राष्ट्रीय शालेय कबड्डी स्पर्धेत हरीयाणा प्रथम, महाराष्ट्र द्वितीय
अमरावती, दि. 12 (जिमाका) : 68वी राष्ट्रीय शालेय कबड्डी 14 वर्षे मुले आणि मुली क्रीडा स्पर्धा उत्साहात पार पडली. यात मुले आणि मुलींच्या स्पर्धेत हरीयाणा संघाने प्रथम, तर महाराष्ट्राच्या संघाने दुसरा क्रमांक पटकाविला.
स्पर्धेच्या समारोपाला अतिरिक्त जिल्हाधिकारी सुरेश वाघमारे, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, विद्यापीठाचे कुलसचिव अविनाश असनारे, अतिरिक्त मनपा आयुक्त शिल्पा नाईक, उपजिल्हाधिकारी डॉ. जाधव, क्रीडा उपसंचालक विजय संतान, विदर्भ कबड्डी असोसिएशन जीतू ठाकुर, उपस्थित होते.
मुले व मुली यांच्या अंतिम फेरीत महाराष्ट्र विरुद्ध हरीयाणा यांचा सामना रंगला. मुलांच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक हरीयाणा, द्वितीय महाराष्ट्र, तर कर्नाटक संघाने तृतीय क्रमांक पटकाविला. मुलींच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक हरीयाणा, द्वितीय महाराष्ट्र, तृतीय क्रमांक दिल्ली संघाने पटकाविला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विजेत्या संघांना चषक प्रदान करण्यात आला.
000000
मधमाशी पालनासाठी 50 टक्के अनुदान
अर्ज सादर करण्याचे आवाहन
अमरावती, दि. 12 (जिमाका) : परागीभवनाद्वारे शेती पिके आणि फळबागांच्या उत्पादनात वाढ होण्यासाठी मधमाशीपालन अत्यंत उपयुक्त शेतीपुरक व्यवसाय आहे. यासाठी खादी व ग्रामोद्योग विभागातर्फे 50 टक्के अनुदान उपलब्ध आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध केंद्र योजना राबविण्यात येते. यात मध उद्योगाचे मोफत प्रशिक्षण, साहित्य स्वरुपात 50 टक्के अनुदान आणि 50 टक्के स्वगुंतवणूक, शासनाच्या हमी भावाने मधखरेदी, तसेच विशेष प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध आहे. या योजनेंतर्गत वैयक्तिक मधपाळ हा साक्षर असावा, स्वतःची शेती असल्यास प्राधान्य देण्यात येणार असून वय 18 वर्षापेक्षा जास्त असावे.
केंद्रचालक प्रगतीशील मधपाळ किमान दहावी पास, वय 21 वर्षापेक्षा जास्त आहे अशा व्यक्तीच्या नावे किमान 1 एकर किंवा त्या व्यक्तीच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावे किमान 1 एकर शेती जमीन किंवा भाडे तत्वावर घेतलेली शेतजमिन असावी. लाभार्थ्याकडे मधमाशापालन प्रजनन मध उत्पादनाबाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता व सुविधा असणे आवश्यक आहे. केंद्रचालक संस्थांसाठी संस्था ही नोंदणीकृत असावी, संस्थेच्या नावे अथवा भाडेतत्वावर घेतलेली किमान एक हजार चौरस फुट सुयोग्य इमारत असावी. संस्थेकडे मधमाशापालन, प्रजनन व मध उत्पादनाबाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता असणे आवश्यक आहे.
मध उद्योगाचे प्रशिक्षणाकरीता अर्ज खादी व ग्रामोद्योग मंडळ, द्वारा जिल्हा उद्योग केंद्र, कॅम्प, अमरावती या पत्यावर अर्ज सादर करावे, अधिक माहितीसाठी मध निरीक्षक श्री. आसोलकार, संपर्क क्रमांक 9421111665 यावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांनी केले आहे.
