Tuesday, April 15, 2025

DIO NEWS AMRAVATI 15-04-2025

                                                        अमरावती विमानतळ आणि प्रवाशी

विमानसेवेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

अमरावती, दि. 15 (जिमाका) : अमरावती विमानतळ व प्रवाशी विमानसेवेचा शुभारंभ बुधवार, दि. 16 एप्रिल रोजी सकाळी 10.30 वाजता अमरावती विमानतळ येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी एअर इंडिया उड्डाण प्रशिक्षण संस्थेच्या विमान उड्डाणाचे प्रात्यक्षिक होणार आहे.

यावेळी केंद्रीय विमान वाहतूक मंत्री किंजरापू राम मोहन नायडू, राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार डॉ. अनिल बोंडे, बळवंत वानखडे, अमर काळे, आमदार किरण सरनाईक, धिरज लिंगाडे, संजय खोडके, रवी राणा, सुलभा खोडके, प्रतापदादा अडसड, केवलराम काळे, राजेश वानखडे, प्रविण तायडे, उमेश यावलकर, गजानन लवटे, अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी, विभागीय आयुक्त श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी सौरभ कटियार उपस्थित राहतील. या कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेडच्या उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडे यांनी केले आहे.

पोलीस विभागाच्या प्रशासकीय तसेच निवासस्थान इमारतींचे लोकार्पण कार्यक्रम

मुख्यमंत्री यांच्या हस्ते अमरावती ग्रामीण पोलीस घटकातील मौजे कोंडेश्वर येथील व इतर ठिकाणच्या प्रशासकीय इमारती आणि निवासस्थान इमारतींचा तसेच शासकीय चारचाकी वाहनांचा लोकार्पण कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम उद्या दुपारी 12 वाजता सर्वे नंबर 29,  मौजा बडनेरा, (कोंडेश्वर) येथे होणार आहे.  या कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी केले आहे. तसेच पोलीस आयुक्त कार्यालयातील वाहने, वातानुकूलित वाहतूक कक्ष तसेच

महिला विसावा कक्षाचे लोकार्पण कार्यक्रम

पोलीस आयुक्त कार्यालय, अमरावती शहर यांच्यासाठी वाहने, वातानुकूलित वाहतूक कक्ष व महिला विसावा कक्षाचे लोकार्पण कार्यक्रम पोलिस आयुक्त कार्यालय, अमरावती शहर यांच्यासाठी वाहने, वातानुकूलित वाहतूक कक्ष व महिला विसावा कक्षाचे लोकार्पण मान्यवरांच्या उपस्थितीत उद्या दुपारी 12 वाजता याच ठिकाणी करण्यात येणार आहे. जिल्हा वार्षिक योजना सन 2024-25 अंतर्गत जिल्हा नियोजन समिती, अमरावती यांच्याकडून मंजूर अनुदानातून पोलीस आयुक्त कार्यालयासाठी वाहने, वातानुकूलित वाहतूक कक्ष व महिला विसावा कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

000000

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा दौरा

अमरावती, दि. 15 (जिमाका) : पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे बुधवार, दि. 16 एप्रिल रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

त्यांच्या दौऱ्यानुसार, सकाळी 10.30 वाजता अमरावती विमानतळाचे आणि प्रवासी विमानसेवेचे लोकार्पण, तसेच एअर इंडिया उड्डाण प्रशिक्षण संस्थेच्या विमान उड्डाणाचे प्रात्यक्षिक कार्यक्रमाला उपस्थित राहतील. त्यानंतर दुपारी 12.45 वाजता कौंडेश्वर येथे दुपारी 1 वाजता जिल्हा ग्रामीण पोलीस अधिकारी, कर्मचारी यांचे निवासस्थान व पोलीस ठाण्यांचे लोकार्पण, तसेच शहर पोलीस दलाच्या अत्याधुनिक व पायाभूत सुविधेकरिताच्या वाहनांचा लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहतील.

