Wednesday, April 30, 2025

DIO NEWS AMRAVATI 30-04-2025

 


राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, बसवेश्वर महाराज यांना अभिवादन

अमरावती, दि. 30 (जिमाका): जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि बसवेश्वर महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी गोविंद दाणेज, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

000000





महाराष्ट्र दिनी मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते राष्ट्रध्वज वंदन

 

अमरावती, दि. 30 (जिमाका) : महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित मुख्य समारंभात शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते राष्ट्रध्वज वंदन करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्याच्या 66व्या स्थापना दिनानिमित्त, गुरुवार, दि. 1 मे 2025 रोजी सकाळी 8 वाजता अमरावती शहर येथील पोलीस मुख्यालय, अमरावती शहर परेड मैदान येथे ध्वजवंदन व संचालन समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी समारंभाच्या ठिकाणी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन विभागीय आयुक्त श्वेता सिंघल यांनी केले आहे.

000000


No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 21.06.2025

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा: 'एक पृथ्वी, एक...