Monday, January 13, 2025

DIO NEWS AMRAVATI 13.1.2025

 

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी

26 जानेवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन

                अमरावती दि. 13 (जिमाका) : महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत राज्यातील सर्वोत्कृष्ट क्रीडापटूंना व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या व्यक्तींना क्रीडा विभागाचा प्रतिष्ठेचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. क्रीडा क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणा-या ज्येष्ठ क्रीडा महर्षींना जीवन गौरव पुरस्कार, क्रीडा मार्गदर्शकांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (साहसी उपक्रम), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) व जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार (महिला क्रीडा मार्गदर्शक ) असे पुरस्कार प्रदान करण्यात येतात.

सन 2023-24 या वर्षाच्या पुरस्कारासाठी राज्यातील क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, दिव्यांग खेळाडू व साहसी उपक्रमात सहभागी झालेले खेळाडू ,व्यक्ती यांच्यामार्फत दि. 14 ते 26 जानेवारी, 2025 या कालावधीत ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

       अर्ज सादर करणा-या इच्छुक क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, साहसी उपक्रम व दिव्यांग खेळाडू यांनी विहित मुदतीत क्रीडा विभागाच्या https://sports.maharashtra.gov.in संकेतस्थळावरील 'ताज्या बातम्या' मधील उपलब्ध करून दिलेल्या लिंकवर  दि. 26 जानेवारी, 2025 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत फक्त ऑनलाईन अर्ज सादर करण्याबाबत जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी आवाहन केले आहे.

 

000000

परिवहनेत्तर (दुचाकी) संवर्गातील नवीन वाहनांसाठी नवीन वाहन मालिका सुरू

इच्छुकांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन

अमरावती दि. १३ (जिमाका) : परिवहनेत्तर (दुचाकी) संवर्गातील नवीन वाहनांसाठी नवीन वाहन मालिका सुरू करण्यात येत आहे. इच्छुक अर्जदारांनी बुधवार ,दि. १५ जानेवारी रोजी सकाळी १० ते दुपारी २.३० वाजेपर्यंत पसंती क्रमांकाच्या विहित शुल्काच्या डिमांड ड्राफ्टसह अर्ज परिवहन कार्यालय, कॅम्प, अमरावती, खिडकी क्रमांक -२५ येथे जमा करावेत. वाहन ज्याच्या नावावर असेल त्या व्यक्तीचे नाव व पत्त्याचा पुरावा, पॅन कार्ड जोडावे. तसेच अर्जामध्ये  त्या व्यक्तीचा आधारकार्डला संलग्न असलेला भ्रमणध्वनी क्रमांक नमुद करणे आवश्यक आहे. पसंती क्रमांक डिमांड ड्राफ्ट, अमरावती ,कॅम्प बॅच ट्रेझरी बॅच कोड नं ००३८६६ साठी देय असावा.

एका पसंती क्रमांकासाठी एकच अर्ज आला असेल त्यांची व एकाच पसंती क्रमांकासाठी दोन किंवा दोनपेक्षा जास्त अर्ज आले असतील त्यांच्या पसंती क्रमांकाची यादी दि. १५ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता कार्यालयातील सूचना फलकावर प्रदर्शित करण्यात येईल. एकाच पसंती क्रमांकासाठी दोन किंवा दोनपेक्षा जास्त अर्ज आलेल्या यादीमधील पसंती क्रमांसाठी ज्यांनी अर्ज केला आहे , अशाच अर्जदारांनी दि. १६ जानेवारी रोजी दुपारी १.३० वाजेपर्यंत त्या क्रमांकासाठी पसंती क्रमांक शुल्काच्या डिमांड ड्राफ्ट व्यतिरिक्त जादा रकमेचा डिमांड ड्राफ्ट बंद लिफाफ्यात सिलबंद करून खिडकी क्रमांक - २५ वर जमा करावे. एकाच पसंतीक्रमांकासाठी दोन किंवा दोनापेक्षा जास्त अर्ज प्राप्त होऊन सिलबंद लिफाफ्यात सादर केलेल्या जादा रक्कमेचा डिमांड ड्राफ्ट धारकांनी दि. १६ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या दालनात उपस्थित रहावे. लिलावासाठी उपस्थित राहणा-या अर्जदाराने किंवा त्यांच्या प्रतिनिधीने ओळखपत्र व प्राधिकार पत्रासह हजर रहावे. कार्यालयात सादर झालेले जादा रक्कमेचे डिमांड ड्राफ्ट अर्जदारासमोर उघडण्यात येतील. ज्या अर्जदाराने जास्त रक्कमेचा ड्राफ्ट सादर केला असेल त्याला तो पसंती क्रमांक देण्यात येईल व उर्वरित कमी रकमेचा ड्राफ्ट संबंधित अर्जदारांना परत देण्यात येईल. तसेच, विहित वेळेत अनुपस्थित अर्जदारांना विचारात घेतले जाणार नाही , याची नोंद घ्यावी. पसंती क्रमांकासाठी कोणत्याही अर्जदारास दुरध्वनी, भ्रमणध्वनी अथवा एसएमएस केला जाणार नाही, याची नोंद घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे.

