Thursday, December 26, 2024

DIO NEWS AMRAVATI 26.12.2024

 




वीर बाल दिवसानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

       अमरावती, दि 26 (जिमाका) : वीर बालदिवस निमित्ताने जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात साहिबजादे बाबा जोरावार सिंह आणि बाबा फतेह सिंह यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

      यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, तहसिलदार प्रशांत पडघम यांच्यासह अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

00000

स्वामित्व योजनेंतर्गत तयार झालेल्या सनदांचे

पंतप्रधानांच्या यांच्या हस्ते आज ऑनलाईन वाटप

अमरावती, दि. 26 (जिमाका) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच स्वामित्व योजनेचे उद्घाटन केले. या योजनेचा उद्देश गावातील आबादी क्षेत्रातील घरांसाठी मालमत्ता पत्रक देणे हा आहे. ही योजना  ग्रामीण विकास विभाग, भूमि अभिलेख कार्यालय (महसूल विभाग) आणि सर्व्हे ऑफ इंडिया यांचा संयुक्त उपक्रम असून यासाठी ड्रोन तंत्रज्ञान आणि प्रगत नकाशांकन तंत्रांचा उपयोग केला जातो. ही योजना ग्रामिण समुदायांच्या आर्थिक समावेशनात सुधारणा, पतपुरवठ्यास सुलभता आणि एकूणच सामाजिक-आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते.

             उद्या, शुक्रवार, दि. 27 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 12.30 वाजता  पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वामित्व योजनेतंर्गत 50 लाखांहून अधिक घरमालकांना मालमत्ता कार्डांचे, सनदचे ई-वितरण करतील, तसेच या योजनेतील लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमानंतर मंत्री महोदय किंवा लोकप्रतिनिधी, अधिकारी इत्यादींच्या उपस्थितीत स्थानिक कार्यक्रमांद्वारे मालमत्ता कार्डांचे, सनदचे प्रत्यक्ष वितरण करण्यात येणार आहे.

             स्वामित्व योजनेचे लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी अमरावती विभागातील जिल्ह्यांमधील तालुका आणि पंचायतस्तरावर एकुण 149 गावांमध्ये  स्वामित्व योजनेंतर्गत सनद वाटपाचा कार्यक्रम करण्यात येणार आहे. जिल्हा स्तरावरील कार्यक्रम जिल्हा नियोजन भवन येथे होणार असून केंद्र शासनाकडून प्राप्त यादीनुसार खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्या हस्ते मौजे रामगाव, तालुका अमरावती या गावातील सनद वाटपाचा कार्यक्रम होणार आहे.

          बुलढाणा जिल्ह्यातील एकुण 13 तालुक्यातील 50 गावांमध्ये सनद वाटप कार्यक्रम होणार असून तालुका स्तरावरील कार्यक्रम मोताळा तालुक्यामध्ये होणार आहे.  अकोला जिल्ह्यातील एकुण 7 तालुक्यातील 12 गावांमध्ये सनद वाटप कार्यक्रम राबविण्यात येणार असून जिल्हास्तरावरील कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालय येथे होणार आहे तसेच तालुका स्तरावरील कार्यक्रम मौजे भोकर, तालुका तेल्हारा येथे आयोजित करण्यात आला आहे.  यवतमाळ जिल्ह्यातील 9 तालुक्यातील 44 गावांमध्ये सनद वाटपाचा कार्यक्रम होणार आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये 2 तालुक्यातील एकुण 9 गावांमध्ये हा कार्यक्रम होणार आहे.

00000

संत गाडगेबाबा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शनी आज

अमरावती, दि. 26 (जिमाका) : महाराष्ट्र शासन व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय यांच्यामार्फत राबविल्या जाणाऱ्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रशिक्षण हे प्रात्यक्षिकाभिमुख असून औद्योगिक क्षेत्राला मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाचा पुरवठा केला जातो. संस्थेत मिळणाऱ्या तांत्रिक कौशल्याबरोबरच  प्रशिक्षणार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने पूरक उपक्रम राबविणे व प्रशिक्षणार्थ्यांच्या कौशल्यास तसेच व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने विविध कलागुणांना वाव देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. संत गाडगेबाबा औद्योगिक प्रशिक्षण संस्था  येथे जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शन 2024 चे आयोजन उद्या, शुक्रवार, दि . 27 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता करण्यात येणार आहे. यामध्ये अभियांत्रिकी व्यवसायमधून एकूण 2 मॉडेल व बिगर अभियांत्रिकी व्यवसायमधून 3 मॉडेलची संस्थास्तरावर निवड होऊन जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शनीमध्ये समावेश करण्यात येणार आहे. सदर मॉडेल हे नाविण्यपूर्ण समाजसेवी तसेच व्यवसायाशी निगडित असल्यामुळे भविष्यकालीन औद्योगिक विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. या तंत्रप्रदर्शनीमध्ये सहभाग घेतलेल्या मॉडेल मधून 5 विजेत्या मॉडेलची निवड राज्यस्तरीय तंत्र प्रदर्शनकरिता करण्यात येईल.  प्रदर्शनीच्या नियोजनासाठी जिल्हाव्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी राम मुळे  यांच्या  अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील सर्व शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तांत्रिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तंत्र प्रदर्शनीला भेट देण्याचे आवाहन उपसंचालक सुधा ठोंबरे यांनी केले आहे.

000000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...