पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा दौरा
अमरावती, दि. 9 (जिमाका) : पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे गुरूवार, दि. 10 एप्रिल रोजी अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.
त्यांच्या दौऱ्यानुसार सकाळी 10.30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या 60व्या पुण्यतिथी कार्यक्रमाला उपस्थित राहतील. त्यानंतर सकाळी 11.45 वाजता पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयातील डायलेसीस सेंटरचे उद्घाटन करतील. दुपारी 12.30 वाजता संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटनेच्या सानुग्रह अनुदान निधी वाटप कार्यक्रमाला उपस्थित राहतील. दुपारी 1.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील वॉर रूम आणि हॅलो कलेक्टर संवादचे उद्घाटन करतील. दुपारी 2 वाजता अमरावती उपविभागीय अधिकारी कार्यालयातील महसूली वाचनालयाचे लोकार्पण आणि फ्री होल्ड वर्ग 1 केलेल्या जमिनीचे लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण करतील. दुपारी 2.30 वाजता अमरावती तहसील अंतर्गत येणाऱ्या सरपंचांना शेत वहीवाटी रस्त्याचे नकाशे वितरण करण्यात येतील. दुपारी 3 वाजता अमरावती शहर पोलीस दलातर्फे आयोजित लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहतील. त्यानंतर दुपारी 4 वाजता अमरावतीहून नागपूरकडे प्रस्थान करतील.
000000
अमरावती उपविभागीय कार्यालयात 'ई-जनसंवाद'
अमरावती, दि. 9 (जिमाका) : मुख्यमंत्री यांच्या 100 दिवस कृती आराखड्याचा भाग म्हणून अमरावती उप विभागीय कार्यालयाने ‘ई-जनसंवाद’हा नवीन उपक्रम राबविण्यास सुरूवात केली आहे. या उपक्रमामुळे नागरिकांना त्यांच्या समस्या आता घरबसल्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवता येणार आहेत.
उप विभागीय अधिकारी, अमरावती यांच्यासोबत थेट संवाद साधण्यासाठी, प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या मंगळवारी सकाळी 10 ते 11 या वेळेत ऑनलाईन माध्यमातून संपर्क साधता येईल. यासाठी नागरिकांना कार्यालयात येण्याची आवश्यकता नाही, त्यामुळे त्यांचा वेळ आणि पैसा दोन्हीची बचत होणार आहे. या उपक्रमाची सुरुवात 8 एप्रिलपासून करण्यात आली आहे. नागरिकांनी यात सहभाग नोंदवून समस्या आणि सूचना मांडल्या. नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले असून नाविन्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक होत आहे.
उपक्रमात नवीन अग्रवाल, दिलीप दलाल, नितीन हटवार, अरुण राऊत, संजय मोहोड, डॉ. जामठे, नरेंद्र भगत यांनी ऑनलाईन सहभाग घेतला. त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी संबंधित विभागांना पत्र पाठवण्यात आले आहे.
00000
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे उद्धाटन संपन्न
अमरावती, दि. 09 (जिमाका): भारतरत्न डॉ. बाबासाहेव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दि. 8 ते 14 एप्रिल 2025 या कालावधीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अनुसुचित जाती व वंचित दुर्बल घटकांतील व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय साध्य करण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती सर्व सामान्य जनतेला व्हावी व जनतेत जनजागृती व्हावी या उददेशाने हा सप्ताह राबविला जातो. सामाजिक न्याय भवन येथे या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी सामाजिक न्यायाचे प्रेरणास्थान छत्रपती शाहु महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतितेला पुष्प्हार अर्पण करुन भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामुहिक वाचन करण्यात आले.
निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या उपायुक्त जया राऊत, वित्त व लेखा सहायक संचालक डॉ. दिनेश मेतकर, इतर मागास बहुजन कल्याण विभाग सहायक संचालक गजेंद्र मालठाने, जिल्हा समाज कल्याण अधिकारी ज्ञानबा पुंड, समाज कल्याण सहायक आयुक्त राजेन्द्र जाधवर, समाज कल्याण अधिकारी सरीता बोबडे, सहायक लेखाधिकारी विश्वास डाखोरे तसेच समाज भूषण पुरस्कारार्थी यावेळी उपस्थित होते.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले लोकहिताचे कार्य हे आपल्या सर्वांना सदैव प्रेरणादायी आहे. डॉ. बाबासाहेबांच्या विचारातून व कृतीमधून प्रेरणा घेवून सामाजिक न्यायाची संकल्पना उदयास आली. तसेच शासनाचा सामाजिक समता सप्ताह कार्यक्रम हा सामाजिक न्यायाच्या लोककल्याणकारी योजनांची जनजागृती करण्याचा संकल्प आहे. तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातुन दिलेली संविधानिक मूल्ये समता, न्याय, बंधुतेचा जनमानसात जागर करणारा सर्वांगीण उपक्रम असून या उपक्रमांमधे आपल्या सर्वांनी सहभागी व्हावे, असे मत श्री. भटकर यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र जाधवर यांनी केले. सुत्रसंचालन श्रीकृष्ण पखाले तर आभार प्रदर्शन सरीता बोबडे यांनी केले.
