अमरावती विधानसभा मतदारसंघाची लोकशाही भवनात मतमोजणी
अमरावती, दि. 17 (जिमाका): आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीतमध्ये अमरावती विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी लोकशाही भवनात होणार आहे.
निवडणूक आयोगाने अमरावती येथील लोकशाही भवन, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ रोड, येथे शनिवार, दि. 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजेपासून मतमोजणी करण्यास मान्यता दिली आहे. याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन अमरावती विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक अधिकारी अनिल भटकर यांनी केले आहे.
00000
मतदान केंद्राच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू
अमरावती, दि. 17 (जिमाका): विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी दि. 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीतील मतदान केंद्राच्या 200 मीटरच्या परिसरात प्रतिबंध घालण्यात आले आहे. यासाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023चे कलम 163 नुसार जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी आदेश दिले आहे.
मतदान केंद्र परिसरातील मंडप, दुकाने, मोबाईल, कॉडलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्वनीक्षेपक, फेरीवाले, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, निवडणुकीच्या कामकाजाव्यतिरिक्त खासगी वाहने, चिन्हाचे प्रदर्शन, निवडणूक कामाव्यतिरिक्त इतर व्यक्तींना प्रवेश प्रतिबंधित करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024ची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व मुक्त, न्याय वातावरणात पार पाडण्याच्या उपायोजना करण्यात येत आहे. या परिसरात जमाव गोळा करणे, ध्वनीक्षेपक वापरणे, मतदारांवर प्रभाव पडेल अशी कृती करणे आदीकरीता प्रतिबंध करण्यात येत आहे. मतदार केंद्र परिसरात मतदारांचा जमाव करणे, दुकाने चालू ठेवणे, मतदारचिठ्ठ्या देताना त्यावर कोणतेही चिन्ह नसावे. ध्वज लावण्यावर प्रतिबंध राहणार आहे.
सदर आदेश हे रूग्णालयीन कामे, दुधाचे टँकर, वीज कर्मचारी, पोलिस कर्मचारी, निवडणूक कर्तव्यावरील कर्मचारी, इतर अत्यावश्य सेवांना लागू राहणार नाही. तसेच बसस्थानक, रेल्वेस्थानक, रूग्णालयांकडे जाणाऱ्या वाहनांना लागू राहणार नाही. दिव्यांग आणि आजारी व्यक्तीस मतदान केंद्रावर जाणाऱ्या मतदारांना सदर आदेश लागू राहणार नाही.
0000
बडनेरा विधानसभा क्षेत्रात तिसरी तपासणी
अमरावती, दि. 17 (जिमाका) : बडनेरा विधानसभा मतदारसंघात नामनिर्देशित उमेदवारांच्या खर्चाची तिसरी तपासणी शुक्रवार, दि. 15 नोव्हेंबर रोजी पार पडली. उमेदवारांच्या खर्चावर देखरेख ठेवण्यासाठी खर्च निरीक्षक म्हणून वेंकन्ना तेजावथ यांची नियुक्ती केली आहे. लेख्यांच्या पहिल्या तपासणीवेळी एकूण 26 उमेदवारांपैकी सर्व उमेदवार उपस्थित होते. उमेदवारांना 48 तासांत निवडणूक खर्चाचे लेखे उपविभागीय अधिकारी कार्यालय, जुनी अमरावती तहसील कार्यालय, अमरावती येथे सादर करण्याबाबत नोटीस देण्यात आली आहे. ज्या उमेदवारांनी विहीत मुदतीत खर्च सादर केला नसल्यास नियमानुसार तक्रार दाखल करण्यात येणार आहे. तसेच देण्यात आलेल्या सर्व परवानग्या तात्काळ रद्द करण्यात येणार आहे.
5 उमेदवारांनी तिसऱ्या तपासणीवेळी त्यांचा दैनंदिन खर्चाचा लेखा सादर केला असता छायांकित निरीक्षण नोंदवहीसोबत ताळमेळअंती योग्य वाटत नसल्याने त्यांनी खर्चाचा काही भाग सादर केला नाही. या सर्व उमेदवारांना उपविभागीय अधिकारी यांनी नोटीस बजावली. तिसऱ्या तपासणीअंती उमेदवारनिहाय खर्च हा तात्पुरत्या स्वरुपाचा असून निकालानंतर आयोजित लेखा ताळमेळ बैठकीमध्ये ताळमेळ घेऊन सदर खर्चास अंतिम स्वरुप देण्यात येणार आहे. अंतिम बैठकीनंतर खर्चाचा ताळमेळ झाल्यानंतरच सदरचा खर्च हा भारत निवडणूक आयोगास सादर केला जाणार आहे.
00000
धामणगाव रेल्वे विधानसभा क्षेत्रात खर्चाची तिसरी तपासणी
अमरावती, दि. 17 (जिमाका) : धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघात नामनिर्देशित उमेदवारांच्या खर्चाची तिसरी तपासणी शनिवार, दि. 16 नोव्हेंबर रोजी चांदुर रेल्वे तहसील कार्यालयात पार पडली.
उमेदवारांच्या खर्चावर देखरेख ठेवण्यासाठी खर्च निरीक्षक म्हणून वेंकन्ना तेजावथ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लेख्यांच्या पहिल्या तपासणीवेळी एकूण 24 उमेदवारांनी त्यांचा दैनंदिन खर्चाचा लेखा सादर केला आहे. परंतु तो शॅडो खर्च नोंदवहीसोबत तुलना करता योग्य वाटत नसल्याने त्यांनी खर्चाचा काही भाग सादर केला नाही. त्या उमेदवारांना उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी तेजश्री कोरे यांनी 48 तासांत निवडणूक खर्चाचे लेखे निवडणूक संनियंत्रण कक्ष, तहसिल कार्यालय, चांदूर रेल्वे येथे सादर करण्याबाबत नोटीस देण्यात आली. ज्या उमेदवारांनी विहीत मुदतीत खर्च सादर केला नसल्यास नियमानुसार तक्रार दाखल करण्यात येणार आहे. तसेच देण्यात आलेल्या सर्व परवानग्या तात्काळ रद्द करण्यात येणार आहे.
तिसऱ्या तपासणीअंती उमेदवारनिहाय खर्च हा तात्पुरत्या स्वरुपाचा असून निकालानंतर आयोजित लेखा ताळमेळ बैठकीमध्ये ताळमेळ घेऊन सदर खर्चास अंतिम स्वरुप देण्यात येणार आहे. अंतिम बैठकीनंतर खर्चाचा ताळमेळ झाल्यानंतरच सदरचा खर्च हा भारत निवडणूक आयोगास सादर केला जाणार आहे. तपासणीवेळी खर्च निरीक्षक वेंकन्ना तेजावथ, तसेच उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
00000
No comments:
Post a Comment