Monday, January 6, 2025

DIO NEWS AMRAVATI 06.01.2025 - 1

 जिल्हा युवा पुरस्कारासाठी 15 जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

अमरावती, दि. 6 (जिमाका) : राज्याच्या युवा धोरणानुसार राज्य आणि जिल्हास्तरावर एक युवक, युवती आणि एक संस्थेला स्वतंत्र पुरस्कार देण्यात येते. जिल्हा युवा पुरस्कार सन 2021-22, 2022-23 आणि 2023-24 वर्षासाठी दि. 15 जानेवारीपर्यंत प्रस्ताव मागविण्यात आले आहे.

पुरस्काराचे स्वरुप हे जिल्हा युवा पुरस्कारासाठी जिल्हास्तर एक युवक, एक युवती, तसेच एका नोंदणीकृत संस्थेला देण्यात येणार आहे. पुरस्कारामध्ये गौरवपत्र, सन्मानचिन्ह, रोख 10 हजार रूपये, संस्थेसाठी गौरवपत्र, सन्मानचिन्ह, रोख 50 हजार रूपये राहणार आहे.

युवक, युवतींसाठी अर्जदार युवक, युवतींचे वय पुरस्कार वर्षातील दि. 1 एप्रिल रोजी 15 वर्षे पूर्ण व दि. 31 मार्च रोजी 29 वर्षापर्यंत असावे. जिल्हास्तर पुरस्कारासाठी जिल्ह्यात सलग पाच वर्षे वास्तव्य असावे. पुरस्कार व्यक्ती किंवा संस्थेस विभागून दिला जाणार नाही. पुरस्कार मरणोत्तर जाहिर करण्यात येणार नाही. केलेल्या कार्याचे सबब पुरावे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. अर्जदार युवक, युवतीने पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर किमान दोन वर्षे क्रियाशील राहण्याचे हमीपत्र देणे आवश्यक आहे. अर्जदार व्यक्तीचे कार्य हे स्वयंस्फुर्तीने केलेले असावे. एका जिल्ह्यात पुरस्कार प्राप्त करणारी व्यक्ती राज्यातील अन्य जिल्ह्यात जिल्हा युवा पुरस्कारासाठी अर्ज करण्यास पात्र राहणार नाही. केंद्र व राज्य शासनाच्या शासकीय व निमशासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी पुरस्कारासाठी पात्र राहणार नाहीत.

संस्थेसाठी पुरस्कार संस्थेस विभागून दिला जाणार नाही. संस्थांनी केलेल्या कार्याचे सबब पुरावे अर्जासोबत जोडणे आवश्यक राहील. अर्जदार संस्थेने पुरस्कारप्राप्त झाल्यानंतर किमान दोन वर्षे क्रियाशील राहण्याचे हमीपत्र देणे आवश्यक आहे. अर्जदार संस्था, सार्वजनिक विश्वस्थ अधिनियम 1860  किंवा मुंबई पब्ल‍िक ट्रस्ट अॅक्ट 1950 नुसार पंजीबद्ध असावी. अर्जदार संस्था नोंदणी झाल्यानंतर किमान पाच वर्षे कार्यरत असणे आवश्यक आहे. अर्जदार संस्थेचे कार्य हे स्वयंस्फुर्तीने केलेली असावे. एका जिल्ह्यात पुरस्कारप्राप्त करणारी संस्था राज्यातील अन्य जिल्ह्यात जिल्हा युवा पुरस्कारसाठी अर्ज करण्यास पात्र राहणार नाही. अर्जदार संस्थेच्या सदस्यांचा पोलिस विभागाने प्रमाणीत केलेला चारित्र्य दाखला देणे आवश्यक आहे.

पुरस्कारासाठी मुल्यांकनात युवा व युवा विकासाचे कार्य करणाऱ्या संस्थांनी केलेले कार्य दि. 1 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीतील गत तीन वर्षाचे विचारात घेण्यात येईल. युवा अथवा नोंदणीकृत संस्थांनी ग्रामीण व शहरी भागात केलेले सामाजिक कार्य, राज्याची साधनसंपत्ती जतन व संवर्धन, तसेच राष्ट्र उभारणीच्या विकासासाठी सहायभूत ठरणारे कार्य, समाजातील दुर्बल घटक, अनुसूचित जाती, जमाती व जनजाती आदिवासी भाग आदीबाबतचे कार्य, शिक्षण, प्रौढ शिक्षण, रोजगार, आरोग्य, पर्यावरण, संस्कृती, कला, क्रीडा, मनोरंजन, विज्ञान, तंत्रज्ञान, व्यवसाय, महिला सक्षमीकरण, स्त्रीभ्रृण, व्यसनमुक्ती तसेच युवांच्या सर्वांगीण विकासाठी केलेले कार्य, राष्ट्रीय एकात्मतेस प्रोत्साहान देणारे कार्य, नागरी गलीच्छ वस्ती सुधारणा, झोपडपट्टी, आपत्ती व्यवस्थापन, तसेच स्थानिक समस्या, महिला सक्षमीकरण, साहस इत्यादी बाबतचे सर्व कार्यक्षेत्रात कार्य करणे आवश्यक आहे.

जिल्हा, पुरस्कारासाठी युवक, युवती आणि संस्थांनी करावयाचे अर्ज अर्जदारांनी दि. 15 जानेवारी 2025 पूर्वी जिल्हा क्रीड अधिकारी कार्यालय, अमरावती येथे कार्यालयीन वेळेत सादर करावे. पुरस्काराच्या अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीड अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, अमरावती-मार्डी रोड, तपोवन गेटजवळ, अमरावती येथे प्रत्यक्ष संपर्क साधावा, असे जिल्हा क्रिडा अधिकारी गणेश जाधव यांनी कळविले आहे.

