जिल्हा शोध व बचाव पथकाचे वडाळी येथे रंगीत तालीम
अमरावती, दि. 13 (जिमाका): जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत मान्सून
पुर्व उपाययोजना व जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने बुधवारी वडाळी तलाव व पंचवटी राज्य
राखीव पोलीस बल गट क्र. 9 येथे रंगीत तालीम घेण्यात आली. यावेळी जिल्हा शोध व बचाव
व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापनाविषयी मार्गदर्शन केले.
रंगीत तालीम या कार्यक्रमाला निवासी उपजिल्हाधिकारी
तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भटकर, तहसिलदार
निलेश खटके, तहसिलदार विजय लोखंडे, अधिक्षक प्रशांत पडघन, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन
अधिकारी सुरेंद्र रामेकर तसेच अमरावती तालुक्यातील मंडळ अधिकारी व तलाठी उपस्थित होते.
रंगीत तालीमेमध्ये जिल्हा शोध व बचाव पथकातील
कर्मचाऱ्यांनी पूर परिस्थिती निर्माण झाल्यास त्या ठिकाणी काय करावे व काय करू नये,
तसेच जिवित हानी टाळण्यासाठी घरगुती व स्थानिक वस्तुंचा वापर करून बचाव साहित्य कसे
वापरावे याबद्दल मार्गदर्शन करून पाण्यामध्ये प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखविले.
गावामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाल्यास वृध्द, महिला व लहान मुलांना पुराच्या पाण्यातुन
सुरक्षितरित्या बाहेर कसे काढावे, याबाबत वेगवेगळ्या पद्धतीने प्रात्यक्षिक राबविण्यात
आले. ग्रामीण भागामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाल्यास स्थानिक लोकांच्या मदतीने जिवित
हानी टाळता येऊ शकते याविषयी जिल्हा शोध व बचाव पथकाने मार्गदर्शन केले.
जिल्हा शोध व बचाव पथकाचे कर्मचारी सचिन
धरमकर, विशाल निमकर, दिपक डोरस, दिपक पाल, आकाश निमकर, राजेंद्र शहाकार, गणेश जाधव,
गजानन वाडेकर, अर्जुन सुंदल्डे, दिलीप भिलावेकर, प्रफुल भुसारी, महेश मांदळे यांनी
प्रात्यक्षिके करून दाखविले.
00000
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
No comments:
Post a Comment