 

00000

 

आजपासून जिल्हास्तरीय प्राथमिक शालेय क्रीडा महोत्सव

अमरावती दि.13 (जिमाका) :  शिक्षण विभाग जिल्हा परिषद अमरावती तर्फे येथील विभागीय क्रीडा संकुलात १४ ते १६ जानेवारीपर्यंत जिल्हा स्तरीय प्राथमिक क्रीडा महोत्सवाचे आयोजन  श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे मैदानात करण्यात आले आहे.

 क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटक म्हणून राज्यसभा खासदार डॉ.अनिल बोंडे उपस्थित राहणार आहे.तर सोहळ्याचे अध्यक्ष पद अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे भुषवतील.विशेष अतिथी म्हणून वर्धेचे खासदार अमर काळे उपस्थित राहणार आहे.तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार किरण सरनाईक,आमदार धीरज लिंगाडे,आमदार रवि राणा,आमदार सुलभा खोडखे,आमदार प्रताप अडसड,आमदार केवलराम काळे,आमदार प्रवीण तायडे,आमदार राजेश वानखडे,आमदार उमेश उर्फ चंदू यावलकर,आमदार गजानन लवटे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक (भा.प्र.से) संजिता मोहपात्र,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रीती देशमुख,सहाय्यक प्रकल्प अधिकारी तुळशीराम चव्हाण,सामान्य प्रशासन व पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब बयास,महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विलास मरसळे,पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय खारकर,जिल्हा परिषदेच्या मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी अश्विनी मारणे,ग्रामीण पाणी पुरवठा योजनेचे कार्यकारी अभियंता दिनेश गायकवाड व आदी उपस्थित राहणार आहे.अशी माहिती प्राथमिक  शिक्षणाधिकारी अरविंद मोहरे,माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रिया देशमुख,माध्यमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी अनिल कोल्हे,प्राथमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी बुध्दभूषण सोनोने,माध्यमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी निखिल मानकर,क्रीडा संयोजक प्रवीण खांडेकर यांनी दिली.

 क्रीडा महोत्सवामध्ये प्राथमिक विभाग सांघिक खेळ कबड्डी,खो-खो वैयक्तिक खेळ मध्ये लंगडी,७५मी.धावणे, लांब व उंच उडी, दोरीवरील उड्या याचा समावेश असून माध्यमिक विभागात सांघिक खेळात कबड्डी,खो-खो, व्हॉलीबॉल, टेनिक्वाइड, दुहेरी, बॅडमिंटन दुहेरी, १००x४ रिले,वैयक्तिक खेळ मध्ये १००मी.धावणे, लांब व उंच उडी, कुस्ती,गोळा फेक, टेनिक्वाइड मुली यांचा समावेश आहे.

 

00000

बुधवारी निर्यात प्रचालन कार्यशाळा

अमरावती दि. १३ (जिमाका) : राज्यामध्ये निर्यात  क्षेत्रास प्रोत्साहन देण्यासाठी तसेच रोजगार निर्मितीचे लक्ष्य साध्य करण्यासाठी आणि निर्यातवाढीला प्रत्येक जिल्ह्यात उत्तरदायी बनवण्यासाठी राज्याकडून केंद्र शासनाच्या 'जिल्हा हे निर्यात केंद्र ' यास प्रोत्साहन देण्यात येत आहे. या अनुषंगाने 'एक्सपोर्ट प्रमोशन वर्कशॉप' या कार्यक्रमांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे बुधवार,दि. १५ जानेवारी रोजी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात करण्यात आले आहे. कार्यशाळा सकाळी ९.३० ते दुपारी २ वाजेपर्यंत राहणार आहे.

 या  कार्यशाळेत विविध तज्ज्ञ व्याख्यातांमार्फत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.  या कार्यशाळेत  जिल्हाधिकारी सौरभ कटियार,  उद्योग सहसंचालक,आयात -निर्यात क्षेत्रातील अनुभवी प्रवक्ते ,प्रतिनिधी यांचे मार्गदर्शन मिळणार आहे. जिल्ह‌यातील सुक्ष्म, लघु, मध्यम उपक्रम घटक निर्यातदार, निर्यातक्षम उद्योजक, नव उद्योजक, औ‌द्योगिक संस्था व संघटना, औ‌द्योगिक समूह, औ‌द्योगिक वसाहती, शेतकरी सहकारी संस्था उत्पादक, प्रक्रिया उत्पादक, केंद्र व राज्य शासनाचे तसेच संबंधित उपक्रमाचे अधिकारी, जिल्हा निर्यात प्रचालन समितीचे सदस्य, निर्यातसंबंधी कामकाज करणारे घटक, इच्छुक युवक - युवती तसेच सध्या कार्यरत एक्स्पोर्टर्स यांनी  सहभागी होवून 'एक्सपोर्ट प्रमोशन वर्कशॉप ' ला  उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा. ही कार्यशाळा ही उद्योजक व निमंत्रकांसाठी निःशुल्क आहे, असे आवाहन जिल्हा उ‌द्योग केंद्र महाव्यवस्थापक निलेश निकम यांनी केले आहे.

