Saturday, August 15, 2020

जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

 जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

 

अमरावती, दि. 15 : भारतीय स्वातंत्र्याच्या 73 व्या वर्धापनदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.प्रारंभी  राष्ट्रध्वज वंदन समारंभ व राष्ट्रगीत झाले. त्यानंतर जिल्हाधिकारी श्री. नवाल  यांनी सर्व अधिकारी व कर्मचारी  यांच्याशी संवाद साधला. 

अतिरिक्त जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे,  उपजिल्हाधिकारी स्नेहल कनीचे, मनोज लोणारकर,जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल टाकसाळे, जिल्हा सूचना अधिकारी अरुण रणवीर, जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे,  अधीक्षक गजेंद्र मालठाणे, विधी अधिकारी नरेंद्र बोहरा, श्री. धकीते, श्री. नागरे आदी यावेळी उपस्थित होते.

कोरोना संकटकाळात आपली सर्वांची जबाबदारी वाढली आहे. ही जबाबदारी समर्थपणे पार पाडण्यासाठी आपले स्वतःचे आरोग्य सुदृढ असणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्वांनी स्वतःचे आरोग्यही जपावे, अशी सदिच्छा व्यक्त करत जिल्हाधिकारी यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. 











No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 04-09-2025

  जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपाच्या ४५ पदांसाठी रोजगार मेळावा     अमरावती, दि. ४ : जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपा तत्त्वावरील ४५ पदांवर न...