निवडणुक निरीक्षक (मतमोजणी) यांचे शहरात आगमन
अमरावती, दि. 22 (जिमाका): विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी बुधवार, दि. 20 नोव्हेंबर रोजी उत्साहात मतदान पार पडले. मतमोजणी उद्या, शनिवार, दिनांक 23 नोव्हेंबर रोजी होणार आहे. 38- अमरावती विधानसभा मतदार संघासाठी निवडणुक निरीक्षक (मतमोजणी) सौरभ स्वामी यांचे शहरात आगमन झाले आहे.
00000
निवडणुक निरीक्षक (मतमोजणी) यांचे शहरात आगमन
अमरावती, दि. 22 (जिमाका): विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी बुधवार, दि. 20 नोव्हेंबर रोजी उत्साहात मतदान पार पडले. मतमोजणी उद्या, शनिवार, दिनांक 23 नोव्हेंबर रोजी होणार आहे. 37- बडनेरा विधानसभा मतदार संघासाठी निवडणुक निरीक्षक (मतमोजणी) प्रांजल हजारीका यांचे शहरात आगमन झाले आहे.
00000
लोकशाही भवनात मतमोजणीची तयारी पूर्ण
*अमरावती, बडनेरा मतदारसंघाची मतमोजणी
अमरावती, दि. 22 (जिमाका) : विद्यापीठ रस्त्यावरील लोकशाही भवनात अमरावती आणि बडनेरा विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी होणार आहे. पोस्टल बॅलेट, ईटीपीबीएमएस आणि ईव्हीएम वरील मतमोजणीची तयारी पूर्ण करण्यात आली आहे.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक पार पडल्यानंतर शनिवार, दि. 23 नोव्हेंबर 2024 मतमोजणी होणार आहे. यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आली आहे. अमरावती विधानसभा मतदारसंघातील 345 आणि 23 सहायक मतदानकेंद्रावर मतदान घेण्यात आले आहे. या सर्व मतदानकेंद्रावर ईव्हीएमद्वारे झालेले मतदान मतमोजणीकरीता प्रत्येक फेरीसाठी 14 टेबल, तसेच पोस्टल मतपत्रीकेची मतमोजणी करण्याकरीता 10 आणि ईटीपीबीएमएसकरीता 1 याप्रमाणे व्यवस्था करण्यात आली आहे.
मतमोजणी वेळी याठिकाणी गर्दी होणार असल्याने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. निवडणूक आयोगामार्फत सौरभ स्वामी यांची मतमोजणी निरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. मतमोजणी निरीक्षक मतमोजणी प्रक्रियेवर नियंत्रण ठेवून त्याची पाहणी करतील. मतमोजणीची माहिती देण्यासाठी मिडीया कक्ष स्थापन करण्यात आला आहे, असे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल भटकर यांनी कळविले आहे.
00000
जिल्हाधिकाऱ्यांकडून मतमोजणी केंद्राची पाहणी
अमरावती, दि. 22 : विधानसभा निवडणुकीसाठी लोकशाही भवनात मतमोजणी होणार आहे. मतमोजणी प्रक्रिया सुरळीत पाडावी, यासाठी जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी मतमोजणी केंद्राला भेट देऊन आवश्यक असलेल्या तयारीची पाहणी केली.
मतमोजणी केंद्राला त्री-स्तरीय सुरक्षा पुरवण्यात आली आहे. शनिवार, दि. 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणीच्या दिवशी कोरडा दिवस घोषित करण्यात आला आहे. तसेच शस्त्राचा वापर प्रतिबंधित करण्यात आला आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून उमेदवार किंवा उमेदवाराचे प्रतिनिधी आणि मतमोजणी अधिकारी, कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त इतर कोणालाही मतमोजणी स्थळाच्या 100 मीटर परिसराच्या आत प्रवेश देण्यात येणार नाही. तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांनी उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींना अधिकृत पास दाखविल्याशिवाय प्रवेश देण्यात येणार नाही.
लोकशाही भवनात मतमोजणी होणार असल्यामुळे बियाणी चौक ते विद्यापीठ रस्यासेवरील वाहतूक रस्ता वळविण्यात आली आहे. मतमोजणीच्या ठिकाणी झेरॉक्स, फॅक्स, ई-मेल इतर संपर्क साधनांच्या वापरावर प्रतिबंध करण्यात आला आहे. तसेच शंभर मीटर परिसरामध्ये मोबाईल फोन, वायरलेस सेट, ट्रांजिस्टर, कॅलक्युलेटर आदी प्रकारच्या साधनांच्या वापरावर प्रतिबंध घालण्यात आला आहे. मतमोजणी केंद्रापासून शंभर मीटरचा परिसर हा पादचारी क्षेत्र घोषित करण्यात आला आहे. या परिसरात निवडणूक कामाव्यतिरिक्त इतर वाहनांना प्रवेश देण्यात येणार नाही. सदर आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्तीविरूद्ध भारतीय नागरिक सुरक्षा संहितेनुसार कारवाई करण्यात येणार आहे,
00000
No comments:
Post a Comment