शहरात प्रतिबंधात्मक आदेश लागू
अमरावती, दि. 30 (जिमाका) : शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी अमरावती शहर पोलीस आयुक्त यांनी महाराष्ट्र पोलिस कायद्याचे कलम 37 (1) व (3) नुसार प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.
प्रतिबंधात्मक आदेश पोलिस आयुक्तालयाच्या परिक्षेत्रात लागू करण्यात आला आहे. सदर आदेश दि. 31 जुलै ते दि. 14 ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहणार आहे. या आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्तीविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, असे पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी कळविले आहे.
000000
विद्यार्थ्यांसाठी मोफत कोचिंगसाठी सीड योजना
अमरावती, दि. 30 (जिमाका) : केंद्र शासनातर्फे डीएनटी, एनटी आणि एसएनटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या मोफत कोचिंगसाठी सीड योजना सुरु केली आहे. या योजनेत पात्र विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी मोफत कोचिंगची सुविधा मिळणार आहे.
योजनेसाठी अर्जदार हा डीएनटी, एनटी, एसएनटी प्रवर्गातील विद्यार्थी असावा. विद्यार्थी बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी असावे. राज्य किंवा केंद्र शासनाच्या कोणत्याही कोचिंग योजनेचा लाभ घेतलेला नसावा. पात्र विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्षी 1 लाख 20 हजार लाभ मिळणार आहे.
अर्ज करण्याची अंतिम मुदत 3 ऑगस्ट 2025 आहे. विद्यार्थ्यांना buddy४study.com या वेबसाईटवर नोंदणी करावी लागणार आहे. अधिक माहितीसाठी, विद्यार्थी mosje@buddy४study.com या ईमेलवर संपर्क साधू शकतात किंवा 080-47895118 या क्रमांकावर संपर्क साधावा. या योजनेचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याणचे सहायक संचालक गजेंद्र माळठाणे यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment