आरसेटीच्या वार्षिक
प्रशिक्षणाचा कार्यक्रम जाहिर
अमरावती, दि. 25 (जिमाका) : ग्रामीण विकास
मंत्रालय आणि बँक ऑफ महाराष्ट्र पुरस्कृत महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेतर्फे
विविध व्यवसायावर आधारीत प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर प्रशिक्षणाचा
येत्या वर्षातील कार्यक्रम जाहिर करण्यात आला आहे.
संस्थेतर्फे प्रशिक्षण संपूर्ण मोफत असून
निवास आणि भोजनाची व्यवस्था विनामूल्य केली जाते. सोबतच कर्ज प्रस्तावासाठी मार्गदर्शन
करण्यात येते. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर ग्रामीण विकास मंत्रालयाचे कौशल्य विकासाचे प्रमाणपत्र देण्यात येते.
प्रशिक्षणाची वेळ ही सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत राहणार असून वयोमर्यादा
18 ते 45 वर्षे आहे. प्रवेश मर्यादा ही 35
प्रशिक्षणार्थी राहणार आहे. यासाठी आधार कार्ड झेरॉक्स, रेशन कार्ड, पॅन कार्ड झेरॉक्स,
रहिवासी दाखला, 3 पासपोर्ट फोटो, ग्रामीण बीपीएल असल्याचा दाखला, नरेगा जॉब कार्ड झेरॉक्स
ही आवश्यक कागदपत्रे आहे.
प्रवेशासाठी महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार
प्रशिक्षण संस्था, टिळक हॉलजवळ, हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, अमरावती, येथे संपर्क
साधावा, तसेच ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी rb.gy/fiy5qx आणि दूरध्वनी क्रमांक - ९४०४६२८३८०,
समन्वयक दीपक माहुरे, ९९२२२५८५११, अनिता तरारे ९०९६७८५२४० यांच्याशी संपर्क करावा,
असे आवाहन करण्यात आले आहे.
000000
युवक-युवतींना रोजगारांच्या संधी
कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट
ड्राईव्ह’ गुरुवारी
अमरावती, दि. 25 (जिमाका) : अमरावती जिल्हा कौशल्य विकास रोजगार
व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या संधी
उपलब्ध करून देण्यासाठी ‘पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मोहिमे’चे आयोजन करण्यात येणार
आहे. त्या अंतर्गत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तथा
मॉडल करिअर सेंटर अमरावती व शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय अमरावती यांचे संयुक्त
विद्यमाने रोजगार मेळाव्याचे आयोजन गुरुवार, दि. 27 मार्च 2025 रोजी
होणार आहे. तसेच मेळाव्यामध्ये विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहे.
जिल्ह्यातील युवतींना नोकरीच्या संधी मिळवून देण्याच्या
उद्देशाने जास्तीत-जास्त उमेदवारांना रोजगार मेळाव्यामधून नोकरी देण्याचा प्रयत्न जिल्हा
कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे करण्यात येतो. त्यात मुख्यमंत्री
युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी विविध आस्थापनांचे, कंपन्यांचे प्रतिनिधी प्रत्यक्ष
उपस्थित राहून उमेदवारांच्या थेट मुलाखती घेतील. मुलाखतीनंतर पात्र ठरणा-या उमेदवारांना
लगेच नोकरीची संधी मिळेल.
या मेळाव्यामध्ये सहभागी होण्यासाठी www.mahaswayam.gov.in या लिंकवर जाऊन ऑनलाईन नोंदणी करावी.
Employment वर क्लिक करावे. Job Seeker हा पर्याय निवडून आपला नोंदणी,
आधार कार्ड क्रमांक व पासवर्ड साईन इन करा. आपल्या होम पेजवरील Job Fair हा पर्याय
निवडा. District मध्ये Amravati जिल्हा निवडून Fiter बटनवर क्किल करावे. नंतर दिनांकित
मेळावा निदर्शनास येईल. त्यासमोर असलेल्या Action बटनच्या खाली View व Apply बटन दिसेल. मेळाव्यास
उपस्थित राहणारे उद्योजक व त्यांच्याकडील पदाबाबत माहिती दिसेल. आपल्या पात्रतेनुसार
पदाची निवड करून Apply बटनवर क्लिक करा. I Agree हा पर्याय निवडा. शेवटी
Successfully Applied for the Job असा Message दिसेल. अशा रितीने आपण ऑनलाईन सहभाग
नोंदवावा. आपली रजिट्रेशन Slip PDF ची प्रिंट काढून मेळाव्याच्या दिनांकास उपस्थित
राहावे.
याबाबत काही अडचण असल्यास अमरावती जिल्हा कौशल्य
विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, दुरध्वनी क्रमांक 0721-2566066 किंवा amravatirojgar@gmail.com या इमेलवर संपर्क साधावा. तसेच
27 मार्च 2025 रोजी शासकीय तंत्रनिकेतन
महाविद्यालय, गाडगेनगर अमरावती येथे स्वखर्चाने बायोडाटा,
पासपोर्ट साईज फोटो व आवश्यक कागदपत्रासंह कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित रहावे, असे
आवाहन अमरावती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत करण्यात
आले आहे.
