Tuesday, February 25, 2025

DIO NEWS AMRAVATI 25-02-2025

 

अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ यांचा  दौरा

 

अमरावती, दि. 25 (जिमाका) : अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ हे गुरूवार, दि. 27 फेब्रुवारी रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

दौऱ्यानुसार, श्री. झिरवाळ यांचे गुरूवारी सकाळी 10 वाजता विभागीय आयुक्त कार्यालय येथे आगमन होईल. त्यानंतर सकाळी 10 वाजता विभागीय आयुक्त कार्यालयात अन्न व औषध प्रशासन विभाग आणि सकाळी 11 वाजता विशेष सहाय्य विभागाची बैठक घेतील. सकाळी 11.30 वाजता पत्रकारांसोबत अनौपचारिक चर्चा करतील. दुपारी 12 ते 1.30 वाजता शासकीय विश्रामगृह येथे राखीव राहिल. दुपारी 1.45 वाजता बडनेरा येथील शासकीय आश्रमशाळेस भेट देतील. त्यानंतर सांयकाळी 5 वाजता अमरावतीहून नागपूरकडे रवाना होतील.

00000

 






पाच अनाथ मुलींच्या पालकांनी संपर्क साधण्याचे आवाहन

 

अमरावती, दि. 25 (जिमाका) : जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाने पाच मुलींच्या माहितीसाठी निवेदन प्रसिद्ध केले आहे. या मुली अनाथ असून त्यांना त्यांच्या आई-वडिलांचा शोध घेण्यासाठी, तसेच पालकांनी बाल कल्याण समितीशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

 

लक्ष्मी जनकरामसिंग धुर्वे (वय 16 वर्षे) ही वरुड बसस्थानकावर बेवारस स्थितीत आढळली आहे. सिता प्यारासिंग पवार (वय 14 वर्षे) ही रेल्वेमध्ये भीक मागताना पोलिसांना आढळली आहे. सीमा हिरालाल मावसकर (वय 14 वर्षे) ही वडाळा रेल्वे स्टेशनवर तिच्या सावत्र वडिलांच्या सक्तीमुळे भीक मागताना आढळली आहे. दीक्षा योगेश इंगळे (वय 14 वर्षे) ही कुटुंबातील शारीरिक छळामुळे पोलिसात तक्रार दाखल केली आहे. राणी बुधिया पवार (वय 11 वर्षे ही जालना येथे जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल झाली. त्यानंतर तिला बाल कल्याण समितीसमोर हजर करण्यात आले आहे.

 

या पाच मुली सध्या अमरावतीमधील वेगवेगळ्या बालगृहांमध्ये वास्तव्यास आहेत. त्यांच्या आई-वडिलांविषयी किंवा नातेवाईकांविषयी कोणतीही माहिती उपलब्ध नाही. या मुलींविषयी माहिती असल्यास जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, अमरावती येथे संपर्क साधावा. तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, राणी दुर्गावती चौक, कॅम्प रोड, अमरावती, दूरध्वनी क्रमांक 0721-2990412, ईमेल: dcpu.amravati@gmail.com यावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 04-09-2025

  जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपाच्या ४५ पदांसाठी रोजगार मेळावा     अमरावती, दि. ४ : जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपा तत्त्वावरील ४५ पदांवर न...