगाकडून ठरवून दिलेल्या दरपत्रकानुसार दर ग्राह्य धरुन खर्च नोंदवावा. तपासणीअंती ज्या उमेदवारांना ग्राह्य खर्चाबाबत आक्षेप असल्यास त्यांनी योग्य पुराव्यानिशी स्पष्टीकरणासह उद्या (20 नोव्हेंबर ) होणाऱ्या जिल्हा खर्च देखरेख समितीच्या बैठकीत हजर राहण्याचे सूचना द्यावी. ज्या उमेदवारांना निवडणूक खर्च मान्य असेल त्यांचे खर्चाचे रजिस्टर फॉर्म-सी व फॉर्म-बी ईत्यादी कागदपत्रासह जिल्हा खर्च देखरेख समितीला सादर करावेअसेही त्यांनी सांगितले.
  ज्या मतदारसंघात निवडणूक खर्च संदर्भात काही विवाद असल्यास उमेदवारांनी योग्य स्पष्टीकरण जिल्हा खर्च देखरेख समितीसमोर मांडावे. प्रत्येक उमेदवाराचा दिननिहाय खर्चाचा ताळमेळ करावातसेच खर्चात काही तफावत किंवा विसंगती आढळून आल्यास खर्चाच्या सिध्दतेसाठी विहित पुरावे समितीला सादर करावेअशी सूचना जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. नवाल यांनी दिल्या.
बैठकीत निवडणूक निरीक्षक जार्ज जोसेफ व नवनीतकुमार यांनी सुध्दा निवडणूक खर्च नोंदणी प्रक्रिया याविषयी उमेदवारांच्या प्रतिनिधींना मार्गदर्शन केले.
00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती