इंदिराबाई मेघे महिला महाविद्यालयाच्या
एनएसएसच्या निवासी शिबिराचे उद्घाटन
अमरावती, दि. 17 : विदर्भ युथ वेल्फेअर सोसायटीच्या इंदिराबाई मेघे महिला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष शिबिर आष्टी घेण्यात येत आहे. सदर शिबीर दि. 15 ते 22 फेब्रुवारीदरम्यान होणार आहे. या शिबिराचे उद्घाटन रविवार, दि. 16 फेब्रुवारी रोजी करण्यात आले.
उद्घाटन सोहळ्याला विदर्भ युथ वेल्फेअर सोसायटीचे कार्यकारणी सदस्य प्रा. गजानन काळे अध्यक्षस्थानी होते. आष्टीचे सरपंच दिलीप जवंजाळ यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. राष्ट्रीय सेवा योजनेचे सल्लागार समिती सदस्य गणेश भारती यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
प्रा. काळे यांनी शिबिरार्थींनी शिबिरादरम्यान विविध उपक्रम राबवून सामाजिक जाणीव वृद्धिंगत करावी. तसेच गावातील समस्या सोडविण्यासाठी मार्गदर्शन केले. विशेष शिबिरामधून विद्यार्थ्यांनी व्यक्तिमत्व विकास करावा याबाबत मार्गदर्शन केले.
प्राचार्य डॉ. सीमा अढाऊ यांनी प्रास्ताविक केले. प्रा. अनुप आत्राम यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रम अधिकारी प्रा. अरुणा तसरे यांनी आभार मानले. यावेळी प्रा. डॉ. वंदना भोयर, प्रा. वंदना हिवसे, डॉ. वामन जवंजाळ, उत्तमराव जवंजाळ, सुभाष नितनवरे, विशुद्ध जवंजाळ, आनंद जवंजाळ, सुनंदा जवंजाळ उपस्थित होते.
00000
पेन्शन अदालतीचे 5 मार्चला आयोजन
अमरावती, दि. 29 (जिमाका) : भारतीय डाक विभागामार्फत पेन्शन अदालतीचे आयोजन दि. 5 मार्च रोजी सकाळी 11.30 वाजता मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई -400 001 येथे आयोजित करण्यात आली आहे.
निवृतिवेतनधारकांच्या लाभाशी संबधित तक्रारी, टपाल विभागातून निवृत्त झाले आहेत, ज्यांचा सेवेत असताना मृत्यू झालेला आहे, टपाल विभाग, महाराष्ट्र गोवा राज्याचे निवृत्तीवेतनधारक ज्याचे 3 महिन्याच्या आत पूर्तता झालेली नाही, अशा प्रकरणाचा डाक पेंशन अदालतीमध्ये विचार केला जाणार आहे. निवृत्ती वेतनधारकानी विहित नमुन्यात अर्जाच्या तीन प्रति लेखा अधिकारी तथा सचिव, पेन्शन अदालत, मुख्य पोस्टमास्तर जनरल कार्यालय, महाराष्ट्र सर्कल, मुंबई जीपीओ भवन, दुसरा मजला मुंबई - 400001 या पत्यावर पाठवावे, असे आवाहन डाक विभागातर्फे करण्यात आले आहे.
000000
ग्रेस गुणांचे अर्ज ‘आपले सरकार’ द्वारे स्वीकारणार
*१० मार्च पर्यंत मुदत
अमरावती, दि. १७: दरवर्षीप्रमाणे इयत्ता १०वी व १२वी खेळाडू विद्यार्थ्यांचे ऑफ लाइन अर्ज मागविले जातात. माहितीचे संकलन कार्यालयाद्वारे हे गुण माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मंडळात पाठवले जातात. सन २०२४-२५ पासून ग्रेस गुणासाठी केली जाणारी प्रक्रिया ‘आपले सरकार’ पोर्टल द्वारा ऑनलाईन करण्यात आले आहे. त्यामुळे खेळाडू विद्यार्थ्यांनी या पोर्टलद्वारे सर्व अर्ज ऑनलाईन प्रणालीद्वारे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्याकडे १० मार्च, २०२५ पर्यंत सादर करावे, असे जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
खेळाडू विद्यार्थी, जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय यांनी आपले सरकार ॲपद्वारे या वर्षीपासून सवलत गुणांचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरावा. जिल्हा, विभाग, राज्य व राष्ट्रीय स्पर्धेतील सहभाग अथवा प्राविण्यासाठी सवलत गुणांसाठी केवळ ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. या अर्जाची प्रत शिक्षण मंडळासही प्रणालीद्वारे आपोआप पाठवली जाईल. त्यासंदर्भात कोणताही खेळाडू जिल्हा क्रीडा कार्यालय, अथवा शिक्षण मंडळास ऑफलाइन पद्धतीने अर्ज करणार नाहीत. अशा प्रकाराचा ऑफलाइन अर्ज कोणत्याही जिल्हा क्रीडा कार्यालयाकडून स्वीकारला जाणार नाही, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद आहे.
000
दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा आज
नोकरी इच्छुक उमेदवारांना मिळणार रोजगारांची सुवर्ण संधी
अमरावती,१७ (जिमाका) : सुशिक्षित नोकरी इच्छुक उमेदवारांना स्थानिक तसेच इतर जिल्ह्यांतील नामवंत खासगी कंपन्या, कारखाने आणि उद्योगसमूहांच्या माध्यमातून चांगल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडल करिअर सेंटर तसेच विद्याभारती औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अमरावती यांचे संयुक्त विद्यमाने रोजगार मेळाव्याचे आयोजन उद्या, दि. १८ फेब्रुवारी, २०२५ रोजी होणार आहे, या मेळाव्यामध्ये विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
अमरावती जिल्हयातील युवक, युवतींना नोकरीच्या संधी मिळवून देण्याच्या उद्देशाने जास्तीत -जास्त उमेदवारांना रोजगार मेळाव्यामधून नोकरी देण्याचा प्रयत्न जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अमरावती व्दारे करण्यात येतो. यावेळी विविध आस्थापनांचे , कंपन्यांचे प्रतिनिधी प्रत्यक्ष उपस्थित राहून उमेदवारांच्या थेट मुलाखती घेतील व मुलाखत देऊन पात्र ठरणा-या उमेदवारांना नोकरीची संधी मिळेल.
याबाबत काही अडचण असल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अमरावती या कार्यालयाच्या दुरध्वनी क्रमांक ०७२१-२५६६०६६ किंवा Email amravatirojgar@gmail.com वर संपर्क करावा तसेच १८ फेब्रुवारी, २०२५ रोजी, विद्याभारती औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अमरावती, ता.जि.अमरावती, ता. जि. अमरावती येथे स्वखर्चाने बायोडाटा, पासपोर्ट फोटो व आवश्यक कागदपत्रासंह प्रत्यक्ष उपस्थित रहावे असे आवाहन सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अमरावती यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment