Thursday, January 30, 2025

DIO NEWS AMRAVATI 30.01.2025

 

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा आज दौरा

अमरावती, दि. 30 (जिमाका) : महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे शुक्रवार, दि. 31 जानेवारी रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

दौऱ्यानुसार, श्री. बावनकुळे शुक्रवारी सकाळी 9.30 वाजता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीस्थळी भेट देतील. सकाळी 10.30 वाजता इर्विन चौकातील स्वागतास उपस्थित राहतील. सकाळी 10.30 वाजता श्री अंबादेवी मंदिर येथे दर्शन घेतील. त्यानंतर सकाळी 11.00 वाजता हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे अध्यक्ष पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांच्या निवासस्थानी भेट देतील. त्यानंतर सकाळी 11.30 वाजता आमदार रवी राणा यांच्या निवासस्थानी भेट देतील. सकाळी 12.00 वाजता शंकरनगर येथे स्वातंत्र्यसैनिक स्व. एकनाथ हिरूळकर यांच्या निवासस्थानी भेट देतील. दुपारी 12.30 वाजता कंवरनगरातील महानुभाव आश्रमाला भेट देतील. दुपारी 1 वाजता शासकीय विश्रामगृह येथे मिट द प्रेस होणार आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी 1.30 वाजता जिल्हा विकास आराखड्याबाबत आढावा बैठक घेतील. दुपारी 3 वाजता विभागीय आयुक्त यांचे सादरीकरण आणि आढावा, दुपारी 4.30 वाजता नोंदणी उपमहानिरीक्षक यांचे सादरीकरण व आढावा, सायंकाळी 5 वाजता भूमी अभिलेख उपसंचालक यांचे सादरीकरण व आढावा घेतील. सायंकाळी 6 वाजता विश्रामगृह येथे राखीव राहिल. रात्री 8.30 वाजता गृहभेटी आणि त्यानंतर रात्री 10 वाजता अमरावती येथून नागपूरकडे प्रस्थान करतील.

00000

आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांचा दौरा

अमरावती, दि. 30 (जिमाका) : आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके सोमवार, दि. 3 फेब्रुवारी रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

दौऱ्यानुसार, श्री. उईके यांचे सोमवार, दि. 3 फेब्रुवारी रोजी सकाळी 10.30 वाजता शासकीय विश्रामगृह अमरावती येथे आगमन होईल. त्यानंतर सकाळी 11 वाजता मातोश्री विमलाबाई देशमुख सभागृह येथे शिवाजी शिक्षण संस्थेतर्फे आयोजित सत्कार समारंभास उपस्थित राहतील. दुपारी 12 वाजता सामाजिक न्याय भवनात जिल्ह्यातील मंत्री, राज्यमंत्री, खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी यांच्यासमवेत आदिवासी विकास विभाग, आदिवासी विकास महामंडळ, शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाची आढावा बैठक घेतील. दुपारी 1.30 वाजता पत्रकार परिषद होणार होणार आहे. दुपारी 2.30 वाजता नागपूरकडे प्रयाण करतील.

00000

कुंभमेळ्याला जाणाऱ्या भाविकांसाठी संपर्क क्रमांक जाहिर

अमरावती, दि. 30 : कुंभमेळ्यासाठी प्रयागराज येथे जाणाऱ्या नागरीकांनी दक्षता घ्यावी. तसेच आवश्यक भासल्यास नियंत्रण कक्षाच्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

उत्तरप्रदेशातील प्रयागराज येथे कुंभमेळा 2025चे आयोजन करण्यात आले आहे. सदर ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक भक्त दर्शनासाठी जात आहेत. आपात्कालीन स्थितीत प्रयागराज येथील कंट्रोल रुम दुरध्वनी क्रमांक 0522-2237515 आहे. तसेच मंत्रालय नियंत्रण कक्ष, मुंबई क्रमांक 022-22027990 तसेच जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती दुरध्वनी क्रमांक 0721-2662025 आहे. प्रयागराज येथे दर्शनासाठी गेलेल्या नागरीकांनी आवश्यकता भासल्यास सदर क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

