Wednesday, November 27, 2024

DIO NEWS AMRAVATI 27.11.2024

 

विकसित भारत यंग लिडरर्स डायलॉग स्पर्धेसाठी नोंदणी करण्याचे आवाहन

अमरावती, दि. 27 (जिमाका): राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन 12 ते 16 जानेवारी 2025 या कालावधीत दिल्ली येथे होणार आहे. या अनुषंगाने राष्ट्रीय युवा महोत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी विकसित भारत यंग लिडरर्स डायलॉगसाठी  माय भारत पोर्टलवर नोंदणी करून स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय व शालेय शिक्षण व साक्षरता विभाग भारत सरकार यांनी केले आहे.

भारत निर्माणासाठी नवीन संकल्पना विचारात घेवून युवांना राष्ट्र निर्माण कार्यामध्ये सहभागी करून राष्ट्रीय युवा महोत्सव अंतर्गत विकसित भारत यंग लिडरर्स  डायलॉग अंतर्गत विविध संकल्पना निश्चित करण्यात आल्या आहेत.

 प्रथम टप्प्यात विकसित भारत क्विझमध्ये वैयक्तिकरित्या स्पर्धकांना सहभागी होता येईल. प्रश्न मंजुषा स्पर्धा, सामान्यज्ञान व भारताची कामगिरी या बाबींवर ही स्पर्धा होणार आहे. यासाठी माय भारत पोर्टलवर शैक्षणिक संस्था व महाविद्यालयांनी सहभाग नोंदवावा. या स्पर्धा दि. 25 नोव्हेंबर 5 डिसेंबर 2024 या कालावधीत होणार आहे.

व्दितीय टप्प्यात विकसित भारत यावर निबंध लेखन स्पर्धा घेतली जाईल. निबंध स्पर्धा ऑन लाईन पध्दतीने  दि. 8 ते 15 डिसेंबर 2024  या कालावधीत होणार आहे.

 तृतीय टप्प्यात विकसित भारत  पीपीटी चॅलेंजवर निर्धारित विषयांवर राष्ट्रीय स्तरावर स्पर्धा घेण्यात येणार आहे. यामध्ये प्रत्येक राज्यातून 4 युवांची निवड करण्यात येणार आहे. दि 20 ते 26 डिसेंबर कालावधीत या स्पर्धा होणार आहेत.

चतुर्थ टप्प्यात राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी निवड झालेल्या युवांना दि. 11 जानेवारी 2025 रोजी सादरीकरण करावे लागेल. जिल्ह्यातील 15 ते 29 वर्षाआतील  युवक व युवतींनी माय भारत पोर्टलवर नोंदणी करून स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी केले आहे.

00000

 

आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत

सोयाबीन खरेदी केंद्र सुरु

अमरावती, दि. 27 (जिमाका): हंगाम 2024-25साठी केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत सोयाबीन खरेदी केंद्र हमीभाव रूपये 4 हजार 892 या दराने अमरावती जिल्ह्यामध्ये जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांच्यामार्फत 9 ठिकाणी तर विदर्भ को-ऑप मार्केटिंग फेडरेशन लिमिटेट, नागपूर (व्ही. सी.एम. एफ) यांच्यामार्फत 11 ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहेत.

जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांच्यामार्फत अचलपूर, सहकारी शेतकी खरेदी विक्री सहकारी संस्था, अचलपूर, चांदूर रेल्वे, सहकारी शेतकी खरेदी विक्री सहकारी संस्था, चांदुर रेल्वे, दर्यापूर, सहकारी शेतकी खरेदी विक्री संस्था, दर्यापूर, खल्लार, सहकारी शेतकी खरेदी विक्री संस्था, अंतर्गत खल्लार, धारणी, सहकारी शेतकी खरेदी विक्री संस्था, धारणी, नांदगाव खंडेश्वर, सहकारी शेतकी खरेदी विक्री संस्था, नांदगाव खंडेश्वर, तिवसा, सहकारी शेतकी खरेदी विक्री संस्था, तिवसा, अचलपूर, मे. जयसिंग विविध कार्यकारी सहकारी संस्था, अचलपूर, नेरपिंगळाई, विविध कार्यकारी सहकारी संस्था, नेरपिंगळाई येथे असे 9 केंद्र सुरु करण्यात आलेली आहेत.

तसेच विदर्भ को-ऑप मार्केटिंग फेडरेशन लिमिटेट नागपूर यांचे मार्फत एकुण 11 केंद्र सुरु करण्यात आली आहेत.

            अमरावती, सहकारी शेतकी विक्री सहकारी संस्था, अमरावती, धामणगाव रेल्वे, सहाकारी शेतकी खरेदी विक्री संस्था, धामणगाव रेल्वे, वरूड, सहकारी शेतकी खरेदी विक्री सहकारी संस्था, वरूड, मोर्शी, सहकारी शेतकी खरेदी विक्री सहकारी संस्था, वरूड, मोर्शी, सहकारी शेतकी खरेदी विक्री सहकारी संस्था, मोर्शी, चांदुर बाजार, सहकारी शेतकी खरेदी विक्री सहकारी संस्था, चांदूर बाजार, अंजनगाव सुर्जी , सहकारी शेतकी खरेदी विक्री सहकारी संस्था, अंजनगाव सुर्जी, शिंगणापूर, विविध कार्यकारी सहकारी संस्था, शिंगणापूर ता. दर्यापूर, येवदा, एफ. पी. ओ. गणेशपूर ता. दर्यापूर, भातकुली, एफ. पी. ओ. भातकुली ता. भातकुली, कापूसतळणी, एफ. पी. ओ. कापूसतळणी ता. अंजनगाव सुर्जी येथे ही केंद्र आहेत.

            वरील प्रमाणे सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात आलेले आहेत. या खरेदी केंद्रावर सोयाबीन शेतमाल दि. 12 जानेवारी 2025 पर्यंत खरेदी करण्यात येणार असून नोंदणी सद्यस्थितीमध्ये सुरू आहे. ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंद असलेला 7/12 उतारा पिकाच्या नोंदीसहीत, चालू वर्षाचा जमिनीचा 8-अ, आधारकार्ड व आधार लिंक असलेले बँक पासबुक इत्यादी कागदपत्रे सोबत आणावयाची आहेत. या खरेदी केंद्रावर केवळ एफ. ए. क्यु. दर्जाचा शेतमाल विक्रीसाठी आणावयाचा असून शेतमालाचे प्रतवारीचे निकष खालीलप्रमाणे आहेत.

            माती, काडीकचरा, बाह्यप्रदार्थ 2 टक्के, इतर मिश्रण 3 टक्के, इजा पोहोचलेले दाणे 3 टक्के, किरकोळ इजा पोहोचलेले दाणे 4 टक्के, अपरिपक्व दाणे 3 टक्के, कीड लागलेले दाणे 4 टक्के, आद्रता 12 टक्के. तरी सर्व शेतकरी यांनी याची नोंद घेऊन वाळलेला  व आद्रता 12 टक्के पर्यंत असलेला सोयाबीन शेतमाल खरेदी केंद्रावर विक्रीसाठी आणावा व शासनाचे योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थाचे शंकर कुंभार यांनी केले आहे.

000000

 

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...