0000
परिवहनेत्तर ( तीनचाकी) संवर्गातील नवीन वाहनांसाठी नवीन
वाहन मालिका सुरू करण्याबाबत आवाहन
अमरावती, दि. 09 (जिमाका): परिवहनेत्तर ( तीनचाकी) संवर्गातील नवीन वाहनांसाठी नवीन वाहन मालिका सुरू करण्यात येत आहे. इच्छुक अर्जदारांनी मंगळवार, दि. 15 एप्रिल 2025 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2.30 वाजेपर्यंत पसंती क्रमांकाच्या विहित शुल्काच्या डिमांड ड्राफ्टसह अर्ज परिवहन कार्यालय, कॅम्प, अमरावती, खिडकी क्रमांक -25 येथे जमा करावेत. वाहन ज्याच्या नावावर असेल त्या व्यक्तीच्या नावाच्या अर्जासोबत त्यांच्या पत्त्याचा पुरावा, पॅन कार्ड जोडावे. तसेच अर्जामध्ये वाहन ज्या व्यक्तीच्या नावे आहे, त्या व्यक्तीचा आधारकार्डला संलग्न असलेला भ्रमणध्वनी क्रमांक नमुद करणे आवश्यक आहे. पसंती क्रमांक डिमांड ड्राफ्ट अमरावती, कॅम्प ब्रांच, ट्रेझरी ब्रांच कोड नं 003866 साठी देय असावा.
एका पसंती क्रमांकासाठी एकच अर्ज आला असेल, त्यांची व एकाच पसंती क्रमांकासाठी दोन किंवा दोनपेक्षा जास्त अर्ज आले असतील, त्यांच्या पसंती क्रमांकाची यादी दि. 15 एप्रिल 2025 रोजी 4 वाजता कार्यालयातील नोटीस बोर्डवर प्रदर्शित करण्यात येईल. एकाच पसंती क्रमांकासाठी दोन किंवा दोनपेक्षा जास्त अर्ज आलेल्या यादीमधील पसंती क्रमांकांसाठी ज्यांनी अर्ज केला आहे, अशाच अर्जदारांनी दि. 16 एप्रिल 2025 रोजी दुपारी 1.30 वाजेपर्यंत त्या क्रमांकासाठी पसंती क्रमांक शुल्काच्या डिमांड ड्राफ्ट व्यतिरिक्त जादा रक्कमेचा डिमांड ड्राफ्ट बंद लिफाफ्यात सीलबंद करून खिडकी क्रमांक -25 वर जमा करावे.
एकाच पसंतीक्रमांकासाठी दोन किंवा दोनापेक्षा जास्त अर्ज प्राप्त होऊन सिलबंद लिफाफ्यात सादर केलेल्या जादा रक्कमेचा डिमांड ड्राफ्ट धारकांनी दि. 16 एप्रिल 2025 रोजी दुपारी 3 वाजता प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या दालनात उपस्थित रहावे. लिलावासाठी उपस्थित राहणा-या अर्जदाराने किंवा त्यांच्या प्रतिनिधीने ओळखपत्र व प्राधिकार पत्रासह हजर रहावे. कार्यालयात सादर झालेले जादा रक्कमेचे डिमांड ड्राफ्ट अर्जदारासमोर उघडण्यात येतील. ज्या अर्जदाराने जास्त रक्कमेचा ड्राफ्ट सादर केला असेल, त्याला तो पसंती क्रमांक देण्यात येईल व उर्वरित कमी रक्कमेचा ड्राफ्ट संबंधित अर्जदारांना परत देण्यात येईल. तसेच, विहित वेळेत अनुपस्थित अर्जदारांचा कुठलाही प्रकारचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी. पसंती क्रमांकासाठी कोणत्याही अर्जदारास दुरध्वनी, भ्रमणध्वनी अथवा एसएमएस केला जाणार नाही, याची नोंद घ्यावी., असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे.
00000
राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांचा दौरा
अमरावती, दि. 9 (जिमाका) : गृह (ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार व खनिकर्म राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर हे गुरूवारी, दि. 10 एप्रिल रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.
