महिला दिनानिमित्त शनिवारी वॉकथॉनचे आयोजन
अमरावती, दि. 6 (जिमाका) : आंतरराष्ट्रीय
महिला दिनानिमित्त जिल्हा प्रशासनातर्फे शनिवार, 8 मार्च रोजी विभागीय क्रीडा संकुलात
सकाळी 6.30 वाजता 'वॉकथॉन 2025'चे आयोजन करण्यात आले आहे. महिला सुरक्षा आणि स्त्री-पुरुष
समानता या विषयांवर जनजागृती करण्यासाठी या वॉकथॉनचे आयोजन करण्यात आले आहे.
वॉकथॉनचा मार्ग हा विभागीय क्रीडा संकुलापासून
सुरू होऊन इर्विन चौक, मदर टेरेसा मार्ग, गर्ल्स हायस्कूल चौक, शिवाजीनगरमार्गे परत
विभागीय क्रीडा संकुल स्टेडियम असा राहणार आहे. या उपक्रमात जिल्हा प्रशासनातील अधिकारी
आणि कर्मचारी, विविध संघटना, संस्था, क्लब, शहरातील नागरिक आणि बचतगट सहभागी होणार
आहेत. नागरिकांना उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
00000
वसतिगृह इमारत भाड्यासाठी प्रस्ताव आमंत्रित
अमरावती, दि. 6 (जिमाका) : दर्यापूर येथील
मुलींच्या वसतिगृहासाठी इमारत भाडेतत्वावर घेण्यात येणार आहे. यासाठी इच्छुकांनी प्रस्ताव
सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
125 वी जयंती मागासवर्गीय मुलींचे शासकीय
वसतिगृह, दर्यापूर हे सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागातर्फे चालविण्यात येते. सदर
वसतिगृहाकरिता 100 मुलींच्या वास्तव्याच्या दृष्टीने प्रती विद्यार्थिनी 100 चौरस फूटाप्रमाणे
निवासी खोल्या, तसेच, स्नानगृह, स्वच्छतागृह हे 10 विद्यार्थिनींमागे एक याप्रमाणे
असणे आवश्यक आहे.
स्वयंपाकगृह, भोजनकक्ष, वाचनकक्ष, संगणककक्ष,
मनोरंजन कक्ष, गृहपाल, अधीक्षक निवासस्थान या सर्व सुविधांनी युक्त सुसज्ज इमारत दर्यापूर
येथे भाडेतत्वावर देण्यास इच्छुक असणाऱ्यांनी 125वी जयंती मागासवर्गीय मुलींचे शासकीय
वसतिगृह, सांगळूदकर कॉम्प्लेक्स, बनोसा-दर्यापूर येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात
आले आहे.
0000000
शहरात प्रतिबंधात्मक आदेश लागू
अमरावती, दि. 06 (जिमाका) : शहरात शांतता व
सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी अमरावती शहर पोलीस आयुक्त यांनी
महाराष्ट्र पोलिस कायद्याचे कलम 37 (1) व (3) नुसार प्रतिबंधात्मक आदेश जारी केले
आहेत.
प्रतिबंधात्मक आदेश पोलिस आयुक्तालयाच्या परिक्षेत्रात लागू
करण्यात आला आहे. सदर आदेश दि. 17 मार्चच्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहणार आहे. या
आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्तीविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, असे
पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी कळविले आहे.
000000
आज डाक अदालतीचे आयोजन
अमरावती, दि. 06 (जिमाका) : भारतीय डाक विभागातर्फे प्रवर अधीक्षक कार्यालयात
शुक्रवार, दि. 7 मार्च रोजी सकाळी 11 वाजता डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
पोस्टासंबंधीत स्पीड पोस्ट, काउंटर सेवा, डाक वस्तू, रजिस्टर
पार्सल, बचत बँक व मनी ऑर्डर अशा तक्रारींचे निराकरण सहा आठवड्याच्या आत झाले नसेल
आणि समाधानकारक उत्तर मिळाले नसल्यास आलेल्या तक्रारींबाबत डाक अदालतीमध्ये
कार्यवाही होणार आहे.
संबंधितांनी आपले अर्ज प्रवर अधीक्षक, डाक घर, अमरावती विभाग, अमरावती
444602 यांच्याकडे सादर करावेत. त्यामध्ये तक्रारीचा सर्व तपशील, तारीख, अधिकाऱ्यास
मूळ तक्रार पाठविली असल्यास त्याचे नाव व हुद्दा आदीचा उल्लेख करुन दि. 7 मार्चपर्यंत
पाठवावे लागणर आहे, असे प्रवर अधीक्षक डाकघर यांनी कळविले आहे.
00000
वसतिगृह
इमारतीसाठी खासगी जमीनमालकांनी संपर्क करण्याचे आवाहन
अमरावती, दि. 6 (जिमाका) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य
विभागातर्फे 125व्या जयंती मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहासाठी दर्यापूर
शहरात 1 हेक्टर खासगी जमिनीची आवश्यकता आहे. यासाठी खासगी जमीन मालकांनी संपर्क
साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
वसतिगृहासाठी शासकीय जमीन उपलब्ध नसल्याने, वसतिगृहाची इमारत
बांधण्यासाठी खासगी जमीन खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दर्यापूर शहरात
शाळा, महाविद्यालय, बसस्थानक आणि रुग्णालय सुविधांच्या जवळ जमीन उपलब्ध असल्यास
प्राधान्य देण्यात येणार आहे. इच्छुक जमीन मालकांनी सांगळूदकर कॉम्प्लेक्स,
बनोसा-दर्यापूर येथील वसतिगृहाच्या कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात
आले आहे.
00000
No comments:
Post a Comment