00000

आस्थापनांनी मनुष्यबळाची विवरणपत्रे सादर करण्याचे आवाहन

अमरावती, दि. 6 (जिमाका) : सार्वजनिक, तसेच खासगी क्षेत्रातील सर्व आस्थापनांनी मनुष्यबळाबाबतची त्रैमासिक विवरणपत्रे ऑनलाईन सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

आस्थापनांनी विहित नमुना ईआर-1 मध्ये नियमितपणे त्रैमासिक विवरणपत्र mahaswayam.gov.in संकेतस्थळावर ऑनलाईन सादर करणे आवश्यक आहे. त्यामुळे जानेवारीअखेर संपणाऱ्या तिमाहीचे विवरणपत्र जानेवारी 2025 पूर्वी सादर करावेत. यात अडचण आल्यास कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक 0721-2566066 यावर संपर्क साधावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी केले आहे.

00000

जिल्हा क्रिडा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

अमरावती, दि. 6 (जिमाका) : राज्याच्या क्रीडा धोरणानुसार सन 2022-23 व 2023-24 यावर्षासाठी जिल्हा क्रीडा पुरस्कार देण्यात येणार आहे. यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

सदर पुरस्कार जिल्ह्यातील गुणवंत क्रीडा मार्गदर्शक व गुणवंत खेळाडूमध्ये महिला, पुरुष, दिव्यांग खेळाडूंकरीता आहे. पुरस्काराचे स्वरुप रोख 10 हजार रुपये आणि प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह आहे. क्रीडा मार्गदर्शक पुरस्कारासाठी सतत दहा वर्षे मार्गदर्शक म्हणून कार्य केलेले असावे. वयाची 30 वर्षे पूर्ण केलेली असावी. गुणांकाकरीता जिल्ह्यातील खेळाडूची कामगिरी ग्राह्य धरल्या जाईल. मागील दहा वर्षांत किमान वरिष्ठ गटातील राज्य पदक विजेते, तसेच कनिष्ठ राष्ट्रीय,  शालेय, ग्रामीण आणि महिला, खेलो इंडियामधील राष्ट्रीयस्तरापर्यंतचे पदक विजेते खेळाडू तयार केले असतील, सांघिक अथवा वैयक्तिक मान्यता क्रीडा प्रकारात नॅशनल गेम्स, वरिष्ठगट राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत प्रतिनिधीत्व केलेला खेळाडू अथवा राज्य, जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेत प्रथम तीन क्रमांकापर्यंत यश मिळविणारे किमान 3 खेळाडू घडविणारा मार्गदर्शक संघटना अथवा वैयक्तिकरित्या सादर करणे आवश्यक आहे. अर्जदाराने मार्गदर्शन केलेल्या खेळाडूचे विहीत नमुन्यातील हमीपत्र अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.

गुणवंत खेळाडूने पुरस्कार वर्षासह लगतपूर्व पाच वर्षांपैकी दोन वर्षे त्या जिल्ह्याचे मान्यताप्राप्त खेळाच्या अधिकृत स्पर्धांमध्ये प्रतिनिधीत्व केलेले असावे. खेळाडूंची मान्यताप्राप्त खेळाच्या अधिकृत राज्य, राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेमधील पुरस्कार वर्षाच्या लगतपूर्व पाच वर्षातील राज्य आणि राष्ट्रीयस्तरावरील वरीष्ठ, कनिष्ठ शालेय राष्ट्रीय, शालेय व केंद्र शासनामार्फत आयोजित क्रीडा स्पर्धांमधील राष्ट्रीयस्तरावरील कामगिरी लक्षात घेवून उत्कृष्ट ठरणाऱ्या तीन वर्षातील कामगिरीचा विचार करण्यात येईल. आशियाई गेम्स, कॉमनवेल्थ गेम्स, जागतिक चपक, क्रिडा स्पर्धा आशियाई गेम्स, राष्ट्रकुल स्पर्धा, सहभागी होणाऱ्यांना थेट पुरस्कार देण्यात येणार आहे. विहित नमुन्यातील अर्ज संघटनेमार्फत अथवा वैयक्तिकरित्या सादर करणे आवश्यक आहे. सदर अर्ज सिलबंद लिफाफ्यात सादर करून त्यावर पुरस्काराचे नाव व वर्ष, अर्जदाराचे नाव लिहिणे आवश्यक आहे.

पुरस्काराकरीता अर्ज करणाऱ्या व्यक्तींनी त्यांची कामगिरी दि. 1 जुलै ते 30 जुन याप्रमाणे गृहीत धरावी. तसेच प्रत्येकांनी अर्जासोबत राज्यात गेल्या 15 वर्षापासून सतत वास्तव असल्याचे अधिकृत प्रमाणपत्र सोबत जोडावे. एका जिल्ह्यामध्ये क्रीडा पुरस्कार प्राप्त करणारी अन्य जिल्ह्यात अर्ज करण्यास पात्र राहणार नाही. जिल्हा क्रीडा पुरस्कार दोन व्यक्तींना विभागुण दिला जाणार नाही. पुरस्कारासाठी पात्र व्यक्ती आढळुन न आल्यास पुरस्कार घोषित केला जाणार नाही. वेळापत्रकामध्ये परिस्थितीनुरूप बदल करण्याचे अधिकार राखून ठेवण्यात आले आहे. जिल्हा क्रीडा पुरस्काराचे विहित नमुन्यातील अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अमरावती येथे दि. 15 जानेवारी 2025 पर्यंत कार्यालयीन वेळेत प्राप्त करता येतील. अधिक माहितीसाठी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी केले आहे.

00000


No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 23.06.2025

                                                                        शाळेच्या पहिल्या दिवशी जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वागत *जिल्हा परिषदेच्या...