Friday, June 14, 2024

ऑफिसर्स क्लब येथे लॉनटेनिस मैदानाचे जिल्हाधिकारी यांचे हस्ते लोकार्पण

 




ऑफिसर्स क्लब येथे लॉनटेनिस मैदानाचे जिल्हाधिकारी यांचे हस्ते लोकार्पण

 

        अमरावती, दि. 14 (जिमाका): जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत मंजुर निधीतुन ऑफिसर्स क्लब येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे लॉन टेनिस मैदानाचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आले. या मैदानावर विविध स्तरांवरील स्पर्धेचे आयोजन करून खेळाला प्रोत्साहन द्यावे. यामधून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार होतील, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले.

 

            लोकार्पण सोहळा प्रसंगी महानगरपालिका आयुक्त देविदास पवार, अतिरिक्त जिल्हाधिकारी सुरज वाघमारे, उपविभागीय अधिकारी अनिल भटकर, तहसिलदार विजय लोखंडे, नायब तहसिलदार अरविंद माळवे, ऑफिसर्स क्लबचे अंकुश डहाके तसेच लॉनटेनिस खेळाचे मुकेश केशव पारथकर, संजय चांदवाणी, डॉ. प्रफुल्ल कडू, पार्थ ठाकरे, राहुल शर्मा, दिपक सोमय्या, गजेंद्र देशमुख, नविन पाटिल, अनुज शहा, तसेच खेळाडू, नागरिक, क्रीडा प्रेमी बहुसंख्येने उपस्थित होते.

0000

No comments:

Post a Comment

विशेष लेख - गडांचा राजा : राजगड

  गडांचा राजा : राजगड   सह्याद्रीच्या उंच डोंगररांगांच्या कुशीत उभा असलेला, भव्यता आणि ऐतिहासिक वैभव यांचा अद्वितीय संगम म्हणजे राजगड! छ...