त्यानंतर दुपारी 2 वाजता संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात दुपारी 2.15 वाजता संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे विदर्भातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसाठी सानुग्रह अनुदान निधी वाटप कार्यक्रमाला उपस्थित राहतील. संत गाडगेबाबा विद्यापीठ येथे दुपारी 3.30 वाजता बहुउद्देशीय सभागृह व क्रीडा संकुल भूमिपूजन कार्यक्रमाला उपस्थित राहतील. त्यानंतर दुपारी 4.10 वाजता अमरावती विमानतळावरून मुंबईकडे प्रयाण करतील.

00000

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा

अमरावती, दि. 15 (जिमाका) : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवार, दि. 16 एप्रिल रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौऱ्यानुसार, सकाळी 10.40 वाजता अमरावती विमानतळाचे आणि प्रवासी विमानसेवेचे लोकार्पण, तसेच एअर इंडिया उड्डाण प्रशिक्षण संस्थेच्या विमान उड्डाणाचे प्रात्यक्षिक कार्यक्रमाला उपस्थित राहतील. त्यानंतर दुपारी 12.15 वाजता विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.

00000

केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार मंत्री मुरलीधर मोहोळ यांचा दौरा

अमरावती, दि. 15 (जिमाका) : केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार मंत्री मुरलीधर मोहोळ बुधवार, दि. 16 एप्रिल रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.  सकाळी 10.45 वाजता मुंबई येथून अमरावती विमानतळावर आगमन. सकाळी 11 ते 12 वाजेपर्यंत प्रवासी विमानसेवेचा शुभारंभ कार्यक्रमाला उपस्थित राहतील. त्यानंतर दुपारी 12.15 वाजता विमानाने मुंबईकडे प्रयाण.

0000

केंद्रीय विमान वाहतूक मंत्री किंजरापू राम मोहन नायडू यांचा दौरा

अमरावती, दि. 15 (जिमाका) : केंद्रीय विमान वाहतूक मंत्री किंजारापू राम मोहन नायडू बुधवार, दि. 16 एप्रिल रोजी अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

दौऱ्यानुसार, सकाळी 9.30 वाजता दिल्ली येथून अमरावती विमानतळावर आगमन होईल. सकाळी 10 ते 11.30 वाजेपर्यंत अलायंस एअरच्या प्रवासी विमानसेवेचा शुभारंभ कार्यक्रमाला उपस्थित राहतील. त्यानंतर दुपारी 11. 45 वाजता विमानाने शमशाबादकडे प्रयाण करतील.

00000

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अमरावती दौरा

अमरावती, दि. 15 (जिमाका) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवार, दि. 16 एप्रिल रोजी अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.  सकाळी 10.20 वाजता मुंबईहून अमरावती विमानतळ येथे आगमन. सकाळी 10.30 वाजता अमरावती विमानतळाचे आणि प्रवासी विमानसेवेचे लोकार्पण तसेच एअर इंडिया एफटीओ डेमो फ्लाईटचे उड्डाण प्रात्यक्षिक कार्यक्रमाला उपस्थिती. त्यानंतर दुपारी 1.15 वाजता श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे विदर्भातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान निधी वाटपाचा शुभारंभ करतील. दुपारी 2.20 वाजता आमदार राजेश वानखडे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करतील.

दुपारी 2.45 वाजता संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ परिसरातील बहुउद्देशीय सभागृह व आंतरगृह क्रीडा इमारतीचे भूमिपूजन करतील. दुपारी 3.20 वाजता मौजा बडनेरा, कोंडेश्वर येथे अमरावती ग्रामीण पोलीस दलाच्या प्रशासकीय इमारती, निवासस्थान इमारती, वाहने तसेच शहर पोलीस दलाच्या वातानुकूलित वाहतूक कक्ष, महिला विसावा कक्ष व वाहनांचे लोकार्पण करतील.  दुपारी 4.15 वाजता विमानाने मुंबईकडे प्रयाण.

000000


No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 21.06.2025

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा: 'एक पृथ्वी, एक...