Thursday, January 2, 2025

DIO NEWS AMRAVATI 2.1.2025

 




15 जानेवारीपर्यंत ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’कार्यक्रम

अमरावती, दि. 2 (जिमाका) : उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, शासकीय विभागीय ग्रंथालय, सहायक ग्रंथालय संचालक कार्यालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयातर्फे ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रम शासकीय विभागीय ग्रंथालयात दि. 1 जानेवारीपासून सुरू झाला असून दि. 15 जानेवारीपर्यंत चालणार आहे.

या उपक्रमांतर्गत सामूहिक वाचन, वाचन कौशल्य कार्यशाळा, वाचन संवाद, पुस्तक परीक्षण, कथन स्पर्धा आणि ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने संदर्भ ग्रंथाचे प्रदर्शन मंगळवार, दि. 31 डिसेंबर रोजी करण्यात आले. श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा. डॉ. महेंद्र मेटे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. सहाय्यक ग्रंथालय संचालक राजेश पाटील यांनी प्रास्ताविक केले.

गजानन कुरवाडे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. सुरज मडावी यांनी आभार मानले. सदर उपक्रम दि. 15 जानेवारीपर्यंत शासकीय सुटी वगळून चालणार आहे, या कार्यक्रमाचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी डॉ. सुरज मडावी यांनी केले.

00000

निराधार, श्रावणबाळ लाभार्थ्यांनी

कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन

अमरावती, दि. 2 (जिमाका) : संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ अनुदान योजनेंतर्गत लाभार्थ्यांचे अनुदान डीबीटी प्रणालीमार्फत आता थेट बॅक खात्यात जमा होणार आहे. यासाठी लाभार्थ्यांनी कागत्रपत्रे सादर करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

याबाबत तहसिलदार (संगायो) कार्यालयातर्फे कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन करण्यात आले. मात्र अनेक लाभार्थ्यांनी कागदपत्रे जमा केली नाहीत. लाभार्थ्यांनी डीबीटी प्रणालीकरिता आवश्यक कागदपत्रे सादर केली नसल्यास त्यांनी हयात प्रमाणपत्र, आधार क्रमांक, आधार क्रमांक लिंक असलेल्या बँक खात्याच्या पुस्तकाची छायांकित प्रत, दिव्यांग प्रमाणपत्र, विधवा असल्यास पतीचे मृत्यू प्रमाणपत्र व मोबाईल क्रमांक   आदी तपशील तहसिलदार (संगायो) अमरावती शहर यांचे कार्यालयात जमा करावेत. सदर कागदपत्रे जमा केली नसल्यास, लाभार्थ्यांना अनुदानापासून वंचित रहावे लागेल, असे तहसिलदार, अमरावती यांनी कळविले आहे.

00000

 सोमवारी जिल्हा लोकशाही दिन

            अमरावती, दि. 2 (जिमाका) : जिल्हा लोकशाही दिन सोमवार, दि. 6 जानेवारी 2025 रोजी दुपारी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात येणार आहे.यावेळी संबंधितांनी अहवालासह व्यक्तिश: उपस्थित राहावे, असे आवाहन अधिक्षक निलेश खटके यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 23.06.2025

                                                                        शाळेच्या पहिल्या दिवशी जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वागत *जिल्हा परिषदेच्या...