Monday, December 9, 2024

DIO NEWS AMRAVATI 09.12.2024

 




राष्ट्रीय शालेय कबड्डी स्पर्धेचे आज उद्घाटन

अमरावती, दि. 09 (जिमाका) : क्रीडा व युवक संचालनालय आणि भारतीय क्रीडा शालेय महासंघाच्या वतीने 14 वर्षे मुले, मुलींची  68वी राष्ट्रीय शालेय कबड्डी  क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे उद्घाटन मंगळवार, दि. 10 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता विभागीय क्रीडा संकुलात होणार आहे.

स्पर्धेचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी, संजिता महापात्रा यांच्या हस्ते होणार आहे. आमदार सुलभाताई खोडके अध्यक्षस्थानी राहतील. उद्घाटन कार्यक्रमात प्रकाश मेश्राम गृप, अमरावती  इनक्रेडीबल इंडिया सांस्कृतिक कार्यक्रम, तसेच मल्लखांब प्रशिक्षक नरेंद्र गाडे हे रोप मल्लब खेळाचे प्रात्यक्षिक सादर करतील. 

त्यानुसार स्पर्धा आयोजन विभागीय उपसंचालक कार्यालय यांनी केले आहे. या स्पर्धा दि. 9 ते 12 डिसेंबर कालावधीत होणार आहे. या स्पर्धेत देशभरातील 30 मुलांचे संघ आणि 27 मुलींचे संघ असे 57 संघ स्पर्धेत सहभागी होणार आहे. यात 420 मुले व 378 मुली खेळाडू असे एकूण 798 खेळाडू, संघ व्यवस्थापक व क्रीडा मार्गदर्शक या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.  स्पर्धेचे तांत्रिक आयोजन करण्यासाठी 50 पंच आणि सामनाधिकारी एसजीएफआयचे पदाधिकारी स्पर्धेसाठी परिश्रम घेत आहेतृ सदर राष्ट्रीय शालेय कबड्डी स्पर्धाचे सर्व सामने विभागीय क्रीडा संकुलातील इंनडोअर हॉलमध्ये फ्लडलाईटमध्ये होणार आहे.

स्पर्धेचे आयोजन लिग कम नॉकाऊट पद्धतीने करण्यात आले आहे. तीन दिवस चालणाऱ्या स्पर्धेत 180 सामन्याचे आयोजन करण्यात येणार आहे. स्पर्धामध्ये सर्व विजेता आणि उपविजेता मुले, मुलींच्या संघाला चषक देवून सन्मानित करण्यात येणार आहे.

000000

शिष्यवृत्तीचे प्रलंबित अर्ज निकाली काढण्याचे आवाहन

अमरावती, दि. 9 (जिमाका) : सामाजिक न्याय विभागामार्फत महाडीबीटी प्रणालीवर अनुसूचित जाती प्रवर्गातील विविध शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येतात. यात सुमारे सहा हजार अर्ज महाविद्यालय आणि विद्यार्थीस्तरावर प्रलंबित आहेत. सदर अर्ज तातडीने प्रलंबित काढावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

सामाजिक न्याय विभागाच्या वतीने भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा फी योजना, राजश्री शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यवसायिक पाठ्यक्रमाशी संलग्न वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता योजना राबविण्यात येतात.यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अनुसूचित जाती व विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गासाठी नवीन अर्ज  व नूतनीकरणाचे अर्ज भरण्याकरिता दि. 25 जुलै 2024पासून सुरूवात झाली. सन 2024-25 वर्षाचे दि. 9 डिसेंबर 2024 रोजीच्या महाडीबीटीनुसार जिल्ह्यातील  महाविद्यालयस्तरावर शिष्यवृत्तीचे 5 हजार 847 अर्ज, तर विद्यार्थीस्तर 370 अर्ज प्रलंबित आहेत.

महाविद्यालयांनी शिष्यवृत्ती अर्ज विहित मुदतीत जिल्हा कार्यालयाकडे पाठविणे आवश्यक आहे.मात्र महाविद्यालयांनी सदर अर्ज  मंजुरीसाठी समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त यांच्याकडे सादर करण्याबाबत वेळोवेळी कळविण्यात आले आहे. या कार्यालयामार्फत व्हीसी, बैठक व पत्राद्वारे वेळोवेळी अवगत करुनही शिष्यवृत्ती अर्ज प्रलंबित आहेत.

त्यामुळे जिल्ह्यातील महाविद्यालयस्तरावर प्रलंबित असलेले पात्र अर्ज जिल्हा लॉगिनवर पाठविण्यात आले आहे. तसेच विद्यार्थी लॉगिनकडे त्रृटी पूर्ततेकरिता परत केलेले अर्जाची संबंधित महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून त्वरित त्रृटीपूर्तता करून पात्र अर्ज जिल्हा लॉगिन दि. 30 डिसेंबर 2024 पर्यंत  पाठविण्यात यावे, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त राजेंद्र जाधववर यांनी केले आहे.  

00000

ॲड. निलेश हेलोंडे पाटील यांचा दौरा

अमरावती, दि. 9 (जिमाका): कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲड. निलेश हेलोंडे पाटील मंगळवार, दि. 10 डिसेंबर 2024 रोजीचा अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.

ॲड. हेलोंडे हे मंगळवार, दि. 10 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 11.30 वाजता श्री शिवाजी कृषी महाविद्यालय, अमरावती येथील कृषक सभागृहात आयोजित कृषीमाल प्रक्रिया उद्योग या एकदिवसीय कार्यशाळेला उपस्थित राहतील.

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...