महिला सक्षमीकरणासाठी लघुउद्योगांना चालना
-
पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर
अमरावती
येथील मायनॉरिटीज इंडीयन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज तर्फे एस.के.प्रॉडक्शन
अगरबत्ती उद्योगाचे उद्घाटन पालकमंत्री श्रीमंती
ठाकूर यांच्या हस्ते झाले.त्यावेळी त्या बोलत होत्या.
पालकमंत्री
श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, मायनॉरिटीज इंडीयन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड
इंडस्ट्रीजतर्फे अगरबत्ती व्यवसायाचा शुभारंभ आज होत आहे, ही अत्यंत आनंदाची बाब
आहे. या उद्योगामुळे अल्पसंख्याक समाजातील महिलाभगिनींना रोजगार मिळून आर्थिक
स्थैर्य मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
त्या
पुढे म्हणाल्या की, महिला ही कुटुंबाचा आधार असते. महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी
झाली की कुटुंबाची प्रगती होते. अल्पसंख्याक भगिनींना रोजगार मिळवून देण्यासाठी
लघुउद्योग व व्यवसायांचे जाळे निर्माण होणे आवश्यक आहे. या दृष्टीने चेंबर्सने
उचललेले पाऊल स्वागतार्ह आहे. अशा उपक्रमांना शासनाकडून आवश्यक ती सर्व मदत केली
जाईल, असेही त्यांनी सांगितले.
00000




No comments:
Post a Comment