दौऱ्यानुसार, डॉ. भोयर 10 एप्रिल रोजी सकाळी 5.50 वाजता बडनेरा रेल्वे स्थानकावर पोहोचतील. त्यानंतर सकाळी 6.30 ते 8.15 वाजेपर्यंत विश्रामगृह येथे राखीव आहे. सकाळी 8.30 वाजता किरण पातुरकर यांच्या निवासस्थानी भेट देतील. त्यानंतर सकाळी 9 वाजता महापालिका सभागृहात शिक्षण विभागाच्या अमरावती विभागीय आढावा बैठकीस उपस्थित राहतील. सकाळी 10.30 वाजता शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या 60व्या पुण्यतिथी कार्यक्रमास उपस्थित राहतील. त्यानंतर 2 वाजता पुलगावकडे प्रस्थान करतील.
000000
राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन 10 मे रोजी
अमरावती, दि. 09 (जिमाका) : सर्व न्यायालयात शनिवार, दिनांक 10 मे रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
लोकअदालतीमध्ये दाखल व दाखलपूर्व असे प्रकरणे तडजोडीने व सामंजस्याने निकाली काढण्यासाठी ठेवण्यात येणार आहेत. राष्ट्रीय लोक अदालतीत सहभागी होण्यासाठी कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही. नागरिक तसेच पक्षकारांनी तडजोडप्राप्त प्रलंबित खटले राष्ट्रीय लोक अदालत समक्ष तडजोडीने व सामंजस्याने मिटविण्यासाठी संबंधित न्यायालयात अर्ज करावा. तसेच दाखलपूर्व प्रकरणाबाबत नजीकच्या संबंधित जिल्हा किंवा तालुका न्यायालय येथे संपर्क साधावा. नागरिक तसेच पक्षकारांनी राष्ट्रीय लोकअदा
0000
समता पंधरवड्यात जात प्रमाणपत्र पडताळणीची विशेष मोहीम
अमरावती, दि. 09 (जिमाका): भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत राज्यभर राबविण्यात येत असलेल्या 'समता पंधरवड्या'अंतर्गत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, कार्यालयात आज विशेष सुनावणी घेण्यात आली. या सुनावणीदरम्यान, प्रलंबित असलेल्या प्रकरणांमधील ज्या अर्जदारांची कागदपत्रे परिपूर्ण आढळली, त्यांना तातडीने म्हणजेच त्याच दिवशी जात वैधता प्रमाणपत्र निर्गमित करण्यात आले.
समितीने 11वी व 12वी विज्ञान शाखेत सन 2025-26 मध्ये प्रवेश घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी जात वैधता प्रमाणपत्र मिळवण्याची विशेष मोहीम आयोजित केली आहे.
या अनुषंगाने आज येथील जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयात महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडली. या सुनावणीमध्ये अध्यक्ष तथा अपर जिल्हाधिकारी सोनाली मुळे, उपायुक्त तथा सदस्य जया राऊत, संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव सरिता बोबडे, विधी अधिकारी रितु तराळ उपस्थित होत्या. या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत, ज्या प्रकरणांमध्ये आवश्यक कागदपत्रे पूर्ण होती, अशा अर्जदारांना कोणताही विलंब न लावता जागेवरच जात वैधता प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, अमरावती कार्यालयाने "समता पंधरवड्या"च्या माध्यमातून प्रलंबित जात प्रमाणपत्र प्रकरणांचा निपटारा जलद गतीने करण्याचा निर्धार केला आहे. अधिकाऱ्यांच्या या तत्पर भूमिकेमुळे अर्जदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. ही विशेष मोहीम 14 एप्रिल 2025 पर्यंत सुरू राहणार असून, अधिकाधिक गरजूंनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
00000
मंत्री दत्तात्रय भरणे यांचा दौरा
अमरावती, दि. 9 (जिमाका) : क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री दत्तात्रय भरणे हे शुक्रवारी, दि. 11 एप्रिल रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.
दौऱ्यानुसार, श्री. भरणे 11 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता अमरावती विश्रामगृह येथे आगमन होईल. सकाळी 10.15 वाजता संतोष महात्मे यांचा निवासस्थानी भेट. सकाळी 11 वाजता श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे शारीरिक शिक्षण महाविद्यालयात पदवी वितरण, गुणवंत विद्यार्थ्यांना मेडल व प्रमाणपत्र वितरण व सत्कार कार्यक्रमास उपस्थित राहतील. दुपारी 1 वाजता सुरेखाताई ठाकरे यांच्या निवासस्थानी भेट. दुपारी 2 वाजता आमदार संजय खोडके यांच्या निवासस्थानी भेट आणि त्यानंतर दुपारी 3 वाजता अमरावती येथून नागपूरकडे प्रस्थान करतील.
00000
No comments:
Post a Comment