Thursday, June 13, 2024

प्रलंबित, तडजोडपात्र प्रकरणासाठी २९ जुलै ते ३ ऑगस्ट २०२४ पर्यंत विशेष लोकअदालत सप्ताह

 

प्रलंबित, तडजोडपात्र प्रकरणासाठी २९ जुलै ते ३ ऑगस्ट २०२४ पर्यंत विशेष लोकअदालत सप्ताह

 

            अमरावती, दि. 13 (जिमाका): नवी दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयात दि. 29 जुलै ते 3 ऑगष्ट दरम्यान विशेष लोकअदालत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. अमरावती जिल्ह्यातील पक्षकारांची प्रकरणे सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्यास त्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव एम.डी. कांबळे यांनी केले आहे.

 

            प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश तथा अमरावती जिल्हा विधिसेवा प्राधिकरणचे अध्यक्ष एम. आर. देशपांडे यांच्या मार्गदर्शनात अमरावती येथील पक्षकारांच्या सर्वोच्च न्यायालयातील तडजोड योग्य प्रकरणांमध्ये तडजोडीची पूर्व बोलणी करण्यासाठी बैठकीचे आयोजन 19 जुनपासून करण्यात येणार आहे. त्याकरीता संबंधित पक्षकार प्रत्यक्ष किंवा आभासी पध्दतीने सहभागी होऊ शकतात. विशेष लोकअदालतीच्या अधिक चौकशीसाठी जिल्हा विधीसेवा प्राधिकरण जिल्हा व सत्र न्यायालय परीसर, अमरावती या कार्यालयासोबत संपर्क साधावा.

00000

No comments:

Post a Comment

विशेष लेख - गडांचा राजा : राजगड

  गडांचा राजा : राजगड   सह्याद्रीच्या उंच डोंगररांगांच्या कुशीत उभा असलेला, भव्यता आणि ऐतिहासिक वैभव यांचा अद्वितीय संगम म्हणजे राजगड! छ...