Tuesday, February 4, 2025

DIO NEWS AMRAVATI 4.2.2025






 शासकीय गायरान जमिनीवर मग्रारोहयो अंतर्गत चारा लागवड:   दुग्धोत्पादनाला चालना

अमरावती दि.4 फेब्रुवारी (जिमाका:) शासकीय गायरान जमिनीवर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मग्रारोहयो) चारा लागवड करून दुग्धोत्पादनाला चालना देण्याचा महत्त्वपूर्ण उपक्रम दर्यापूर  तालुक्यातील टोंगलाबाद येथे सुरू झाला आहे. कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष अॅड. निलेश हेलोंडे पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे हा उपक्रम साकारला आहे.

            टोंगलाबाद येथे ग्रामपंचायत, पंचायत समिती दर्यापूर, पशुसंवर्धन विभाग आणि गटविकास अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचा शुभारंभ झाला. यावेळी सरपंच वैशाली पानझाडे, गटविकास अधिकारी सी. जे. ढवके, पशुसंवर्धन विभागाचे सहायक उपायुक्त डॉ. बोडखे, पशुधन विकास अधिकारी डॉ. निचड यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

दोन हेक्टरवर चारा उत्पादन: टोंगलाबाद येथील दोन हेक्टर शासकीय गायरान जमिनीवर हिरव्या चाऱ्याची लागवड करण्यात आली आहे. यामधून सुमारे 650 टन चारा उत्पादन होईल, असा अंदाज आहे. याव्यतिरिक्त, पुढील तीन महिन्यांत आणखी चारा उपलब्ध होणार आहे. या उपक्रमांतर्गत दर्यापूर तालुक्यातील 74 ग्रामपंचायतींना हिरव्या चाऱ्याचे थांबे (रोपे) पुरवले जाणार आहेत.

राज्यातील 14 जिल्ह्यांसाठी आदर्श: कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनच्या माध्यमातून राज्यातील 14 जिल्ह्यांमध्ये हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. टोंगलाबाद येथील प्रकल्प इतर जिल्ह्यांसाठी आदर्श ठरणार आहे, असे अॅड. निलेश हेलोंडे पाटील यांनी सांगितले.

शेतकरी समृद्धीचा मार्ग: या उपक्रमामुळे जनावरांना पुरेसा चारा मिळेल, दुग्ध उत्पादन वाढेल आणि शेतकऱ्यांचे उत्पन्नही वाढेल. यामुळे शेतकऱ्यांच्या समृद्धीचा मार्ग प्रशस्त होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

                                                                   000000

राष्ट्रीय नमुना पाहणी 80 वी फेरी

आरोग्यविषयक सर्वेक्षणाची माहिती गोळा करणार

अमरावती,दि.4 फेब्रुवारी (जिमाका) :राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या धर्तीवर, अर्थ व सांख्यिकी संचालनालय, महाराष्ट्र शासन हे ‘कुटुंबाचा आरोग्यविषयक होणारा खर्च’ विषयावर राष्ट्रीय स्तरावरील पाहणीत सहभागी होत आहे. या सर्वेक्षणासाठी  डिसेंबर 2025 पर्यंत  माहिती संकलित केली जाणार आहे. सर्वेक्षण राज्यतील सर्व जिल्ह्यांमध्ये राबविले जाणार असून यामध्ये पुढील माहिती संकलित केली जाईल .

सर्वेक्षणाचा मुख्य उद्देश म्हणजे शासकीय व खाजगी रुग्णालय , दवाखान्यातून मिळणाऱ्या उपचारांवर होणारा खर्च, कुटुंबांचा आरोग्यविषयक होणारा खर्च, सर्व वयोगटातील लसीकरण, गर्भवती महिलांना मिळणाऱ्या सुविधांचा तपशिल इत्यादी बाबींची माहिती गोळा करणे हा आहे.  सर्वेक्षणांतर्गत कुटुंबांची निवड     ‘ एक वर्ष किंवा एक वर्षापेक्षा कमी वयाचे मुल असणारे कुटुंब’ आणि मागील 365 दिवसांमध्ये रुग्णालयामध्ये दाखल असणारी कुटुंबातील व्यक्ती ' यामधून करण्यात येणार आहे. सर्वक्षणाच्या निष्कर्षाचा उपयोग आरोग्य सेवा क्षेत्रात सुधारणा आणि शासनाच्या धोरणात्मक निर्णयाचीअंमलबजावणी करण्यासाठी होतो. राष्ट्रीय तसेच राज्य पातळीवर प्रभावी निर्णय घेणे शक्य व्हावे, यासाठी सर्वेक्षणाच्या माहितीची सत्यता व गुणवत्ता अत्यंत महत्त्वाची आहे.

