Thursday, June 20, 2024

मागासवर्गीय शासकीय वसतीगृहात उच्च शिक्षण अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरु; 20 जुलैपर्यंत अर्ज आमंत्रित

 मागासवर्गीय शासकीय वसतीगृहात उच्च शिक्षण अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरु; 20 जुलैपर्यंत अर्ज आमंत्रित

           

           अमरावती, दि. 20 (जिमाका): इतर मागास बहूजन कल्याण विभागाअंतर्गत मागासवर्गीय मुला-मुलींच्या शासकीय वसतीगृहात  उच्च शिक्षण अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. पात्र इच्छुक विद्यार्थ्यांनी इतर मागास बहुजन कल्याण, अमरावती येथे दि. 20 जुलै 2024 पर्यंत ऑफलाईन पध्दतीने अर्ज सादर करावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याणचे सहाय्यक संचालक माया केदार यांनी केले आहे.

           

          जिल्ह्यातील सर्व इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती,भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना इतर मागास बहूजन कल्याण विभागाअंतर्गत कार्यरत असलेल्या मागासवर्गीय मुलामुलींचे शासकीय वसतिगृहात प्रवेशित विद्यार्थ्यांना सर्व सोई-सुविधा मोफत पुरविण्यात येतात. त्याअनुषंगाने सन 2024-25 साठी ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यावयाचा आहे अशा विद्यार्थ्यांने अमरावती येथील स्थानिक वसतिगृहामध्ये उच्च शिक्षण अभ्यासक्रम प्रवेशासाठी ऑफलाईन पध्दतीने प्रवेश अर्ज आवश्यक कागदपत्रासह सादर करावा.

                                                                00000

No comments:

Post a Comment

विशेष लेख - गडांचा राजा : राजगड

  गडांचा राजा : राजगड   सह्याद्रीच्या उंच डोंगररांगांच्या कुशीत उभा असलेला, भव्यता आणि ऐतिहासिक वैभव यांचा अद्वितीय संगम म्हणजे राजगड! छ...