Wednesday, June 19, 2024

जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल क्रीडा स्पर्धा; 28 जुनपर्यंत अर्ज करा

 

जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल क्रीडा स्पर्धा; 28 जुनपर्यंत अर्ज करा

 

       अमरावती, दि. 19 (जिमाका) : जिल्हास्तरीय सुब्रोता फुटबॉल कप, सबज्युनियर मुले, ज्युनियर मुले, मुली क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत. दि. 1 ते 4 जुलै दरम्यान विविध वयोगटाच्या स्पर्धा घेण्यात येणार आहे. क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील शाळा, संघांनी दि. 28 जूनपर्यंत ऑफलाईन नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी केले आहे.

 

          जिल्हा क्रीडा परिषद तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अमरावती व सुब्रतो मुखर्जी स्पोर्ट्स एज्युकेशन सोसायटी, नवी दिल्ली यांच्या मार्फत 2024-25 या वर्षासाठी या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूसाठी सबज्युनियर 15 वर्षा आतील मुले क्रीडा स्पर्धेसाठी  खेळाडू दि. 1 जानेवारी 2010 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेला असावा. तसेच ज्युनियर 17 मुले, मुली दि. 1 जानेवारी 2008 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेला असावा.

 

          जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप सबज्युनियर, ज्युनियर क्रीडा स्पर्धेत सहभागी सर्व संघानी जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभागापूर्वीच subrotocup.in या संकेतस्थळावर खेळाडू आणि संघांनी नोंदणी करणे अनिवार्य आहे. सहभागी होणाऱ्या संघांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात ऑफलाईन नोंदणी दि. 28 जुनपर्यंत करणे आवश्यक आहे. सहभागी खेळाडूकडे जन्माचा दाखला, आधारकार्ड, खेळाडू ओळखपत्र, छायाचित्र मुळ प्रतीत असणे आवश्यक आहे.

 

           या स्पर्धेत सहभागी 14 वर्षाआतील मुले व 17 वर्षा आतील मुले, मुली यांची स्पर्धा दि. 1 ते 4 जुलै 2024 रोजी घेण्यात येणार आहे. जिल्ह्यातील शाळा, संघांनी सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ऑफलाईन नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, येथे संतोष विघ्ने यांच्याशी संपर्क साधावा.

                                                      0000

 

 

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 21.06.2025

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा: 'एक पृथ्वी, एक...