 

00000


राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2024 साठी

प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

 

            मुंबई, दि.13 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिताउत्कृष्ट लेखनउत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथाउत्कृष्ट छायाचित्रकारसमाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी दिनांक 1 जानेवारी2024 ते 31 डिसेंबर2024 पर्यंतच्या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या लेखन/छायाचित्रे/वृत्तकथा यांच्या प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. प्रवेशिका पाठविण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी2025 अशी आहे.

            राज्यातील विविध भागातील स्पर्धकांनी संबंधित जिल्हा माहिती कार्यालयाकडून तर मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील इच्छुकांनीमाहिती व जनसंपर्क महासंचालनालयतळमजलाहुतात्मा राजगुरु चौकमादाम कामा मार्गमंत्रालयमुंबई - 32येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घ्यावयाचे आहेत. अर्जाचं नमुने dgipr.maharashtra.gov.in  व  www.maharshtra.gov.in तसेच https://mahasamvad.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

पुरस्कारांची माहिती

अ.क्र

पुरस्काराचे नाव

पारितोषिक

1.

अटलबिहारी वाजपेयी राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार (राष्ट्रस्तरीय)

1,00,000/- (रुपये एक लाख रोख) (मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक)

2.

बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार (मराठी) (राज्यस्तर)

5हजार रुपये

(मानचिन्ह  प्रशस्तीपत्र)

3.

अनंत गोपाळ शेवडे पुरस्कार (इंग्रजी) (राज्यस्तर)

 

51 हजार रुपये

(मानचिन्ह  प्रशस्तीपत्र)

4.

बाबूराव विष्णू पराडकर पुरस्कार (हिंदी) (राज्यस्तर)

51 हजार रुपये

(मानचिन्ह  प्रशस्तीपत्र)

5.

मौलाना अबुल कलाम आझाद पुरस्कार(उर्दू) (राज्यस्तर)

51 हजार रुपये

(मानचिन्ह  प्रशस्तीपत्र)

6.

यशवंतराव चव्हाण पुरस्कार

शासकीय गट (मराठी) (माहिती व जनसंपर्क(राज्यस्तर)

51 हजार रुपये

(मानचिन्ह  प्रशस्तीपत्र)

7.

पु.ल.देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार(राज्यस्तर)

51 हजार रुपये

(मानचिन्ह  प्रशस्तीपत्र)

8.

तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार (राज्यस्तर)

51 हजार रुपये

(मानचिन्ह  प्रशस्तीपत्र)

9.

केकी मूस उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार शासकीय गट (माहिती व जनसंपर्क(राज्यस्तर)

51 हजार रुपये

(मानचिन्ह  प्रशस्तीपत्र)

10.

समाज माध्यम पुरस्कार (राज्यस्तर)

51 हजार रुपये (मानचिन्ह  प्रशस्तीपत्र)

11.

स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार (राज्यस्तर)

51 हजार रुपये (मानचिन्ह  प्रशस्तीपत्र)

12.

पत्रकार सुधाकर डोअीफोडे अग्रलेखन पुरस्कार (राज्यस्तर)

51 हजार रुपये (मानचिन्ह  प्रशस्तीपत्र)


 

विभागीय पुरस्कार

13.

दादासाहेब पोतनीस पुरस्कार, (नाशिक विभाग)

 

5हजार रुपये

(मानचिन्ह  प्रशस्तीपत्र,

या व्यतिरिक्त रुपये 10 हजार दै.गावकरीने पुरस्कृत केले आहेत.)

14.

अनंतराव भालेराव पुरस्कार, (औरंगाबाद आणि लातूर विभाग)

5हजार रुपये (मानचिन्ह  प्रशस्तीपत्र)

15.

आचार्य अत्रे पुरस्कार, (मुंबई विभाग)

5हजार रुपये (मानचिन्ह  प्रशस्तीपत्र)

16.

नानासाहेब परूळेकर पुरस्कार, (पुणे विभाग)

5हजार रुपये (मानचिन्ह  प्रशस्तीपत्र)

17.

शि.म.परांजपे पुरस्कार, (कोकण विभाग)

5हजार रुपये (मानचिन्ह  प्रशस्तीपत्र)

18.

ग.गो.जाधव पुरस्कार, (कोल्हापूर विभाग)

5हजार रुपये (मानचिन्ह  प्रशस्तीपत्र)

19.

लोकनायक बापूजी अणे पुरस्कार, (अमरावती विभाग)

5हजार रुपये (मानचिन्ह  प्रशस्तीपत्र)

20.

ग.त्र्यं.माडखोलकर पुरस्कार, (नागपूर विभाग)

5हजार रुपये (मानचिन्ह  प्रशस्तीपत्र)


















































No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 23.06.2025

                                                                        शाळेच्या पहिल्या दिवशी जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वागत *जिल्हा परिषदेच्या...