0000000
जागर स्त्री शक्तीचा जिल्हा प्रदर्शनाला अमरावतीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
बचतगटांच्या उत्पादनांना मागणी
अमरावती, दि. 25 (जिमाका): स्वयं सहाय्य महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी जिल्हा परिषद, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, महिला व बाल विकास विभाग, समाजकल्याण महिला आर्थिक विकास महामंडळ, (माविम) महाराष्ट्र ग्रामीण जीवन्नोनती अभियान (उमेद) यांच्या संयुक्त विद्यमाने जागर स्त्री शक्तीचा जिल्हा प्रदर्शन दि. 22 ते 25 मार्च 2025 दरम्यान सायन्सस्कोर मैदान परिसरात आयोजित करण्यात आले. माविम सुवर्ण महोत्सवानिमित्याने आयोजित नवतेजस्विनी 2025 वैदर्भी महोत्सव, जागर स्त्री शक्तीचा जिल्हा प्रदर्शनमध्ये महिला बचतगटांच्या स्टॉलला चार दिवसीय प्रदर्शनात ग्रामीण महिला भगिनींनी निर्माण केलेली उत्पादने अमरावतीकरांना उपलब्ध झाली.
प्रदर्शनीत 125 पेक्षा अधिक बचतगटांचा प्रदर्शनात सहभाग
होता. माविम चे 59 व उमेद चे 70 स्टॉल्स लावण्यात आले. प्रदर्शनात शोभिवंत वस्तु, दैनंदिन वापरासाठी
उपयुक्त वस्तू, पापड, मसाले, महिलांना गृहउपयोगी वस्तू, गटांनी तयार केलेली रासायनिक रंग विरहित,
उत्पादने, मायक्रोनच्या शोभिवंत वस्तु, बांबूचे टोपले, फड़ा, वारली पेंटिंग, गोडंबी,
घरातील, देव्हाऱ्यातील शोभिवंत वस्तु, ज्वेलरी, मातीपासून बनविलेल्या वस्तु तसेच खाण्याचे
स्वादिष्ट पदार्थ, आवळा पदार्थ, रेडीमेड ढोकळा पीठ, नाना प्रकारचे सुगंधी मसाले, सर्व
प्रकारचे लोणची, विविध प्रकारचे पापड व पापड मसाले, पॉपकॉर्न केळीपासून बनविलेले चिप्स,
सर्व प्रकारचे तृणधान्य, कडधान्य, डाळी आदींच्या खरेदीला अमरावतीकरांनी चांगला प्रतिसाद
दिला.
त्याचप्रमाणे, विशेष दालनांद्वारे जेवणाबरोबरच खीर, मांडे,
रोडगे, आवळा पुरणपोळी, बिट्टया, झुणका भाकर, मटण मांडे, रोडगे अशा मराठमोळ्या पदार्थांची
रेलचेल होती. प्रदर्शनासोबतच विविध सांस्कृतिक कार्यक्रम, खेळ, महिलांसाठी विविध प्रशिक्षण
आयोजित करण्यात आले होते.
00000
वाहनांनी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट लावणे
अनिवार्य
अमरावती, दि. 25 (जिमाका): केंद्रीय मोटार वाहन नियमान्वये महाराष्ट्र शासनाने सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट एचएसआरपी बसविण्याची तरतुद करण्यात आलेलीआहे. वाहनांना नंबर प्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी करून होणारे गुन्हे कमी करणे, रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटविणे व राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट एचएसआरपी बसविणे आवश्यक असून सर्वोच्च न्यायालयाने तसे निर्देश दिले आहे.
जिल्ह्यातील
सर्व वाहनधारकांना, शासकीय, निमशासकीय कार्यालये, बँका यांनी त्यांच्या दि. 1 एप्रिल
2019 पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसविणे आवश्यक आहे. जिल्ह्यासाठी
M/S. Rosmerta Safety Systems ltd. ही एजंसी निश्चित करण्यात आलेली आहे. तसेच परिवहन
विभागाच्या http://maharashtra.transport.gov.in या संकेतस्थळावरूनही वाहनधारक
आपली एचएसआरपी नंबरप्लेट बुक करू शकतात.
एचएसआरपी नंबरप्लेट बसविण्यासाठी
शुल्क हे जीएसटी वगळून आकारण्यात येणार आहे. दुचाकी शुल्क 450, तीनचाकी शुल्क 500 इतर
सर्व वाहने 745 रूपये पर्यंत राहील. वाहनधारकांनी वरीलप्रमाणे दिलेल्या पोर्टलवर अपॉइंटमेंट
घेऊन एचएसआरपी नंबरप्लेट दि. 30 जून 2025 पूर्वी बसवून घेण्यात यावी. एचएसआरपी नंबरप्लेट
नसलेली वाहने किंवा बनावट एचएसआरपी असलेली वाहनांवर भविष्यात दंडात्मक कारवाई तसेच
वाहनांबाबत परिवहन कार्यालयातील कामकाज थांबविण्यात येईल, असे आवाहन प्रादेशिक परिवहन
अधिकारी उर्मिला पवार यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment