Wednesday, June 19, 2024

विशेष अतिसार नियंत्रण पंधरवाडानिमित्त विविध उपक्रम

 

विशेष अतिसार नियंत्रण पंधरवाडानिमित्त विविध उपक्रम

 

             अमरावती, दि. 19 (जिमाका): जिल्ह्यात पाच वर्षाखालील बालकांना अतिसार व जुलाब आजारापासून संरक्षित करण्यासाठी अतिसार नियंत्रण पंधरवाडा राबविण्यात येत आहे. जिल्हयामध्ये विविध उपक्रमाच्या माध्यमातून ही मोहिम प्रभावीपणे राबविण्यात येत असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश असोले यांनी दिली.

 

            पंधरवाडा मोहिमेतंर्गत 59 प्राथमिक आरोग्य केंद्र व 384 उपकेंद्रामधील 5 वर्षाखालील 1 लाख 17 हजार बालकांमध्ये अतिसार प्रतिबंध आणि व्यवस्थापण करण्यात येणार आहे. ओआरएसच्या  4 लाख 50 हजार व झिंक गोळ्या 3 लाख 22 हजार इतक्या साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून त्याचे वितरण करण्यात येत आहे. आशावर्कनी 8 ते 10 घरे मिळून ओआरएसचे प्रात्यक्षिके, शाळेतील विद्यार्थांना हात धुण्याची पध्दतीबाबत माहिती देत आहे. अतिसारामुळे होणारे 5 ते 7 टक्के मूत्यूचा दर हा शुन्यावर आणणे हा विशेष अतिसार नियंत्रण पंधरवाडाचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांचे समुपदेशन करण्यात येत आहे. यासाठी  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश असोले, जिल्हा माता व बालसंगोपण अधिकारी सुभाष ढोले, तसेच अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रविण पारीसे यांच्या मार्गदर्शनाखाली संपुर्ण अमरावती जिल्ह्यात मोहिम प्रभाविणे राबविण्यात येत आहे.

00000

 

No comments:

Post a Comment

जिल्हातील घरांसाठी 5 हजार अतिक्रमण नियमानुकूल * शहरीसह ग्रामीण भागातील नागरिकांना लाभ

  जिल्हातील घरांसाठी 5 हजार अतिक्रमण नियमानुकूल * शहरीसह ग्रामीण भागातील नागरिकांना लाभ अमरावती, 13 : सर्वांसाठी घरे उपलब्ध होण्यासाठी श...