जिल्हाधिकारी कार्यालयात भारतरत्न डॉ.
बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
अमरावती, दि.14 (जिमाका) : भारतरत्न
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात तहसिलदार निलेश खटके
यांनी पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे, जिल्हा
पुरवठा अधिकारी निनाद लांडे, विधी अधिकारी नरेंद्र बोहरा तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील
अधिकारी व कर्मचारी यांनी डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
00000
जिल्हा माहिती कार्यालयात भारतरत्न डॉ.
बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
अमरावती, दि.14(जिमाका) : भारतरत्न डॉ.
बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आज जिल्हा माहिती कार्यालय येथे जिल्हा माहिती अधिकारी
गजानन कोटूरवार यांनी पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
यावेळी योगेश गांवडे, सागर राणे, कोमल
भगत, राजश्री चौरपगार, आकाश आठवले यांनी डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण
करून अभिवादन केले.
00000


No comments:
Post a Comment