दर्यापूर वसतिगृहात संविधानाबाबत विविध स्पर्धा
अमरावती, दि. 27 : भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त दर्यापूर येथील शासकीय वसतिगृहात विविध स्पर्धा पार पडल्या. घर घर संविधान अभियानांतर्गत दर्यापूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह आणि १२५वी जयंती मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह येथे भारतीय संविधानावर आधारीत निबंध, चित्रकला, वक्तृत्व आणि देशभक्तीपर आधारीत गीतगायन स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेत प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिकाचे वितरण करण्यात आले.
000000
दिव्यांग व्यक्तींनी फिरत्या वाहनावरील दुकान
योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
अमरावती, दि. 27 : दिव्यांग व्यक्तींच्या सबळीकरणासाठी फिरत्या वाहनावरील दुकान मोफत उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. याचा इच्छुकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
हरीत ऊर्जेवर चालणारे फिरत्या वाहनावरील दुकान योजनेची अंमलबजावणीची दिव्यांग वित्त व विकास महामंडळ करणार आहे. योजनेतून दिव्यांग व्यक्तींना पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध करुन रोजगार निर्मितीस चालना देणे, दिव्यांग व्यक्तीचे आर्थिक, सामाजिक पुनवर्सन करणे, सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे दिव्यांग व्यक्तींना त्यांचा परिवार, कुटुंबासमवेत जीवन जगण्यास सक्षम करण्यात येणार आहे.
योजनेचा लाभ राज्यातील गरजू दिव्यांग व्यक्तींना मिळण्यासाठी register.mshfdc.co.in पोर्टलवर 6 फेब्रुवारीपर्यंत नोंदणी करावी लागणार आहे. या योजनेचा लाभ दिव्यांग व्यक्तींनी घ्यावा, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment