धर्मदाय
संस्थेतील निराधार महिलांनी बजाविला मतदानाचा हक्क
अमरावती,
दि. 20 (जिमाका): जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघात आज सकाळी सात वाजेपासून
मतदानाला शांततेत सुरुवात झाली आहे. मतदानासाठी मतदान केंद्र सज्ज आहेत. मतदान
केंद्रांवर दिव्यांगांसाठी सर्व सोयी सुविधा उपलब्ध आहेत.
ईशदया मदर टेरेसा होम मिशनरीज ऑफ चॅरिटी या धर्मदाय संस्थेतील निराधार,
परित्यक्ता, दिव्यांग, मानसिक रुग्ण अशा 55 महिलांनी आज मतदान केले. त्यांनी मतदान
केंद्रावरील व्हीलचेअर तसेच आदी आवश्यक सुविधांचा लाभ घेत मतदानाचा हक्क बजाविला.
मतदानाचा हक्क बजाविल्यावर या महिलांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळाले. यावेळी
सामाजिक कार्यकर्त्या डॉ. स्मिता साठे यांनी या सर्व महिलांना त्यांचे इपिक कार्ड,
ओळखपत्र आदी आवश्यक कागदपत्रे देऊन मतदान करण्यासाठी सहकार्य केले. ईशदया मदर
टेरेसा होम मिशनरीज ऑफ चॅरिटी या धर्मदाय संस्थेच्या सिस्टर रोसिन, जोसिका तसेच
त्यांच्या मदतनीस यावेळी उपस्थित होत्या.
00000
आधार तसेच
स्वंयम योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन
अमरावती, दि. 20 (जिमाक): ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना व पंडित
दीनदयाल उपाध्याय स्वंयम योजना इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत सुरू करण्यात
आली आहे. त्यासाठी इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती-क आणि विशेष मागास
प्रर्वगातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी
अर्ज सादर केलेले आहे.
अटी व शर्तीनुसार या विद्यार्थ्यांनी वसतिगृहास अर्ज करणे आवश्यक आहे. व त्या
बाबतचा पुरावा अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. परंतु काही विद्यार्थ्यांनी अर्जासोबत
वसतिगृहामध्ये अर्ज सादर केल्याचा पुरावा सोबत जोडलेला नाही.
तरी संबंधित विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, वसतिगृहात अर्ज केल्याची पोच
पावती किंवा कुठलाही पुरावा दि. 27 नोव्हेंबर 2024 पर्यंत या कार्यालयास सादर
करावा. अशा विद्यार्थ्यांना सदर योजनेचा लाभ देय राहील,असे आवाहन इतर मागास बहुजन
कल्याणच्या सहायक संचालक सरीता बोबडे यांनी केले आहे.
000
23
नोव्हेंबर रोजी आठही मतदारसंघाचे मतमोजणीचे ठिकाण जाहीर
अमरावती,
दि. 20 (जिमाका): संपूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये शहरी व ग्रामीण भागात आज दि.20
नोव्हेंबर 2024 (बुधवार), रोजी मतदान होत असून मतमोजणी ही दि. 23 नोव्हेंबर 2024
(शनिवार) रोजी होणार आहे. त्यामुळे मतमोजणी ठिकाणी
व मतमोजणीच्या वेळी उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते यांची मोठया प्रमाणात गर्दी
होण्याची शक्यता आहे.
जिल्हा
निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सौरभ कटियार यांनी भारतीय नागरिक
सुरक्षा संहिता अन्वये जिल्ह्यामधील विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी खालील
दर्शविण्यात आलेल्या मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी दि. 23 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी
6 वाजेपासून ते मतमोजणी प्रक्रिया संपेपर्यंत खालील बाबी करण्यास प्रतिबंध करण्यात
येत आहे.
36-धामणगाव
रेल्वे मतमोजणीचे ठिकाण आय. टी. आय कॉलेज, विरूळ रोगे रोड, ता. चांदुर रेल्वे,
37-बडनेरा मतमोजणीचे ठिकाण लोकशाही भवन, विद्यापीठ रोड, ता. जि. अमरावती,
38-अमरावती मतमोजणीचे ठिकाण लोकशाही भवन, विद्यापीठ रोड, ता. जि. अमरावती,
39-तिवसा मतमोजणीचे ठिकाण तहसिल कार्यालय, तिवसा नवीन इमारत तिवसा, 40-दर्यापूर
मतमोजणीचे ठिकाण कृषी उत्पन्न बाजार समिती, बनोसा, ता. दर्यापूर, 41-मेळघाट
मतमोजणीचे ठिकाण नवीन प्रशाकीय इमारत, मेन रोड, ता. धारणी, 42-अचलपूर मतमोजणीचे
ठिकाण कल्याण मंडपम् परतवाडा, ता. अचलपूर, 43-मोर्शी मतमोजणीचे ठिकाण शासकीय धान्य
गोडाऊन, नं.1 ता. मोर्शी येथे राहणार आहे.
