Wednesday, January 8, 2025

DIO NEWS AMRAVATI 8.1.2025

 





जिल्ह्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत विकेंद्रीत सौर प्रकल्पाला गती द्यावी

                         -   जिल्हाधिकारी सौरभ कटीयार

 

 

नारगावंडी सौर प्रकल्पाच्या कामाची जिल्हाधिकारी यांनी केली पाहणी

शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी जिल्ह्यात 41 सौर प्रकल्पातून होणार 184 मेगावाट ऊर्जा निर्मिती

 

अमरावती, दि.08 :  मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 योजनेत शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यात 41 उपकेंद्रासाठी 184 मेगावॅट सौरऊर्जा प्रकल्पाचे ७ ठिकाणी काम सुरू झाली आहेत.उर्वरित कामे तातडीने सुरू होणार आहे.शासनाच्या या महत्वाकांक्षी योजनेला जिल्ह्यात गती देण्यात येणार आहे.अशी माहिती जिल्हाधिकारी सौरभ कटीयार यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात (दि. 6) जिल्हाधिकारी यांच्याकडून मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद संजीता मोहपात्रा, महावितरणचे मुख्य अभियंता ज्ञानेश कुलकर्णी, अधीक्षक अभियंता दीपक देवहाते, सर्व कार्यकारी अभियंते, विभागीय महाव्यवस्थापक (महाऊर्जा) तायडे आणि सौर ऊर्जा प्रकल्प विकासक उपस्थित होते.

मुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रारंभ झालेल्या या शासनाच्या महत्वाकांक्षी प्रकल्पामुळे  कृषी पंपांना दिवसा, अखंडीत व शाश्वत वीजपुरवठा शक्य होणार आहे. जिल्ह्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेसाठी 840 एकर शासकीय जमीनीचे अधीग्रहन करण्यात आले आहे. या जमीनिवर 44 ठिकाणी 41 उपकेंद्रासाठी विकेंद्रीत सौर प्रकल्प उभारून या प्रकल्पातून 184 मेगावॅट वीज निर्मिती करण्यात येणार आहे. तथापि या योजनेच्या अंमलबजावणी दरम्यान येणाऱ्या अडचणी तत्काळा सोडविण्यासंदर्भात जिल्हयातील सर्व तहसिलदार यांना सुचित करून मदत करण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी अवगत केले.

 

नारगावंडी (धामणगाव रेल्वे) येथे सुरू असलेल्या सौर प्रकल्पाच्या कामाची

जिल्हाधिकारी यांच्याकडून पाहणी

 

 

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत धामणगाव तालुक्यातील नारगावंडी येथे प्रगतीपथावर असलेल्या सौर प्रकल्पाच्या कामाची जिल्हाधिकारी सौरभ कटीयार यांनी आज (दिनांक 8 जाने.) प्रत्यक्ष पाहणी केली आणि मार्च 2025 पर्यंत प्रकल्पाचे काम पूर्ण करून प्रकल्प कार्यान्वित करण्याबाबत प्रकल्प विकासकांना आदेश दिलेत.

 

यावेळी चांदुर रेल्वेचे महसुल उपविभागीय अधिकारी तेजश्री कोरे, धामणगाव (रेल्वे), तहसीलदार अभय घोरपडे महावितरण चे अधिक्षक अभियंता दिपक देवहाते, कार्यकारी अभियंता अनिरूध्द आलेगावकर,तसेच सर्व विकासक हजर होते.

 

00000

 

विशेष घटकांच्या व्यक्तींसाठी  संवेदनशील आणि सहकार्यांची भूमिका ठेवावी

- जिल्हाधिकारी सौरभ कटियार

 

एचआयव्ही नियंत्रण समितीची सभा

 

अमरावती , दि . 8 (जिमाका) : समाजातील विशेष घटकांच्या व्यक्तींसाठी सर्व विभागांनी संवेदनशील आणि सहकार्यांची भूमिका ठेवावी. तसेच या विशेष घटकापर्यंत सर्व सामाजिक सुरक्षा तसेच लाभ यांची यशोचित माहिती  पोहचविण्याच्या दृष्टीने विविध कार्यक्रम तसेच माध्यमांचा प्रभावी वापर करावा , अशा सूचना  जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी दिल्या.

 

जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष, जिल्हा सामान्य रुग्णालय अंतर्गत चालविल्या जाणाऱ्या कार्यक्रमांचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालय येथील महसूल भवन येथे   श्री. कटियार यांनी घेतला, त्यावेळी ते बोलत होते. सभेच्या सुरवातीला 'आर्थिक वर्ष 2023-24   एचआयव्ही कार्यक्रमांचा आढावा ' पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ . दिलीप सौंदळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सुरेश आसोले, जिल्हा कार्यक्रम अधिकारी अजय साखरे आदी मान्यवर  यावेळी उपस्थित होते.

 

राष्ट्रीय स्तरावर झालेल्या जिल्हा एड्स पंधरवड्यानिमित्त आयोजित मोहिमेचा आढावा यावेळी घेण्यात आला. जागतिक एड्स दिनानिमित्त आयोजित केल्या जाण्याऱ्या विविध स्पर्धांचे पुरस्कार वाटप, जिल्ह्यात कार्यरत एकात्मिक समुपदेशन व तपासणी केंद्र यांच्या कामाचाही आढावा घेण्यात आला. यात प्रथम क्रमांक 'एकात्मिक समुपदेशन व तपासणी केंद्र ग्रामीण रुग्णालय ,तिवसा ' तर व्दितीय क्रमांक 'जिल्हा स्त्री रुग्णालय अमरावती 'यांना देण्यात आला .  

जिल्हात कार्यरत सामाजिक संस्थांच्या कामांचा आढावा घेऊन त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शिक्षण व आरोग्य प्रसारक मंडळ (देह विक्री करणाऱ्या स्त्रियांसाठी कार्यरत कार्यक्रम ) याने पुरस्कृत करण्यात आले. या सोबतच जिल्हास्तरीय सोशल मीडिया पोस्टर स्पर्ध्येमध्ये प्रथम क्रमांक आदित्य अरुण अकमार (शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय) , व्दितीय क्रमांक चक्रधर भागवत पंजारकर (शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय ), तृतीय क्रमांक जान्हवी प्रेमानंद पवार आणि उत्तेजनार्थ मोहमद शेख मोहमद अयाज यांना सन्मानित करण्यात आले.  जिल्ह्याचा कामगिरीबाबत  जिल्हाधिकारी यांनी समाधान व्यक्त केले तसेच पुढील आवश्यक कार्यवाही करण्याबाबत  संबंधितांना सूचना दिल्या.

 

 रक्तदान तसेच एचआयव्ही संबंधित इतर बाबी , क्षय रोग नियंत्रण कार्यक्रम,  मुख रोग नियंत्रण कार्यक्रम, तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, 108 रुग्णावाहिका इत्यादींचा आढावा यावेळी घेण्यात आला.

 

  वैद्यकीय अधीक्षक डॉ . विनोद पवार ,  डॉ प्रमोद पोतदार ,  इंडियन मेडिकल असोसिएशन अध्यक्ष डॉ अनुपमा देशमुख यासह तसेच सामाजिक संस्थानांचे प्रतिनिधी  हजर होते.

 

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...