जिल्हा परिषदेत प्रजासत्ताक दिन साजरा
अमरावती,
दि. 29 (जिमाका): प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी
संजिता महापात्र यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
ध्वजारोहणानंतर संविधान शपथ व तंबाखूमुक्त शपथ घेण्यात
आली. श्रीमती महापात्र यांनी अधिकारी व कर्मचारी यांना तंबाखूमुक्त भारतचे महत्त्व
विषद केले. तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनामुळे उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग, मुखाचा
कर्करोग यासारखे अनेक दुर्धर आजार होत असल्याचे सांगितले. प्रदूषणाविषयी प्रत्येक व्यक्तीने
स्वत:पासून बदल घडवून आसपासच्या परिसरामध्ये, समाजातील लोकांमध्ये बदल घडवावा. त्यासाठी
प्लास्टिकच्या पिशव्या वापरू नये, असा संदेश दिला. प्लास्टिक बॅगमुळे शेतपिकांवर परिणाम
होत असल्याचे स्पष्ट केले. यावेळी वृक्षारोपण करण्यात आले.
00000
रोजगार मेळाव्यात 156 उमेदवारांची प्राथमिक निवड
अमरावती, दि. 29 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता
मार्गदर्शन केंद्र व मॉडेल करिअर सेंटर, तसेच स्वराज्य सुशिक्षित बेरोजगार अभियंता
संस्थेतर्फे मंगळवार, दि. 28 जानेवारी रोजी आयोजित पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात
156 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली आहे.
कौशल्य विकासचे उपायुक्त दत्तात्रय ठाकरे अध्यक्षस्थानी
होते. प्राचार्य राम मेघे इंजिनिअरींग कॉलेजचे संजय देशमुख उद्घाटक म्हणून उपस्थित
होते. यावेळी अजय गोंदणे, मनपा उपायुक्त नरेंद्र वानखडे, डॉ. संदीप देवळे, कौशल्य विकासच्या
सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर आदी उपस्थित होते.
रोजगार मेळाव्यात तसेच पिपल त्रि वेन्चेरच्या वैष्णवी शर्मा,
जाधव ग्रुप ऑफ कंपनीजचे चंद्रकांत वाघमारे, रेडीयंट सुपरस्पेशालीस्ट हॉस्पीटलचे श्री.
बाळापुरे, संसुर श्रुष्टीच्या जयश्री महल्ले, सत्या मायक्रो फायनान्सचे पंकज बागडे,
आसपा ग्लोबलच्या दिव्या राऊत, एलआयसीच्या महिमा दुबे, धूत ट्रान्समिशनचे विजय तांदळे,
युनिव्हर्सलचे सुहास पाली, तिवारी रिअलिटीचे एजाज अहमद, प्रथमेश एज्युकेशन राळेगावचे
संदीप तंतरपाले, टाटा स्ट्राईव्हचे राजेश सोनेकर उपस्थित होते. या मेळाव्यात उमेदवारांच्या
मुलाखती घेण्यात आल्या.
बेनोडा भिमटेकडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहातील
मेळाव्याला 402 उमेदवारांनी नोंदणी केली. यापैकी 380 उमेदवारांनी सहभागी होऊन मुलाखती
दिल्या. प्रांजली वारस्कर यांनी प्रास्ताविक केले. दिक्षा शेंडे यांनी सूत्रसंचालन
केले. वैशाली पवार यांनी आभार मानले.
00000
राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांचा
शनिवारी दौरा
अमरावती, दि. 29 (जिमाका) : गृह (ग्रामीण), गृहनिर्माण,
शालेय शिक्षण, सहकार व खनिकर्म राज्यमंत्री पंकज भोयर शनिवार, दि. 1 फेब्रुवारी रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर
येत आहेत.
दौऱ्यानुसार, श्री. भोयर यांचे शनिवारी दुपारी 12 वाजता
अमरावती येथे आगमन होईल. त्यानंतर डॉ. पंजाबराव देशमुख विज्ञाननगरी, श्री शिवाजी विज्ञान
महाविद्यालय येथील 52वी राज्यस्तरीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनी कार्यक्रमास उपस्थित राहतील.
दुपारी 1 वाजता जोग स्टेडीयमजवळ वसंत हॉल येथे पोलीस परिवारासोबत संवाद साधतील. दुपारी
3 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे म्हाडाच्या प्रादेशिक विभाग बैठकीस
उपस्थित राहून सोयीने नागपूरकडे प्रयाण करतील.
00000
ओबीसी महामंडाळाची एक रक्कमी परतावा
योजना
अमरावती,
दि. 29 (जिमाका): ओबीसी महामंडाळाच्या थकीत कर्जप्रकरणी संपूर्ण थकीत कर्ज रक्कमेचा
एक रक्कमी भरणा करणाऱ्या लाभार्थ्यांना थकीत व्याज रक्कमेत 50 टक्के सवलत देण्यासाठी
एक रक्कमी परतावा योजना दि. 31 मार्च 2025 पर्यंत राबविण्यात येत आहे. महामंडाळाच्या
थकबाकीदार लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक
व्ही. एस. खोडे यांनी केले आहे.
00000
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
No comments:
Post a Comment