Wednesday, February 5, 2025

DIO NEWS AMRAVATI 5.2.2025

 शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांचा आज अमरावती दौरा

अमरावती, दि. 05 : शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे गुरूवार, दि. 6 फेब्रुवारी रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. सकाळी नागपूरहून अमरावतीकडे प्रस्थान केल्यानंतर, ते सकाळी 9 वाजता अमरावती महानगरपालिका हद्दीतील विविध शाळांना भेटी देतील.

दुपारी 1 वाजता सिपना अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीला उपस्थित राहतील. सायंकाळी 5 वाजता 'उपक्रमशील शिक्षक' चर्चासत्रात भाग घेतील. त्यानंतर सायंकाळी 7.30 वाजता शासकीय विश्रामगृहात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधतील. रात्री 8.30 वाजता ते छत्रपती संभाजीनगरकडे रवाना होतील.  

000000

धारणी येथे रविवारी विधी सेवा महाशिबीर

शासकीय योजनांचा महामेळावा

अमरावती, दि. 05 : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा. मुंबई यांच्या वतीने धारणी येथील जिल्हा परिषद शाळेचे मैदानावर विधी सेवा महाशिबीर आणि शासकीय योजनांचा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. रविवार, दि. 9 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

महामेळाव्याला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई, न्यायमूर्ती अभय ओक, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे, न्यायमूर्ती अतुल चांदूरकर, न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे, उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूरचे वरिष्ठ प्रशासकीय न्यायमूर्ती नितीन सांबरे, पालक न्यायमूर्ती वृषाली जोशी उपस्थित राहणार आहेत

महामेळाव्यामध्ये वंचित, दुर्बल घटक, कामगार, दिव्यांग, महिला आदींना विधी सेवा प्राधिकरणामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली जाणार आहे. तसेच इतर शासकीय विभागाच्या योजनांची माहिती आणि त्यांच्या समस्या जाणून कायदेशीर मार्गदर्शन करण्यात येणार आहे् तसेच गरजू आणि पात्र नागरिकांना कल्याणकारी योजनांचा लाभ दिल्या जाणार आहे. यात 32 हजार लाभार्थी निवडण्यात आले असून रविवारी दिड हजारावर नागरिकांना लाभ देण्यात येणार आहे.

शिबीरामध्ये विविध शासकीय विभाग, स्वयंसेवी संस्था, तसेच कायदेतज्‍ज्ञांनाचा सहभाग राहणार आहे. सोबतच मोफत कायदेविषयक सल्ला, इतर योजनाचे सामाजिक कल्याणकारी फायदे आणि विविध कायदेशीर हक्कांबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

नागरीकांनी विधी सेवा आणि शासकीय योजनाचा लाभ घेण्याकरीता मेळाव्याला उपस्थित राहावे, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष सुधाकर यार्लगड्डा, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव मंगला कांबळे यांनी केले आहे.

000000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...