Thursday, June 13, 2024

राजर्षी शाहु महाराज शिष्यवृत्ती योजना; 12 जुलैपर्यंत अर्ज सादर करा

 

राजर्षी शाहु महाराज शिष्यवृत्ती योजना; 12 जुलैपर्यंत अर्ज सादर करा

 

            अमरावती, दि. 13 (जिमाका): सामाजिक न्याय व विशेष सहायक विभागातंर्गत सन 2024-25 मध्ये अनुसूचित जातीच्या मुला-मुलींना परदेशात विशेष अध्ययन करण्यासाठी राजर्षी शाहु महाराज शिष्यवृत्ती योजनेंतर्गत विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यासाठी शासनाने मंजुरी दिलेली आहे. इच्छुक व पात्र विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती योजनेचे  अर्ज दि. 12 जुलैपर्यंत सादर करावे. अधिक माहितीसाठी महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध असून शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याणचे प्र. सहायक आयुक्त सरीता बोबडे यांनी केले आहे.

0000

 

No comments:

Post a Comment

विशेष लेख - गडांचा राजा : राजगड

  गडांचा राजा : राजगड   सह्याद्रीच्या उंच डोंगररांगांच्या कुशीत उभा असलेला, भव्यता आणि ऐतिहासिक वैभव यांचा अद्वितीय संगम म्हणजे राजगड! छ...