Thursday, January 16, 2025

DIO NEWS AMRAVATI 15.1.2025

 


इंदिराबाई मेघे महाविद्यालयात नव्या शैक्षणिक धोरणावर कार्यशाळा

अमरावती, दि. 15 : विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीच्या इंदिराबाई मेघे महिला महाविद्यालयात स्कूल कनेक्ट कार्यक्रम पार पडला. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020ची यशस्वी अंमलबजावणी होण्यासाठी शाळा, तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनींमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी ही कार्यशाळा घेण्यात आली.

प्राचार्य डॉ. सीमा अढाऊ अध्यक्षस्थानी होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. पूनमताई चौधरी, प्रमुख मार्गदर्शक प्रा. डॉ. गजानन रत्नपारखी, प्रा. डॉ. वंदना भोयर उपस्थित होत्या.

महाविद्यालयीन, तसेच उच्च शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्यापूर्वी घ्यावयाची माहिती, करिअर संदर्भातील विषयांची निवड, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि त्यामध्ये विद्यार्थ्यांना संपादन करावयाचे कौशल्य, करिअरच्या दृष्टिकोनातून कौशल्याचे महत्त्व आदी संदर्भात माहिती, तसेच विविध शिष्यवृत्तीच्या अंमलबजावणीची माहिती कार्यशाळेत देण्यात आली.

यावेळी मार्गदर्शक प्रा. रत्नपारखी यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. प्रा. अरुणा तसरे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. अनुप आत्राम यांनी आभार मानले.

00000



उपसंचालक अनिल आलुरकर यांना मातृशोक

अमरावती, दि. 15 : अमरावती विभागाचे उपसंचालक (माहिती) अनिल आलुरकर यांच्या मातोश्री वनमाला लालोजिराव आलुरकर, वय 80 वर्षे यांचे आज, दि. 15 जानेवारी रोजी सकाळी अमरावती येथे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गोवर्धनघाट, नांदेड येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात मुलगा पवनकुमार, अनिलकुमार, प्रसाद आणि मुलगी अलका चुकेवाड असा आप्तपरिवार आहे.

00000


शहरात  कलम 37 (1)   (3) लागू

अमरावती, दि. 15 (जिमाका):  शहरात शांतता  सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलीस आयुक्त (अमरावती शहर) यांनी महाराष्ट्र पोलिस कायद्याचे कलम 37 (1)  (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.

सदर प्रतिबंधात्मक आदेश शहरातील कायदा  सुव्यवस्था अबाधित राहावा, याकरिता अमरावती पोलिस आयुक्तालयाच्या परिसरात शुक्रवार, दि. 17 जानेवारीपासून लागू करण्यात येणार असून शुक्रवार, दि. 31 जानेवारी 2025 च्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहील. या कलमाचा भंग करणाऱ्या व्यक्तीविरूध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पोलीस आयुक्त (अमरावती शहर) नविनचंद्र रेड्डी यांनी कळविले आहे.

*****

 

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 23.06.2025

                                                                        शाळेच्या पहिल्या दिवशी जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वागत *जिल्हा परिषदेच्या...