शहरात प्रतिबंधात्मक आदेश लागू
अमरावती, दि. 14 (जिमाका) : शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी अमरावती शहर पोलीस आयुक्त यांनी महाराष्ट्र पोलिस कायद्याचे कलम 37 (1) व (3) नुसार प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.
प्रतिबंधात्मक आदेश पोलिस आयुक्तालयाच्या परिक्षेत्रात लागू करण्यात आला आहे. सदर आदेश दि. 16 ते दि. 30 जुलै 2025च्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहणार आहेत. या आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्तीविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, असे पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी कळविले आहे.
000000
आणीबाणीतील कारावास भोगलेल्यांच्या
ह्यात जोडीदारांनी अर्ज करण्याचे आवाहन
अमरावती, दि. 14 (जिमाका) : आणीबाणीच्या काळात कारावास भोगलेली व्यक्ती दि. 2 जानेवारी 2018 पुर्वी ह्यात नसल्यास त्याच्या पश्चात ह्यात जोडीदार पती, पत्नी केवळ अशा व्यक्तींनी मानधन मिळविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आणीबाणीच्या काळात कारावास भोगलेली व्यक्ती दि. 2 जानेवारी 2018 पुर्वी ह्यात नसल्यास त्याच्या पश्चात ह्यात जोडीदार पती, पत्नी केवळ अशा व्यक्तीच अर्ज सादर करू शकतील. दोघेही ह्यात नसल्यास त्यांचे कायदेशीर वारसदार सदर योजनेंतर्गत मानधन किंवा थकबाकी मिळण्यासाठी अर्ज करू शकणार नाहीत. अर्जदारांनी अर्जामधील क्र. 12 मध्ये नमूद केल्याप्रमाणे मीसा, डीआयआर आणीबाणीखाली राजनैतिक अथवा सामाजिक कारणासाठी अटक झालेल्या आणीबाणी धारकाबाबतचे संबंधित पोलिस आयुक्त आणि जिल्हा पोलिस अधिक्षक, कारागृह अधिक्षक यांचे प्रमाणपत्र अर्जासोबत सादर करावेत. अर्ज दाखल करण्याचा अंतिम मुदत दि. 25 सप्टेंबर 2025 आहे. यानंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत, याची आणीबाणीच्या काळात कारावास भोगलेली व्यक्ती दि. 2 जानेवारी 2018 पुर्वी ह्यात नसल्यास त्याच्या पश्चात ह्यात जोडीदार पती, पत्नी अशा अर्जदारांनी नोंद घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांनी केले आहे.
0000
जिल्हाधिकारी कार्यालयातील निर्लेखित वस्तूंचा लिलाव
अमरावती, दि. 14 (जिमाका) : जिल्हाधिकारी कार्यालयातील निर्लेखित करण्यात आलेले फर्निचर, लाकडी लोखंडी खुर्चींचा लिलाव करण्यात येणार आहे. यासाठी इच्छुकांनी दि. 18 जुलै पर्यंत निविदा सादर करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील जुन्या निर्लेखित शासकीय कालबाह्य झालेल्या विविध प्रकारच्या 237 खुर्च्या जाहिर लिलावाद्वारे विक्री करण्यात येणार आहे. सदर साहित्य आहे त्या स्थितीमध्ये विक्री करण्यात येणार आहे. याबाबतची सविस्तर माहिती जिल्हा प्रशासनाच्या amravati.nic.in संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
दरपत्रक सादर करण्याचा कालवधी पासून पर्यंत दि. 9 जुलै 2025 सकाळी 10 वाजेपासून ते दि. 17 जुलै 2025 दुपारी 5 वाजेपर्यंत आहे. यासाठी सपंर्क अधिकारी अधिक्षक जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती संपर्क क्रमांक 0721-2662493 आहे. दरपत्रक उघडण्याचा दि. 18 जुलै 2025 सकाळी 11 वाजता राहील. दरपत्रक अधिक्षक यांचे कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती येथे उघडण्यात येईल. साहित्य खरेदी करू इच्छिणाऱ्यांनी साहित्य पाहून निविदेत सहभागी व्हावे, असे आवाहन अतिरिक्त जिल्हाधिकारी गोविंदा दाणेज यांनी केले आहे.
000000
No comments:
Post a Comment