अमरावती ग्रंथोत्सवाला आजपासून सुरुवात
*ग्रंथ प्रदर्शन, विक्री व साहित्यिक मेळावा
अमरावती, दि. 28 (जिमाका) : अमरावती ग्रंथोत्सव 2024चे उद्घाटन आमदार
प्रतापदादा अडसड यांच्या हस्ते विभागीय शासकीय ग्रंथालय येथे आज पार पडले.
पोद्दार इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य सुधीरकुमार महाजन, जिल्हा ग्रंथालय
अधिकारी डॉ. सुरज मडावी, सहायक ग्रंथालय संचालक डॉ. राजेश पाटील, जिल्हा ग्रंथालय संघाचे
अध्यक्ष चंद्रकांत चांगदे, राम देशपांडे, नंदकिशोर बजाज, प्रवीण खांडेकर, ग्रंथालय
निरीक्षक गजानन कुरवाडे आदी उपस्थित होते.
आमदार श्री. अडसड यांनी, बुद्धीचा विकास करण्यासाठी वाचनाची सवय आवश्यक
आहे. नवयुवकांनी विविध विषयांवरील वाचनावर भर द्यावा. माणसामध्ये प्रगल्भता विकसित
होणे, तसेच अनुभव, शब्दसंग्रह वाढून अनुभवविश्व समृद्ध करण्यासाठी वाचनाला पर्याय नाही.
ग्रंथालयाच्या विकासासाठी प्रलंबित प्रश्नांचा पाठपुरावा करण्यात येणार आहे. मुलांनी
आभासी जगतातून पुस्तकांकडे वळणे आवश्यक आहे. नवकल्पना मिळण्यासाठी, नवसंकल्पना रुजविण्यासाठी
ग्रंथवाचन आवश्यक आहे. ग्रंथाच्या माध्यमातून व्यवहार कुशलता येत असल्याचे सांगितले.
उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय आणि अमरावती जिल्हा ग्रंथालय
अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यामाने अमरावती ग्रंथोत्सव-2024चे आयोजन संत ज्ञानेश्वर
सांस्कृतिक भवनाजवळील विभागीय शासकीय ग्रंथालयात करण्यात आले आहे. ग्रंथोत्सव शनिवार,
दि. 1 मार्चपर्यंत ग्रंथविक्री सुरू राहणार आहे.
ॲड. प्रिती रेवणे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. राजेश पाटील यांनी आभार
मानले.
00000
गोल्डन कार्डने कुटुंबाला 5 लाखापर्यंत उपचार
अमरावती, दि. 28 (जिमाका) : आयुष्यमान भारत प्रधानमंत्री
जनआरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी गोल्डन
कार्ड देण्यात येत आहे. या कार्डद्वारे प्रत्येक कुटुंबाला 5 लाखापर्यंत मोफत उपचार
मिळणार आहे.
आपत्कालीन परिस्थितीमध्ये तात्काळ चांगल्या रूग्णालयामध्ये उपचाराची गरज
असते. यामुळे गोल्डन कार्ड काढणे महत्त्वाचे झाले आहे. महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य
योजनेंतर्गत 5 लाखापर्यंत उपचार, तसेच मान्यताप्राप्त रूग्णालयात मोफत उपचार करण्यात
येते. त्यासाठी आरोग्य विभागाकडून नागरिकांना गोल्डन कार्ड देण्यात येत आहे.
सध्या हे कार्ड देण्यासाठी
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. ज्यांनी हे कार्ड
काढलेले नाही त्यांनी जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामपंचायत, नगरपरिषद,
आरोग्य कर्मचारी, आशा, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक यांच्याशी संपर्क करावा. व लिस्ट
चे करून कार्ड काढून घ्यावे.
लाभ घेण्यासाठी पात्रता:
आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी शासन निर्णयानुसार सव
अंत्योदय, पिवळे, केशरी, पांढरे रेशन कार्ड धारक असावा.
जिल्ह्यात विशेष मोहिम:
मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र यांच्या सूचनेनुसार व जिल्हा आरोग्य अधिकारी
डॉ. सुरेश असोले व अतिरिक्त जिल्हा आरोग्य
अधिकारी डॉ. प्रविण पारिसे यांच्या मार्गदर्शखाली आरोग्य विभाग तसेच इतर विभागाच्या
समन्वयाने अमरावती जिल्ह्यात गोल्डन कार्ड काढयाची विशेष मोहिम राबविली जात आहे.
गोल्डन कार्डसाठी ऑनलाईन 12 अंकी रेशनकार्ड, आधारकार्ड आणि त्यांच्याशी
संलग्नित मोबाईल, स्वत: लाभार्थी, मूळ रेशनकार्ड, आयुष्मान भारत ई-कार्ड, मूळ आधारकार्ड
ही कागदपत्रे आवश्यक आहेत. आयुष्मान गोल्डन कार्ड हे आशासेविका, कॉमन सर्विस सेंटर,
आपले सरकार केंद्र, रूग्णालयातील मित्राकडे कार्ड काढू शकतो. लाभार्थीं स्वत: मोबाईलवर
पीएमजे ॲप डाऊनलोड करून कार्ड काढू शकतो. तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मदतीने कार्ड
काढू शकतो.
सदर योजनेशी अंगीकृत असलेल्या 34 स्पेशालिटी रूग्णालयात या योजनेचा लाभ
मिळणार आहे. योजनेतून 1 हजार 356 गंभीर आजारांवर प्रती कुंटुब 5 लाखापर्यंत मोफत उपचार
मिळणार आहे. त्यामुळे पात्र नागरिकांनी गोल्डन कार्ड काढावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य
अधिकारी डॉ. सुरेश असोले यांनी केले आहे.
000000
No comments:
Post a Comment