जिल्ह्यात इतिहासातील सर्वाधिक
मतदानाची नोंद
*गेल्या विधानसभा निवडणुकीपेक्षा
6 टक्के वाढ
*जिल्ह्यात शांततेत विनातक्रार
पार पडले मतदान
*प्रशासनाची तयारी, नागरिकांचा
उत्स्फूर्त सहभाग
अमरावती, दि. 21 (जिमाका) : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी
बुधवार, दि. 20 नोव्हेंबर रोजी उत्साहात मतदान पार पडले. या निवडणुकीच्या निमित्ताने
जिल्ह्याच्या इतिहासातील सर्वाधिक मतदानाची टक्केवारी नोंदविली गेली आहे. तसेच गेल्या
विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत सुमारे 6 टक्के मतदानाची टक्केवारी वाढली आहे. तसेच संपूर्ण
आठही विधानसभा मतदारसंघात शांततेत विनातक्रार मतदानाची प्रक्रिया पार पडली आहे.
गेल्या 2019 च्या विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी
60 एवढी होती. यात विक्रमी 6 टक्यांयानी वाढ होत यावर्षी 66.40 टक्के मतदान झाले आहे.
मतदानाच्या टक्केवारीत ही मोठी वाढ आहे. त्यासोबतच अमरावती जिल्यादाच्या इतिहासातील
ही सर्वाधिक मतदानाची टक्केवारी आहे.
मतदानासाठी प्रशासनाने केलेली तयारी, जनजागृती आणि नागरिकांच्या
उत्साही सहभागाने मतदानाचा टक्का सुधारला आहे. यावेळी विधानसभा निवडणुकीत कोणतीही तक्रार
आलेली नाही. प्रामुख्याने मतदारयादीमध्ये निवडणुकीपूर्वी 1 लाखाहून अधिक नवीन मतदार
नोंदणी केली आहे. त्यामुळे मतदारयादीत नाव नसल्याची कोणतीही तक्रार प्राप्त झालेली
नाही. मतदारांनी मतदान प्रक्रियेत उत्साहात सहभाग घेतल्याने जिल्ह्यातील मतदानाच्या
टक्केवारीत लक्षणीय वाढ झाली आहे. मतदानात नागरिकांनी उत्फुिलर्त सहभाग नोंदविल्याबद्दल
जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी मतदारांचे आभार मानले आहे.
जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघात 8 लाख 91 हजार 3 पुरूष,
7 लाख 99 हजार 847 महिला आणि तृतीयपंथी 30 अशा एकूण 16 लाख 90 हजार 880 मतदारांनी मतदानचा
हक्क बजावला आहे. जिल्ह्याची एकूण मतदानाची टक्केवारी 66.40 आहे.
धामणगाव रेल्वे मतदारसंघात 69.75 टक्के मतदान झाले. यात
1 लाख 17 हजार 222 पुरुष आणि 1 लाख 4 हजार 497 महिला, असे एकूण 2 लाख 21 हजार 719 जणांनी
मतदानाचा हक्क बजावला.
बडनेरा
मतदारसंघात 57.67 टक्के मतदान झाले. 1 लाख 8 हजार 465 पुरुष, 1 लाख 1 हजार 329 महिला
आणि 15 तृतीयपंथीय असे एकूण 2 लाख 9 हजार 809 जणांनी मतदानाचा हक्क बजावला.
अमरावती मतदारसंघात 56.51 टक्के मतदान झाले. यात 1 लाख
10 हजार 997 पुरुष, 1 लाख 599 महिला आणि 10 तृतीयपंथी असे एकूण 2 लाख 11 हजार 606 जणांनी
मतदानाचा हक्क बजावला.
तिवसा
मतदारसंघात 67.93 टक्के मतदान झाले. यात 1 लाख 7 हजार 458 पुरुष, 93 हजार 954 महिला
असे एकूण 2 लाख 01 हजार 412 जणांनी मतदानाचा हक्क बजावला.
दर्यापूर मतदारसंघात 66.85 टक्के मतदान झाले. यात 1 लाख
10 हजार 688 पुरुष, 95 हजार 500 महिला असे एकूण 2 लाख 6 हजार 188 जणांनी मतदानाचा हक्क
बजावला.
मेळघाट
मतदारसंघात 73.14 टक्के मतदान झाले. यात 1 लाख 14 हजार 523 पुरुष, 1 लाख 6 हजार 386
महिला आणि तृतीयपंथी 4 असे एकूण 2 लाख 20 हजार 913 जणांनी मतदानाचा हक्क बजावला.
अचलपूर
मतदारसंघात 72.07 टक्के मतदान झाले. यात 1 लाख 12 हजार 131 पुरुष, 98 हजार 482 महिला,
तृतीयपंथी 1 असे एकूण 2 लाख 10 हजार 614 जणांनी मतदानाचा हक्क बजावला.
मोर्शी मतदारसंघात 71.66 टक्के मतदान झाले. यात 1 लाख 9
हजार 519 पुरुष, 99 हजार 100 महिला असे एकूण 2 लाख 8 हजार 619 जणांनी मतदानाचा हक्क
बजावला.
000000
No comments:
Post a Comment