आयटीआयमध्ये सोमवारी शिकाऊ उमेदवारी भरती मेळवा
अमरावती, दि. 6 (जिमाका) : अमरावती येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सोमवार, दि. 9 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
भरती मेळाव्यात जॉन डिरे इंडिया प्रायव्हेट लिमिटेट, पुणे तसेच जिल्ह्यातील स्थानिक कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. या भरती मेळाव्यासाठी आयटीआय आर्किटेक्चर, ड्राफ्टस्मन, सिविल ड्राफ्टस्मन, मेकॅनिक ड्राफ्टस्मन, फिटर, वायरमन, टर्नर, मशिनिस्ट, वेल्डर, इलेक्ट्रिशियन, कारपेंटर, इलेक्ट्रॉनिक्स, अकाऊटंट, सुइंग टेक्नॉलॉजी, ड्रेस मेकिंग, फॅशन टेक्नॉलॉजी, कोपा, ट्रॅक्टर मेकॅनिक, डिझेल मेकॅनिक आणि मोटर मेकॅनिक व्यवसाय उत्तीर्ण उमेदवारांनी सहभागी व्हावे. प्रशिक्षणार्थ्यांनी बायोडाटा आणि मूळ कागदपत्राच्या झेरॉक्स प्रती सोबत आणणे आवश्यक आहे. या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपसंचालक, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे सहायक प्रशिक्षणार्थी सल्लागार यांनी केले आहे.
00000
महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन
अमरावती, दि. 6 (जिमाका) : नेहरू युवा केंद्रातर्फे मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.
प्राचार्य डॉ. स्मिता देशमुख अध्यक्षस्थानी होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा युवा अधिकारी स्नेहल बासुतकर, प्रा. डॉ देविदास बांबोळे, प्रा. जनार्दन सांगोळे, प्रा. डॉ. मंदा नांदूरकर आदी उपस्थित होते. डॉ. सतीश तराळ यांनी यावेळी मार्गदर्शन केले. प्रा. रूपाली तळेगावकर यांनी सूत्रसंचालन केले.
00000
मृद चाचणी प्रयोगशाळेतील कर्मचाऱ्यांचा सन्मान
अमरावती, दि. 9 (जिमाका): जागतिक मृदा दिनी कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲड. निलेश हेलोंडे पाटील यांच्या हस्ते जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी प्रयोगशाळतील कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
आपल्या दैनंदिन जीवनात मृदा महत्त्वाची आहे आपल्याला मातीचे महत्व सांगण्यासाठी व मातीच्या गुणवत्तेची जाणीव करून देण्यासाठी दरवर्षी 5 डिसेंबर रोजी जागतिक मृदा दिन साजरा केला जातो. परंतु माती वाचवण्याची गरज का आहे हे देखील महत्त्वाचे असते. प्रदूषण व कीटकनाशकाच्या अतिवापरामुळे दरवर्षी मातीची गुणवत्ता ही कमी होत आहे. त्याकरिता माती परीक्षण करणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने अँड. निलेश हेलोंडे पाटील यांनी जिल्हा मृदा सर्वेक्षण मृद चाचणी प्रयोगशाळा अमरावती येथे प्रत्यक्ष माती परीक्षण याबाबत माहिती घेऊन प्रयोग शाळेमध्ये कर्मचाऱ्याचा सन्मान केला.
यावेळी विभागीय कृषी सहसंचालक प्रमोद लहाले, विभागीय अधिक्षक डॉ. प्रशांत नाईक, जिल्हाधिक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते, उपविभागीय कृषी अधिकारी प्रफुल्ल सातव, कृषी पर्यवेक्षक भास्कर भंकाळे, कृषी सहायक वृषाली पाटील, कल्पना ढोके, कांचन बोंडे, जनसंपर्क अधिकारी प्रमोद कापडे उपस्थित होते.
00000
उमेश रमेश नाईक यांनी हजर होण्याचे आवाहन
अमरावती, दि. 9 (जिमाका): जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, अमरावती यांचे अधिनस्त अधिक्षक शासकीय मुलांचे अनुरक्षणगृह, वरिष्ठ बालगृह, अमरावती संस्थेत स्वयंपाकी पदावर उमेश रमेश नाईक हे काम करीत होते. उमेश रमेश नाईक यांनी स्वयंपाकी पदावर कार्यरत असताना कर्तव्यात कसूर केल्याबाबत त्यांच्यावर दोषारोप लावण्यात आले आहे. त्यानुसार त्यांना हजर होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
उमेश रमेश नाईक स्वयंपाकी यांनी म्हणणे मांडणे कामी त्यांचेकडे असलेल्या आवश्यक पुरावे, कागदपत्रासह त्यांना दि. 29 ऑक्टोबर, दि. 6 नोव्हेंबर, दि. 14 नोव्हेंबर, व दि. 28 नोव्हेंबर 2024 रोजी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, महिला व बाल विकास भवन, राणी दुर्गवती चौक, कॅम्प रोड, अमरावती येथे हजर राहण्यासाठी कळविण्यात आले आहे. परंतू उपरोक्त दिनांकास ते गैरहजर राहिले आहेत. त्यामुळे त्यांचे म्हणणे या कार्यालयासमोर आलेले नाही.
त्यांचे म्हणणे मांडणे कामी असलेल्या आवश्यक पुरावे, कागदपत्रासह आठ दिवसाचे आत न चुकता हजर राहावे. ही अंतिम संधी देण्यात येत आहे. सदर कालावधीत म्हणणे आवश्यक कागदपत्र व पुराव्यासह हजर न झाल्यास आपले काहीही म्हणणे नाही असे गृहित धरून श्री नाईक यांच्या प्रकरणावर पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. याची गांर्भीयाने नोंद घेण्यात यावी, असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी कळविले आहे.
0000
.jpeg)
.jpeg)
.jpeg)

No comments:
Post a Comment