कुटुंबांकडून सदर सर्वेक्षणाची माहिती अर्थ व सांख्यिकी संचालनालयाचे प्रशिक्षित अधिकारी व

कर्मचारी, (सांख्यिकी सहायक व अन्वेषक संवर्गातील) फेब्रुवारी 2025 ते डिसेंबर 2025 या कालावधीमध्ये जिल्ह्यातील ग्रामीण भागातील निवडक गावे व शहरी भागातील निवडक भागातील निवडक कुटुंबांना प्रत्यक्ष भेटी देऊन आरोग्यविषयक माहीती गोळा करतील.

या सर्वेक्षणाकरिता घरी येणाऱ्या उपरोक्त अधिकारी व कर्मचारी यांना आपल्या कुटुंबाची आरोग्य विषयक माहिती, रुग्णालयात भरती असतांना आजारपणावर झालेल्या खर्चाबाबतची योग्य व परिपूर्ण माहिती देण्यासाठी जिल्हयातील सर्व संबंधित कुटुंबीयांनी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी सांख्यिकी अधिकारी, जिल्हा सांख्यिकी कार्यालय, अमरावती येथे संपर्क साधावा.

000000

राज्य युवा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 अमरावती,दि.4 फेब्रुवारी (जिमाका)  : राज्य युवा पुरस्कारासाठी सन 2023-24 क्रीडा विभागाच्या क्षेत्रीय विभागस्तरानुसार प्रत्येक विभागातील 1 युवक, 1 युवती व 1 नोंदणीकृत संस्था यांना देण्यात येणार आहेत. या पुरस्काराचे स्वरुप युवक-युवती यांना रोख 50 हजार  रुपये तर संस्थेस 1 लाख रुपये तसेच गौरवपत्र, सन्मानचिन्ह असे राहणार आहे.

राज्य युवा पुरस्कारासाठी युवक अथवा युवा विकासाचे कार्य करणा-या संस्था यांची गत तीन वर्षामध्ये

केलेल्या कामगिरीचे मुल्यांकन विचारात घेण्यात येणार असून राज्य युवा पुरस्कार सन 2023-24  साठी  दि. 15 फेब्रुवारी2025 रोजी पंर्यत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अमरावती येथे सादर करणे आवश्यक राहणार आहे. अर्जाचा नमुना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अमरावती किंवा https//sports. maharashtra.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध राहतील. जास्तीत-जास्त युवा व युवा विकासाचे कार्य करणाऱ्या संस्था यांनी पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे.

000000

महिला तक्रार निवारण समिती स्थापन करण्याबाबत सूचना

अमरावती,दि.4 (जिमाका): कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई आणि निवारण) अधिनियम 2013 अंतर्गत, जिल्ह्यातील सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय ,अमरावती अंतर्गत नोंदणीकृत झालेल्या संस्था, ज्या आस्थापनेवर 10 किंवा 10 पेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत आहेत अशा प्रत्येक शासकीय , निमशासकीय संस्था, सोसायटी, ट्रस्ट यांनी कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई आणि निवारण) अधिनियम 2013 अंतर्गत 10 किंवा 10 पेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत आहेत, अशा प्रत्येक आस्थापनेमध्ये अंतर्गत महिला तक्रार निवारण समिती गठित करावी. तसेच आपल्या अधिनस्त असणाऱ्या 10 किंवा 10 पेक्षा जास्त  कर्मचारी असणाऱ्या आस्थापनांची नावे, पत्ता, इमेल, संपर्क क्रमांक यांची माहिती अमरावती जिल्हाधिकारी यांना सादर करुन त्याची एक प्रत या कार्यालयास पाठवावी, असे धर्मादाय सह आयुक्त, अमरावती विभाग, अमरावती यांनी कळविले आहे.

000000



प्रविण पेटे हिरोजी इंदुलकर पुरस्काराने सन्मानित

        अमरावती, दि. 4 (जिमाका):  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे  तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते  ‘स्वराज्य अभियंता हिरोजी इंदुलकर’ या पुरस्काराचे नुकतेच वितरण करण्यात आले .  सहायक संचालक नगर रचना मूल्यांकन कार्यालयात कार्यरत नगर रचनाकार प्रविण पेटे यांना  हा पुरस्कार  प्रदान करण्यात आला.स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे .

000000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...