Tuesday, June 18, 2024

सांस्कृतीक भवन येथे शुक्रवारी(दि.21) युवाशक्ती करिअर शिबीर

 

सांस्कृतीक भवन येथे शुक्रवारी(दि.21) युवाशक्ती करिअर शिबीर

           अमरावती, दि. 18 (जिमाका): कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागातर्फे औद्योगिक प्रशिक्षण संस्था, औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुलींची, अनुसुचीत जाती औद्योगिक प्रशिक्षण संस्था रहाटगांव यांचे संयुक्त विद्यमाने छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबीर शुक्रवार दि. 21 जून 2024 रोजी सकाळी 10 वाजता सांस्कृतिक भवन येथे होणार आहे. जिल्ह्यातील विद्यार्थी व पालकांनी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे उपसंचालक एस.के. बोरकर यांनी केले आहे. 

            इयत्ता दहावी व बारावी नंतर शिक्षणाच्या पुढील संधी, आयटीआय प्रशिक्षणाचे महत्त्व, तसेच आयटीआय प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर रोजगार, स्वयंरोजगाराच्या विविध संधी, पदवी पदविकेनंतर पुढील शिक्षण, रोजगार, उद्योजकता, परदेशातील शिक्षणाच्या संधी, व्यक्तिमत्व विकास याबाबत मार्गदर्शन या शिबिराच्या माध्यमातून होईल. विविध मान्यवर शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित राहतील. 

                                                     00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...