सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई तीन दिवसांच्या अमरावती दौऱ्यावर
अमरावती, दि. 23 (जिमाका) : सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई हे गुरूवार, दि. 24 जुलैपासून तीन दिवस अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात दारापूर, दर्यापूर आणि अमरावती येथील विविध कार्यक्रमाला न्या. गवई उपस्थित राहतील.
उद्या गुरुवार, दि. 24 जुलै दुपारी 3. 45 वाजता बेलोरा विमानतळ, अमरावती येथे आगमन होईल.
शुक्रवार, दि. 25 जुलै रोजी सकाळी 10.45 वाजता दारापूर येथील विविध कार्यक्रमाला उपस्थित राहतील. त्यानंतर दुपारी 3 वाजल्यापासून दर्यापूर येथील विविध कार्यक्रमास उपस्थित राहतील. त्यानंतर सायंकाळी 5.30 वाजता दर्यापूर येथील नवीन न्यायालय इमारतीच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहतील.
शनिवार, दि. 26 जुलै रोजी सकाळी 10.35 वाजता सिपना कॉलेज ऑफ इंजीनियरिंग येथे अमरावती जिल्हा व सत्र न्यायालय येथील ई -लायब्ररीचे उद्घाटन कार्यक्रमास उपस्थित राहून सोयीनुसार बेलोरा विमानतळावरून श्रीनगरकडे प्रयाण करतील.
00000
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील
यांचा अमरावती दौरा
अमरावती, दि. 23 (जिमाका) : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्ये मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांचा शुक्रवार, दि. 25 जुलै रोजीचा अमरावती दौरा पुढीलप्रमाणे:
शुक्रवार, दि. 25 जुलै रोजी सकाळी 10 वाजता शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था, अमरावती येथील परीक्षा भवन व प्रशासकीय इमारत, उपहारगृह, विद्यार्थ्यांचे सामान्य कक्ष उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, पीडीएससी कॅम्पस, मोर्शी रोड, येथे श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती येथे आयोजित अखिल महाराष्ट्र फेडरेशन ऑफ प्रिन्सिपल्स असोसिएशन ऑफ नॉन गव्हर्नमेंट कॉलेजेसच्या 40 व्या वार्षिक राज्यस्तरीय अधिवेशनास उपस्थिती. दुपारी 2 वाजता आप्पाजी महाराज वारकरी ज्ञानपीठ, बहिरमकुऱ्हा, चांदूरबाजार येथे आगमन व राखीव. सायंकाळी 4 वाजता बहिरमकुऱ्हा येथून वाहनाने समृध्दी महामार्गाने नागपूरकडे प्रयाण.
00000
जिल्हाधिकारी कार्यालयात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना अभिवादन
अमरावती, दि. 23 (जिमाका) : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आज अधीक्षक निलेश खटके यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
अधिकारी - कर्मचारी यावेळी उपस्थित होते. उपस्थितांनीही लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून अभिवादन केले.
00000
रोहयोच्या विहिरींची कामे वेगाने पूर्ण करण्याचे आवाहन
अमरावती, दि. 23 (जिमाका) : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) तिवसा तालुक्यात सुरू असलेल्या विहिरींच्या कामांना गती देण्यासाठी पंचायत समितीने महत्त्वपूर्ण आवाहन केले आहे. तालुक्यात एकूण ५८४ विहिरींची कामे अपूर्ण अवस्थेत असल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर हे आवाहन करण्यात आले आहे.
महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंर्तगत वैयक्तिक सिंचन विहीर ही वैयक्तिक लाभाची योजना आहे. यात विहीरी खोदुन व बांधुन पूर्ण करणे ही वैयक्तिक लाभार्थ्यांची जबाबदारी आहे. विहीरीच्या बांधकामासाठी प्राप्त होणारा कुशल, अर्धकुशल निधी हा विहिरीचे भौतिकदृष्ट्या काम पुर्ण झाल्यावरच तांत्रिक अधिकाऱ्यामार्फत मोजमाप करुन व शासनाला मागणी सादर केल्यानुसार प्राप्त होत असतो.
मात्र कुंपन घातलेला नाही आणि बांधकाम अपूर्ण असलेल्या विहीरी शेतकरी व जनावरांसाठी धोकादायक ठरत आहे. अशा विहीरीमुळे जावरा शिवारात घडलेल्या दुर्घटनेमुळे विहिरीचे बांधकाम पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. पावसाच्या पार्श्वभूमीवर अपुर्ण विहीरीचे काम पुर्ण करणे कठीण आहे. मात्र सर्व लाभार्थी आणि शेतकऱ्यांनी शेतातील विहीरीचे काम अपूर्ण असल्यास खबरदारीने उपाय म्हणून सदर जागी तातडीने संरक्षण कुंपण लावुन घ्यावे. तसेच शक्य तितक्या लवकर बांधकाम पूर्ण करावे. याबाब पॅनल तांत्रिक अधिकारी व ग्रामरोजगार सेवक यांनी अपूर्ण विहीरींना प्रत्यक्ष भेट देवून लाभार्थ्यांना अवगत करून कोणतीही दुर्घटना घडणार नाही यांची खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पंचायत समिती तिवसा अंतर्गत मनरेगामध्ये खोदलेल्या व बांधकाम पूर्ण केलेल्या विहिरींच्या लाभापासून वंचित असलेल्या पात्र लाभार्थ्यांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विहिरींची कामे अपूर्ण असलेल्या ठिकाणी तातडीने पाहणी करून ती पूर्ण करण्याची जबाबदारी तांत्रिक अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी आणि रोजगार सेवक यांच्यावर सोपवण्यात आली आहे. अपूर्ण कामे जलद गतीने पूर्ण करण्यासाठी त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तांत्रिक अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी व ग्रामरोजगार सेवक यांनी विहिरींना प्रत्यक्ष भेट देऊन कामाची सद्यस्थिती तपासण्यास व उर्वरित कामे त्वरीत पूर्ण करावे, असे आवाहन तिवसाचे गटविकास अधिकारी यांनी केले आहे.
000000
No comments:
Post a Comment