00000

माजी सैनिकांसाठी नोंदणीची अंतिम मुदत 1 मार्च पर्यंत

अमरावती, दि. 30 (जिमाका)  : सर्व माजी सैनिक, विधवा आणि त्यांच्या अवलंबितांना महासैनिक पोर्टलवर नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे.  नोंदणीची अंतिम तारीख 1 मार्च 2025 असून, शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी नोंदणी आवश्यक आहे. महासैनिक पोर्टल (mahasainik.maharashtra.gov.in)  ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे.  या पोर्टलच्या माध्यमातून सैनिक कल्याण विभाग आणि केंद्रीय सैनिक बोर्डाच्या योजनांचा लाभ घेणे सोपे होणार आहे. तसेच, स्पर्श प्रणालीमधील निवृत्ती वेतनविषयक माहिती तत्परतेने सोडवण्यासाठी मदत होणार आहे , असे अमरावती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सेना मेडल (निवृत्त) मेजर आनंद पाथरकर  यांनी सांगितले.

नोंदणीसाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, डिस्चार्ज बुक, पी.पी.ओ., पेन्शन पासबुक, ई.सी.एच.एस. कार्ड, पासपोर्ट साईज फोटो, मोबाईल क्रमांक, शैक्षणिक कागदपत्रे आवश्यक आहेत. नोंदणी शुल्क 100 रुपये असून ते ऑनलाईन पद्धतीने भरावे. अर्ज भरताना सर्व माहिती अचूक आणि स्पष्ट असणे आवश्यक आहे. कागदपत्रे पीडीएफ स्वरूपात अपलोड करावी लागतील.  नोंदणीनंतर अर्जाची प्रिंट काढून, मूळ कागदपत्रांसह पडताळणीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, अमरावती येथे  भेट देणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, अमरावती येथे संपर्क साधावा.

00000



स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान, कुष्ठरुग्ण शोध मोहिमेचे उद्घाटन

अमरावती, दि. 30 राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त गुरूवार, दि. 30 जानेवारी विदर्भ आयुर्वेद महाविद्यालयात कुष्ठरोग निवारण दिन साजरा करण्यात आला. यात स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान आणि कुष्ठरोग रुग्ण शोध मोहीमेला सुरवात करण्यात आली.

जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. रमेश बनसोड यांनी क्षयरोगाविषयी माहिती दिली. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले यांनी विद्यार्थ्यांनी रुग्ण तपासणीमध्ये प्रत्यक्ष सहभागी व्हावे, असे आवाहन करून अभियान आणि मोहिमेचे उद्घाटन केले. प्राचार्या प्रीती पवार यांनी पपेट शोतून कुष्ठरोगाविषयी जनजागृती केली. प्राचार्य डॉ. संजय चोपकर यांनी विद्यार्थी अभियानात सक्रिय सहभाग घेतील, असे सांगितले. संचालक डॉ. रवींद्र वाघमारे यांनी कुष्ठरोगाविषयी जनजागृती करण्याचे आवाहन केले.

सुरवातीला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला हार अर्पण करण्यात आले. कुष्ठरोग आरोग्य सेवा सहाय्यक संचालक डॉ. पूनम मोहोकार यांनी प्रास्ताविक केले. अवैद्यकीय पर्यवेक्षक गजानन पन्हाळे व डॉ. श्रद्धा यादगिरे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमासाठी अवैद्यकीय पर्यवेक्षक दीपक गडलिंग, कुष्ठरोग तंत्रज्ञ रितेश ठाकरे, श्री. कदम, पर्यवेक्षकीय नागरी कुष्ठरोग पथकाचे डॉ. विनंती नवरे, अवैद्यकीय सहाय्यक रमेश सोनार, जोसेफ पीटर, अविनाश इंगळे, अतुल धुळे, सीमा केने, मंजुषा गावंडे, कविता दहिवले, शहरी आरोग्य केंद्र येथील डॉ. कृष्णकांत पाथरे यांनी पुढाकार घेतला.

00000

सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही  दिन

         अमरावती, दि. 30 (जिमाका) : जिल्हास्तरीय लोकशाही दिन दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येतो. त्यानुसार फेब्रुवारी महिन्याचा लोकशाही दिन, सोमवार, दि. 3 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिक्षक निलेश खटके यांनी केले आहे.

00000





जिल्हाधिकारी कार्यालयात हुतात्म्यांना आदरांजली

        अमरावती, दि. 30 (जिमाका) : देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ दोन मिनिटे मौन पाळून आज जिल्हाधिकारी कार्यालयात हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली.

      नायब तहसिलदार प्रवीण ढोले यांच्या उपस्थितीत आदरांजली वाहण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनी दोन मिनीटे मौन पाळून आदरांजली वाहिली.

00000

           

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...