000000
लवाद नामतालिकेसाठी अर्ज आमंत्रित
16 जानेवारीपर्यंत मुदत
अमरावती, दि. 12 (जिमाका) : विभागीय सहनिबंधक सहकारी संस्थेतर्फे लवाद नामतालिका तयार करण्यात येत आहे. यासाठी इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दि. 16 जानेवारी 2025 पर्यंत आहे.
बहुराज्यीय सहकारी संस्था अधिनियम 2002चे कलम 84 (4) अन्वये सन 2025 ते 2028 या कालावधीसाठी लवाद नामतालिका तयार करण्यात येत आहे. यासाठी सर्व न्यायालयातील निवृत्त व सेवानिवृत्त विधी अधिकारी, प्रॅक्टीसिंग अॅडव्होकेटस, चार्टर्ड अकाऊटंट, कास्ट अकाऊटंट, राष्ट्रीय बँक, ग्रामीण बँक, भूविकास बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, व्यापारी बँक, नागरी सहकारी बँक, राज्य सहकारी बँक सेवेतील व्यवस्थापक दर्जापेक्षा कमी दर्जा नसलेले सेवानिवृत्त अधिकारी ज्यांना सेवानिवृत्त होऊन दोन वर्षापेक्षा कमी कालावधी झाला आहे, तसेच सहकार विभागातील उपनिबंधक दर्जापेक्षा वरच्या दर्जाचे सेवानिवृत्त अधिकारी ज्यांना सेवानिवृत्त होऊन दोन वर्षापेक्षा कमी कालावधी झालेला आहे, अशांकडून अर्ज मागविण्यात आले आहे.
तसेच पात्रता धारण करणाऱ्या व्यक्तींची नियुक्ती करताना अधिनियमामध्ये नमूद नसले तरी जादा अर्हता, पात्रता असाव्यात. कोणत्याही स्वरुपाचे गुन्हे दाखल नसावे. शासकीय, बँक सेवेतील सेवानिवृत्त अधिकारी यांची कोणत्याही प्रकारची खातेनिहाय चौकशी चालू नसावी. सेवेत कोणताही ठपका ठेवलेला नसावा, व्यक्ती कोणत्याही काळ्या यादीमध्ये समाविष्ट नसावी. सदर व्यक्ती संबंधित विभागाच्या विभागीय सहकारी सहनिबंधक सहकारी संस्था कार्यालयाच्या अधिपत्याखाली येणाऱ्या जिल्ह्यातील रहिवासी असावा. ही व्यक्ती एकावेळी एकाच विभागातून अर्ज दाखल करु शकणार आहे.
अर्जाचे विहित नमुने विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था, सहकार संकुल, कांतानगर, जुना बायपास रोड, महसूल भवन कार्यालयसमोर, अमरावती यांचे कार्यालयात दि. 17 डिसेंबर ते 16 जानेवारी 2025 या कालावधीत कार्यालयीन वेळेत मिळू शकतील. तसेच प्राप्त अर्जाची छाननी पूर्ण करुन दि. 14 फेब्रुवारी 2025 रोजी प्रारुप लवाद नामतालिका प्रसिद्ध करण्यात येणार आहे. सदर प्रारुप नामतालिका यादी संबंधित विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था. अमरावती कार्यालयात प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
प्रारुप नामतालिकेवर हरकती असल्यास vaidhanik८@gmail.com ई-मेलवर पुराव्यासह दि. 21 फेब्रुवारी 2025 पर्यंत सादर कराव्यात. हरकतीचा निर्णय दि. 11 मार्च 2025 रोजी करुन दि. 18 मार्च 2025 रोजी अंतिम लवाद नामतालिका प्रसिद्ध करण्यात येणार आहे, असे विभागीय सहनिबंधक सहकारी संस्थाचे शंकर कुंभार यांनी कळविले आहे.
00000
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
No comments:
Post a Comment