Wednesday, December 4, 2024

DIO NEWS AMRAVATI 04.12.2024

 





निरोगी बालकांसाठी जंतनाशक मोहिम यशस्वी करावी

-जिल्हाधिकारी सौरभ कटियार

*नांदगाव पेठ येथे जंतनाशक मोहिमेला सुरवात

अमरावती, दि. 4 : बालकांच्या सुदृढ आणि निरोगी आयुष्यासाठी राष्ट्रीय जंतनाशक मोहिम राबविण्यात येत आहे. यात सर्व बालकांनी सहभागी होऊन गोळी घ्यावी. तसेच आरोग्य, महिला व बालविकास, आशासेविकांनी घरोघरी पोहोचून जंतनाशक मोहिम यशस्वी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले.

जंतनाशक मोहिमेची सुरवात नांदगाव पेठ येथील सरस्वती गोसावी विद्यामंदिर आश्रमशाळेतून करण्यात आली. यावेळी नांदगाव पेठच्या सरपंच कविता डांगे, संस्थेचे उपाध्यक्ष सतिश पुरी, सचिव विनोद गोसावी,  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश असोले, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रविण पारिसे, जिल्हा साथ रोग अधिकारी डॉ. अली, जिल्हा आयुष अधिकारी डॉ. पल्लवी आगरकर, तालुका अधिकारी डॉ. सुर्यवंशी, शिक्षणाधिकारी अरविंद मोहरे, प्राचार्य श्रावण पवार, ग्रामपंचायत सदस्य वृशाली इंगळे, आदी उपस्थित होते.

श्री. कटियार यांनी, बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ही महत्वाची मोहिम आहे. जिल्ह्यात पाच लाखाहून अधिक बालकांना जंतनाशकाची गोळी देण्यात येणार आहे. या मोहिमेचा चांगला फायदा होणार आहे. बालकांची वाढ थांबलेली असल्यास यामुळे दूर करता येणार आहे. यात पालक, ग्रामपंचायत मोलाची भूमिका बजावू शकत असल्याने त्‍यांनी जनजागृती करावी. तसेच शाळा, अंगणवाडी यांनी बालकांना गोळी उपलब्ध करून द्यावी. या मोहिमेत एकही बालक वंचित राहू नये याची काळजी घ्यावी, असे सांगितले.

डॉ. असोले यांनी प्रास्ताविकातून गोळी घेण्याचे महत्व सांगतिले. वर्षातून दोन वेळा ही मोहिम राबविण्यात येते. याचा बालकांनी लाभ घ्यावा, तसेच हात धुण्याची सवय बाळगण्याचे आवाहन केले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाळेतील बालकांना गोळी देऊन मोहिमेला सुरवात करण्यात आली. निलेश दळवी यांनी सूत्रसंचालन केले. एस. एस. पवार यांनी आभार मानले.

000000

ध्वजनिधी संकलनाला सुरवात

        अमरावती, दि. 04 (जिमाका):  जिल्ह्यातील ध्वजनिधी संकलनाला सोमवार, दि. 16 डिसेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता सुरवात होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात ध्वजनिधी संकलन व माजी सैनिकांचा मेळावा होणार आहे. यावेळी माजी सैनिक, विधवा यांनी परिवारासह उपस्थित राहावे. असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.   

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...