उमेदवार
किंवा उमेदवारांचे प्रतिनिधी आणि मतमोजणी अधिकारी, कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त
इतर कोणलाही मतमोजणी स्थळांच्या शंभर मीटर परिसराच्या आत प्रवेश देण्यात येऊ नये,
तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांनी उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींना अधिकृत
पास दाखविल्याशिवाय प्रवेश देऊ नये. मतमोजणी ठिकाणी कुठल्याही प्रकारचे झेरॉक्स,
फॅक्स, ई-मेल, इतर संपर्क साधनांच्या वापरावर प्रतिबंध करण्यात येत आहे. तसेच
मतमोजणी ठिकाणाच्या शंभर मीटर परिसरामध्ये मोबाईल फोन, वायरलेस सेट, ट्रान्झीस्टर,
कॅलक्यूलेटर इत्यादी प्रकारच्या साधनांच्या वापरावर प्रतिबंध घालण्यात येत आहे.
मतमोजणी केंद्रापासून शंभर मीटरचा परिसर हा पादचारी क्षेत्र घोषित करण्यात येत
असून त्यामध्ये निवडणूक कामाव्यतिरिक्त कोणत्याही प्रकारच्या वाहनांना प्रवेश
मिळणार नाही. या आदेशाचा भंग करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने भारतीय नागरिक सुरक्षा
संहिता
अन्वये शिक्षापात्र असलेला अपराध केला आहे, असे मानण्यात येईल व संबंधितावर सदर
कलमानुसार कारवाई करण्यात येईल. अशा व्यक्ती, संस्था, संघटना यांचेवर गुन्हे दाखल
करण्यासाठी संबंधित पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक दर्जापेक्षा कमी नाही अशा
अधिकाऱ्यास प्राधिकृत करण्याता येत आहे.
हा आदेश उपरोक्त नमूद केलेल्या मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी दि. 23 नोव्हेंबर 2024
रोजी सकाळी 6 वाजेपासून ते मतमोजणी प्रक्रिया संपेपर्यंत लागू राहील.
00000
विजाभज,
इमाव व विमाप्र प्रवर्गातील
शिष्यवृत्ती तसेच शैक्षणिक शुल्क प्रतिपूती फ्रिशीप अदा करण्यासाठी अन्वेषण
प्रस्ताव सादर करण्याबाबत आवाहन
अमरावती,
दि. 20 (जिमाका): विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास
प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सन 2011-12 ते 2016-17 या कालावधीतील महाईस्कॉल
प्रणालीवरील नोंदणीकृत प्रलंबित तसेच सन 2017-18 या वर्षातील ऑफलाईन पध्दतीने
स्वीकारण्यात आलेले शिष्यवृत्ती, फ्रिशीप योजनेंतर्गत प्रलंबित अर्ज निकाली
काढण्यासाठी परिपूर्ण प्रस्ताव या कार्यालयास सादर करण्याबाबत कळविण्यात आले आहे.
परंतु
अद्यापही बरेच महाविद्यालय प्रस्ताव
सादर केलेले नाही. जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांना सूचित करण्यात येते की,
आवश्यक कागदपत्रे या कार्यालयास तात्काळ दि. 29 नोव्हेंबर 2024 रोजीपर्यंत सादर
करण्यात यावे. सदर प्रकरणी विलंब झाल्यास प्रस्ताव शासनास सादर करता येणार नाही. त्यामुळे
विद्यार्थी शिष्यवृतीपासून वंचित राहिल्यास याबाबत सर्वस्वी जबाबदारी प्राचार्य
यांची राहील. असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याणचे सहायक संचालक सरिता बोबडे यांनी
केले आहे.
00000
अमरावती जिल्ह्यात सायंकाळी 5
वाजेपर्यंत 58.48 टक्के मतदान
अमरावती, दि. 20 (जिमाका) : विधानसभा सार्वत्रिक
निवडणूक -2024 साठी आज सकाळी 7 वाजल्यापासून जिल्ह्यात सर्वत्र उत्साहात मतदानाला सुरुवात
झाली असून सायंकाळी 5 वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी 58. 48 टक्के मतदान झाले आहे.
जिल्ह्यातील
मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी (सायंकाळी 5 वाजेपर्यंत )पुढीलप्रमाणे :
42-अचलपूर -
67.53 टक्के,
38 -अमरावती -
50.32 टक्के,
37 -बडनेरा-
53.73 टक्के,
40-दर्यापूर-
59.90 टक्के,
36-धामणगाव रेल्वे-
57. 20 टक्के,
41-मेळघाट- 64.
57 टक्के,
43- मोर्शी-
64.74 टक्के,
39-तिवसा -
53.21टक्के मतदान झाले आहे.
0000
No comments:
Post a Comment